तुम्ही म्हणजे बोलघेवडे! कोणाशी ना कोणाशी बोलत राहायला तुम्हाला आवडतं ना! मग तेच वापरा ना अभ्यास करण्यासाठी. मोठमोठय़ानं वाचा म्हणजे आपोआपच ऐकलंही जाईल. मित्रमत्रिणींना वर्गातलं शिकवणं महत्त्वाचं वाटत नसेल तर तुम्ही मित्रमत्रिणींकडे दुर्लक्ष करा आणि वर्गात काय शिकवलं जातंय ते काळजीपूर्वक ऐका. मोबाइल हा तुमचा अभ्यासातला उत्तम दोस्त ठरू शकतो. असं करा ना, घरातील एखाद्या मोठय़ा माणसाचा मोबाइल त्या व्यक्तीची परवानगी घेऊन तुमच्याजवळ घ्या. त्यात महत्त्वाची सूत्रे, नियम वगरेंसारख्या ज्या गोष्टी उपयोगी पडतील त्या रेकॉर्ड करा आणि ऐका ना पुन: पुन्हा. अशाने कसं अणि कधी तुमच्या लक्षात राहील ते लक्षातही येणार नाही तुमच्या. अजून एक करा बरं का, तुमच्या ज्या मित्रमत्रिणींना पुस्तकातला काही भाग समजला नसेल आणि तुम्हाला समजला असेले, तर त्यांना समजावून सांगा आणि तुम्हाला न समजलेलं त्यांच्याकडून समजून घ्या. वर्गात प्रश्न विचारायला, उत्तरं द्यायला आणि वर्गातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घ्यायला तुम्हाला आवडतं, पण काही वेळा वर्गातील इतर मुलं तुम्ही शिक्षकांच्या पुढे शायिनग मारता असं म्हणतात म्हणून त्यांना घाबरून मागे मागे राहू नका. तुम्हाला ते आवडतं ते न संकोचता करा. इतरांशी संवाद साधतच तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकता, तर ते करणं काहीही गर नाही. काही गोष्टी पाठ करताना किंवा लक्षात ठेवताना एका विशिष्ट लयीत लक्षात ठेवणं तुम्हाला सहज जमतं, मग तशी ठेवा ना ती लक्षात! लावा
सूत्रांना चाली आणि म्हणा मोठमोठय़ानं, इतरांकडून म्हणून घेता घेता तुमचाही अभ्यास होईल आणि एखाद्या मुद्दय़ावरून इतरांशी वाद घालता घालताही! आता हे सगळं कराच. ऐकताय ना माझं?
joshimeghana.23@gmail.com
ऑफ बिट : ऐका तर खरं!
मग तेच वापरा ना अभ्यास करण्यासाठी. मोठमोठय़ानं वाचा म्हणजे आपोआपच ऐकलंही जाईल.
Written by मेघना जोशी

First published on: 10-04-2016 at 01:06 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smarter studying