कधी मला वाटतं
आभाळ मी व्हावं
चंद्र, सूर्य, नक्षत्रांना
हळूच गोंजारावं

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधी मला वाटतं
मी समुद्र व्हावं
शांत किनाऱ्याचं
मन जाणून घ्यावं.

कधी मला वाटतं
इंद्रधनु व्हावं
सप्तरंगी तोरण
ऐटीत मिरवावं

कधी मला वाटतं
मी धरणी व्हावं
हिरवंगार रोपटं
मायेने रुजवावं

पण अखेर वाटतं
मी मीच राहावं
अन् आईच्या कुशीत
निरामय निजावं

भाग्यवान आईबाबा
आमच्यापेक्षा आहेत
आई-बाबा भाग्यवान
नव्हते लहानपणी
त्यांना कोणतेही ताण

पाठीवर पुस्तकांचं
ओझं त्यांच्या नव्हतं
गृहपाठाचं लोढणं
तेही गळ्यात नव्हतं

शाळेत प्रवेश त्यांना
सहजच मिळायचा
लादलेला इंटरव्ह्यू
नाही त्यांना छळायचा

घरासमोर अंगण
खेळायला असायचं
तसं भाग्य कुठे आता
सांगा आम्हा मिळायचं

गोष्टी सांगणारी आज्जी
होती नं त्यांच्या घरात
आम्ही मात्र आईचीही
बघत राहतो वाट

आई नि बाबांचं कसं
सुंदरसं बालपण
आमच्या हातून सारे ते
निसटून गेले क्षण!

कधी मला वाटतं
मी समुद्र व्हावं
शांत किनाऱ्याचं
मन जाणून घ्यावं.

कधी मला वाटतं
इंद्रधनु व्हावं
सप्तरंगी तोरण
ऐटीत मिरवावं

कधी मला वाटतं
मी धरणी व्हावं
हिरवंगार रोपटं
मायेने रुजवावं

पण अखेर वाटतं
मी मीच राहावं
अन् आईच्या कुशीत
निरामय निजावं

भाग्यवान आईबाबा
आमच्यापेक्षा आहेत
आई-बाबा भाग्यवान
नव्हते लहानपणी
त्यांना कोणतेही ताण

पाठीवर पुस्तकांचं
ओझं त्यांच्या नव्हतं
गृहपाठाचं लोढणं
तेही गळ्यात नव्हतं

शाळेत प्रवेश त्यांना
सहजच मिळायचा
लादलेला इंटरव्ह्यू
नाही त्यांना छळायचा

घरासमोर अंगण
खेळायला असायचं
तसं भाग्य कुठे आता
सांगा आम्हा मिळायचं

गोष्टी सांगणारी आज्जी
होती नं त्यांच्या घरात
आम्ही मात्र आईचीही
बघत राहतो वाट

आई नि बाबांचं कसं
सुंदरसं बालपण
आमच्या हातून सारे ते
निसटून गेले क्षण!