खारू गं खारू, वृक्षवेलीवर चढू
वर जाशील सरसर, खाली येशील भरभर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रंग तुझा भुर्रकट, पळते भुर्रकन्
छातीवर चट्टे, पाठीवर नट्टे-पट्टे

काळे निळे डोळे, टकमक बघे
कर्ण सदा उघडे, बोल बोबडे

पायाला तीक्ष्ण नखं, पक्कड घट्ट
झाडावर डुले, ढोलीत पिल्ले

लपायला खोपे, रस्ते नसतात सोपे
तारेवरून उलटी, पळताना मारते पलटी

चालवते खोबडी, नाही वळे बोबडी
कौलावर लांब उडी, हिंमत केवढी
दिसते एवढुशी, हुशारीत मात्र सरशी
पानाआड दडशी, चिक्चिक् करशी

फळ मिळता हाती, दोन पायांत धरशी
ऐटीत टरफळं फोडशी, कड्कडा खासी

चुरामुरा फेकशी, खोडाला तोंड घासशी
शेपटीला कमान, उडवते धमाल

लांब तुरा, रुबाब किती न्यारा
सर्वाचीच लाडकी खारू, चाल तुरूतुरू

तरूवरचं तारू, नका तिला मारू

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Squirrel save squirrel do not hurt