आईचा मोबाइल वाजला आणि वर्षाने पिझ्झा खात-खातच तो घेतला.

‘‘दीदी!’’ वर्षा ओरडलीच. समोरून वर्षाची चुलतबहीण व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर बोलत होती.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
thane district senior citizen home voting
ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात
akola vidhan sabha election 2024
प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार, जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनाचे गणितच चर्चेत; सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल

‘‘हाय! न्यू-ईयर सेलिब्रेशन आतापासूनच सुरू?’’ वर्षाच्या हातातला पिझ्झा पाहून दीदीचा स्वाभाविक प्रश्न.

‘‘नाही गं! पिझ्झा आपला असाच. थर्टीफर्स्टचा संध्याकाळी स्पेशल ‘चाट-पार्टी’चा बेत आहे – ‘ऑल होममेड’. काका-काकूपण येणार आहेत. तुला खूप मिस करणार आम्ही. येतेस का पटकन इथे उडत-उडत?’’

‘‘डेन्मार्कहून? आलेच.’’ दीदीने हातांचे पंख केले. दोघी हसल्या. दीदी सहा महिन्यांपूर्वीच डेन्मार्कला शिकायला गेली होती.

‘‘दीदी, तुमचं काय सेलिब्रेशन?’’

‘‘काचेच्या प्लेट्स आणि ग्लास फोडणार आहोत.’’

‘‘काय?’’

‘‘इथे नवीन वर्षाचं स्वागत जुन्या काचेच्या प्लेट आणि ग्लासेस फोडून करतात.’’

‘‘अजब ए.’’

‘‘माझी रूममेट स्पॅनिश आहे नं. त्यांच्याकडे मोजून १२ द्राक्षं खाऊन नवीन वर्षाचं स्वागत करतात. नवीन वर्षाच्या प्रत्येक महिन्याचं प्रतीक म्हणून १२ महिन्यांची १२ द्राक्षं. तीही बाराचे ठोके संपायच्या आत खायची.. ही अट.’’

‘‘तूपण ट्राय करणार आहेस?’’

‘‘येस्स! गंमत म्हणजे सध्या मी हे शब्द म्हणायला शिकलेय.’’ दीदीने लगेचच ‘Prosit Neujahr’ असा मेसेज टेक्स्ट केला.

‘‘‘प्रोसिट.. नऊजेहार’.. हे काये?’’

‘‘जर्मन.. ‘पोसित नोह्या’ म्हणजे ‘Happy New Year’. माझे गाइड जर्मन आहेत नं, म्हणून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला प्रॅक्टिस करून ठेवलीय.’’

‘‘मग त्यांना ‘नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..’ हे मराठीतूनही म्हणायला शिकव.’’

‘‘कल्पना छान आहे.’’

‘‘माझा टेक्सासचा मामा न्यू-ईयरसाठी यंदा न्यूयॉर्कला गेलाय.. ‘टाइम्स स्क्वेअर’ला न्यू-ईयरचा ‘ड्रॉप द बॉल’ सोहळा बघायला. ३१ डिसेंबरला रात्री बरोबर ११:५९ ला हा सोहळा सुरू होतो. अमेरिकेमधले लेाक तिथे न्यू-ईयरसाठी दरवर्षी एकत्र जमतात किंवा टी.व्हीवर हा सोहळा बघतात. मामाने फोटो आणि व्हिडीओ पाठवले तर मी नक्की फॉरवर्ड करेन. दीदी, आपल्याकडे अशी कुठली पद्धत आहे का गं? काहीतरी हटके?’’

‘‘हो! आहे की.. म्हणजे आम्ही लहान असताना होती. अजून आहे का ते नाही ठाऊक.’’ इतक्यात आजोबा वर्षाच्या शेजारी येऊन बसले. त्यांच्या हातात ‘गार्लिक ब्रेड’ होता.

‘‘हाय आजोबा, मज्जा चाललीये सगळय़ांची.’’ दीदीने हात केला.

‘‘मग काय तर! मुलींनो, हल्ली आतषबाजी करून, फटाके वगैरे फोडून आपण स्वागत करतो नवीन वर्षांचं. पण मला आठवतंय मुंबईला असताना आमच्या लहानपणी आम्ही एका म्हाताऱ्या माणसाची प्रतिमा बनवून ती जाळायचो. तो म्हातारा आम्ही गवतापासून किंवा टेलरकडून आणलेल्या उरल्यासुरल्या कापडाच्या तुकडय़ांतून बनवायचो. हा म्हातारा माणूस म्हणजे सरतं वर्ष.. आणि त्याला जाळण्याचं प्रतीक म्हणजे दु:खांना मागे टाकून नव्या वर्षांला, ‘पॉझिटीव्हीटी’ला वाट मोकळी करून देणं असं होतं. आणि मग आम्ही सगळी मुलं मिळून आमच्या काही ख्रिश्चन मित्रांनी शिकवलेलं – एक गाणं म्हणायचो.. ‘ओल्ड लँग सेईन’..’’

‘‘ओल्ड.. काय?’’ वर्षाचा प्रश्न. आजोबांनी स्पेिलगच लिहून दाखवलं.. ‘Auld lang syne’.. दीदीला ते माहीत होतं.

‘‘For Auld lang syne…’ हे खूप प्रसिद्ध गाणं आहे. नवीन वर्ष सुरू होत असताना सरत्या वर्षांला अलविदा करण्याचं गाणं. अनेक देशांमध्ये हे गाणं गाण्याची प्रथा आहे, खासकरून ब्रिटनमध्ये. स्कॉटलंडचे प्रसिद्ध कवी रोबर्ट बर्न्स ने लिहिलेलं हे एक स्कॉटीश गाणं, ज्याचा अर्थ आहे ‘जुन्या दिवसांसाठी..’. म्हणजे जुन्या आठवणींची उजळणी, एखाद्या खूप जुन्या मैत्रीचा दुआ वगैरे.. हो नं आजोबा?’’ दीदीने माहिती दिली.

‘‘अगदी बरोबर. कसंय, मुंबईमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. इथे सगळेच जण एकमेकांचे सण-समारंभ आनंदाने साजरे करतात. पण नवीन वर्षाचं स्वागत करण्याची ही परंपरा जाती-धर्मापलीकडे जाऊन साजरी व्हायची.. आम्ही नंतर छोटीशी पार्टीदेखील करायचो. पण ‘गेले ते दिन गेले sss’..’’ आजोबांनी उत्स्फूर्तपणे सूर लावला. मात्र त्यातली मंद उदासीनता दोघींनी बरोबर टिपली.

‘‘हल्ली ही पद्धत कुठे पाहायला नाही मिळत..’’ वर्षाची उत्सुकता.

‘‘असेलही काही ठिकाणी अजून. त्यावेळी भायखळा, माझगाव, धोबीतलाव, बांद्रा, माहीम, अंधेरी अशा अनेक ठिकाणी आवर्जून तो म्हातारबाबा दिसे. कधी कधी तर त्याच्यात फटाके आणि काळं-मीठही वापरलं जाई.’’

‘‘म्हणजे आपण दसऱ्याला रावणदहन करतो तसं.’’ दीदीने माहिती दिली.

‘‘जवळपास. शेवटी देश, जात-धर्म काहीही असो. सगळय़ांच्या पद्धती एकच सांगतात- ‘सफल, मंगल होवो..’ हो की नाही?’’ आजोबांनी हाय-फाइव्हसाठी हात वर केला.

‘‘जे बात!’’ दीदीने स्क्रीनवरून तो दिलाही.

‘‘भायखळावरून आठवलं. तुमचे मित्र अस्लमचाचा यावर्षी आले नाहीत दिवाळीला.’’

‘‘वर्षू, त्यांचे ड्रायफ्रुट्स मिस केलेस नं?’’ दीदीने चिडवलं तसं वर्षाने जीभ चावली.

‘‘अगं, तो दुबईला गेला होता कामासाठी. वेळ मिळाला की नक्की भेटेल. तसा ईदला भेटला होताच की!’’ आजोबा म्हणाले.

‘‘किती जुनी मैत्री आहे तुमची?’’ दीदीचा प्रश्न.

‘‘झाली असतील ३५-४० वर्ष. त्याकाळी अस्लम भायखळयाला एका लहानशा गाळयामध्ये पडदे शिवून विकायचा. आता मोठया ‘फर्निशिंग’च्या दुकानाचा मालक झालाय. पण आजही मैत्रीला अगदी धरून आहे! श्रीमंती-गरिबी, जात-धर्म कधीच आलं नाही आमच्या मैत्रीमध्ये. तुम्ही दरवर्षी न्यू-ईयर रेझोल्युशन करवता नं, की छान अभ्यास करणार, वजन कमी करणार, वगैरे.. पण किती दिवस टिकतात ती? फारतर दोन-तीन महिने. एक वर्ष आम्हीही रेझोल्युशन केलं- ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ – जे आम्ही चाळीस वर्ष जपलंय. रेझोल्युशन करतानाही ती ‘कमिटमेंट’नी करावीत. आपली वृत्ती त्यांतून दिसते.’’

‘‘आजोबा, अजून एक गार्लिक ब्रेड घेणार की पिझ्झा देऊ?’’ एका प्लेटमध्ये वर्षा दोन्ही घेऊन आली होती.

‘‘खरं तर पोट भरलंय..’’

‘‘आजोबा, थोडासा पिझ्झा घ्या नं, For Auld lang syne.. तुमच्या इतक्या जुन्या मैत्रीसाठी..’’ वर्षाचा आग्रह.

‘‘बस काय! चल दे एक नितकोर..’’

‘‘नितकोर..’’

‘‘वन-एट्थ.’’ आजोबा आणि दीदी एकत्र म्हणाले.

‘‘परमेश्वरा sss! वर्षू, यंदा न्यू-ईयर रेझोल्युशन कर- मराठी सुधारण्याचं.’’ दीदी म्हणाली.

‘‘‘यू बेट’, दीदी. मी ‘ऑलरेडी’ ‘स्टार्ट’ केलंय ते. मराठी ‘बुक्स’ आणलीयेत ‘रीिडगसाठी’ ‘लायब्ररी’मधून..’’ हे ऐकून दीदी आणि आजोबा खळखळून हसले..

mokashiprachi@gmail.com