अदिती देवधर

‘‘वन्यजीवांसाठी आपण शहरात अनेक गोष्टी करू शकतो.’’ वीणा मावशींनी मुलांसमोर विषय काढला.

firecrakers side effects on body
फटाक्यांचा धूर फुप्फुस आणि हृदयासाठी किती घातक? फटाक्यांमधील हानिकारक घटक कोणते?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
why the bats flying in the dark do yo know the behind reason
वटवाघूळ रात्री अंधारातचं का उडतं? काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या…
Vasu Baras 2024
Vasu Baras 2024:धेनुगळ म्हणजे काय?
Diwali, lamp Diwali, Diwali 2024, Diwali latest news,
दीपज्योतिर्नमोऽस्तुते।
Alibaug Police raid, fake cigarette company
अलिबाग : बनावट सिगारेट कंपनीवर पोलिसांचा छापा, पाच कोटींचा मुद्देमाल जप्त
Vines are best used in hanging structures
निसर्गलिपी : झुलत्या रचना…
Nagpur 63 tall building around airport
धोकादायक! नागपूर विमानतळाला ६३ उंच इमारतींचा विळखा…

‘‘अगं मावशी, फुलापाखरांसाठी होस्ट प्लांट लावायचं म्हणतोय, वन्यजीवांसाठी नाही.’’ संपदा वीणा मावशीला समजावत म्हणाली. गॅंग संपदाच्या आईची मैत्रिण वीणा मावशीकडे आली होती. संपदानं मागे त्यांच्या सोसायटीतली वाळलेली पानं वीणा मावशीच्या गच्चीवरच्या बागेसाठी दिली होती, तेव्हापासून त्यांची पानांची देवाण-घेवाण चालू होती. संपदाच्या सोसायटीत पानं जाळणं बंद झालं. संपदानं ‘पानं असणारे’ लोक ‘पानं हवी असणाऱ्या’ मावशीशी जोडून दिल्यामुळे आजूबाजूच्या सोसायटीतही पानं जाळणं बंद झालं होतं. नेहा आठवडय़ातून दोनदा मावशीच्या गच्चीवरच्या बागेत काम करायला यायची. आपल्याकडे बाग नसली तरी आपण बागकामाची हौस पूर्ण करू शकतो हे नेहाच्या लक्षात आलं होतं. मावशी तिला थट्टेनं visiting gardener म्हणायची. आज गॅंग मावशीकडे आली होती ते फुलापाखरांबद्दल माहिती घ्यायला. ‘‘वन्यजीव किंवा वाईल्ड लाईफ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वाघ, बिबटे, हरणंच येतात, पण तसं नाहीये. जे माणसांनी पाळलेले नाहीत म्हणजे जे अन्नासाठी आपल्यावर अवलंबून नाहीत ते म्हणजे वाईल्ड लाईफ. मग त्यात खारूताई आली, तसंच फुलपाखरंही.’’ वीणा मावशीनं मुलांना विस्तारून सांगितलं. ‘‘म्हणजे तो वन्यजीव आहे.’’ संपदा झाडाच्या फांदीवर बसलेल्या बुलबुलकडे बोट दाखवत म्हणाली.

हेही वाचा >>> बालमैफल: शब्दांची गंमत

‘‘बरोबर.’’ वीणा मावशी म्हणाली. ‘‘आणि तो वन्यजीव नाही.’’ मावशीनं दिलेलं बशीभर दूध फस्त करून पंजे चाटत बसलेल्या मन्या बोक्याकडे बघत यतीन म्हणाला. त्यावर सगळे हसले. त्याच्याबद्दलच बोलत आहेत हे जणू कळल्यासारखं मन्यानं क्षणभर पंजे चाटणं थांबवून गॅंगकडे बघितलं आणि परत आपल्या कामात गढून गेला.

‘‘प्रत्येक प्रकारच्या फुलापाखराचं होस्ट प्लांट ठरलेलं असतं. आपल्या गच्चीवरच्या किंवा बाल्कनीतल्या बागेत आपण फुलपाखरांना होस्ट प्लांट उपलब्ध करून देऊ शकतो.’’ मावशी म्हणाली.

‘‘होस्ट प्लांटस् कुठली आहेत ही माहिती आपण सोसायटीच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर टाकली आणि यातलं एखादं तरी लावा असं सांगितलं तरी काम होईल.’’ नेहाला कल्पना सुचली.

‘‘बरोबर. शिवाय आपल्याकडून अपायकारक अशा अनेक गोष्टी नकळत होत असतात.’’ मावशीने महत्त्वाचा मुद्दा काढला.

‘‘म्हणजे कशा?’’ नेहानं विचारलं.

‘‘दुधी भोपाळ्याची फुलं संध्याकाळी फुलतात. त्याचे परागीभवन करणारे किटक  nocturnal pollinators रात्री वावरणारे आहेत. त्यांना अंधार लागतो. शहरात अंधार नसतोच. रस्त्यावरचे दिवे, सोसायटीच्या आवारातले दिवे यामुळे सतत प्रकाश असतो.’’ मावशी म्हणाली.

‘‘मावशी, रस्त्यावर दिवे तर पाहिजेतच ना गं.’’ संपदाचा निरागस प्रश्न.

‘‘अगदी बरोबर, पण आवश्यक तेवढेच. काही वर्षांपूर्वी मी गच्चीच्या कठडय़ांवर दिवे लावले होते. रात्री काही मी गच्चीवर येत नाही. उगीच छान दिसतात म्हणून लावले. सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रकाशाची गरजच आहे तिथे ठीक आहे. पण उगीच शोभा म्हणून, छान दिसतंय म्हणून जिथे अंधार चालू शकेल अशा ठिकाणी प्रकाश निर्माण करू नये.’’ मावशीने  चांगला मुद्दा मांडला.

‘‘एवढं खोलात जाऊन आम्ही विचारच केला नव्हता.’’ यशची प्रामाणिक कबुली.

हेही वाचा >>> बालमैफल: आईची जादूई क्रीम

‘‘किटकच नाही तर घुबड, वटवाघूळ यांच्यावरही या अतिरिक्त उजेडाचा परिणाम होतो. कोणी मुद्दाम करत नाही, पण हे माहीतच नसतं.’’ मावशीनं माहिती पुरवली.

‘‘आठवलं, आम्ही पक्षी निरीक्षणाला गेलो होतो तेव्हा आयोजकांनी कुठल्या रंगाचे कपडे टाळायचे हे सांगितलं होतं.’’ यशनं सांगितलं.

‘‘बरोबर. काळा, चॉकलेटी, हिरवट असे साधारण झाडे-मातीच्या रंगात मिसळून जाणारे कपडे असावेत. पांढरा, लाल, पिवळा, निळा हे रंग टाळावेत.’’ मावशीनं जोड दिली.

‘‘खूपच गोष्टी आहेत. काय काय लक्षात ठेवायचं आपण.’’ यतीन डोक्याला हात लावत म्हणाला.

‘‘ते  Do’s आणि  Don’ts असतात ना तसं काहीतरी तयार करायचं का? अगदी सहज लक्षात राहील असं.’’ नेहाच्या या सुचनेवर गॅंगचं विचारचक्र सुरू झालं.

aditideodhar2017@gmail.com