-भारती महाजन-रायबागकर

सध्या तेजसच्या शाळेत एक अभिनव उपक्रम सुरू होता. पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी रोज एक संदेशपर नाटिका सादर करायची होती. आज तेजसच्या सातवीच्या वर्गाची पाळी होती. त्याच्या वर्गशिक्षकांनी त्या नाटिकेत आपण केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींतून स्वावलंबी कसं होतो आणि त्यातून घरातल्यांना आपोआप मदतही कशी होते हे खूप छान पद्धतीने दाखवलं होतं. त्यामुळे मुलांच्या मनावर त्याचा परिणाम न झाला तरच नवल!

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
second phase, teacher recruitment,
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी? ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता
Yavatmal Bhumika Sujeet Rai, Bhumika Sujeet Rai,
दृष्टिहीन ‘भूमिका’ची वाचनाप्रती डोळस भूमिका! सलग १२ तास ब्रेल लिपीतील…
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा

तेजसवर तर त्या नाटिकेचा एवढा प्रभाव पडला की शाळेतून घरी आल्या आल्या आधी त्याने आपले बूट आणि मोजे काढून रोजच्या सवयीप्रमाणे शू-रॅकच्या बाहेरच भिरकावले. पण पुन्हा वळून त्याने ते व्यवस्थितपणे शू-रॅकवर ठेवले. आपलं दप्तरही नेहमीच्या सवयीप्रमाणे हॉलमधील सोफ्यावर फेकणार इतक्यात जीभ चावून लगेच ते उचलून आपल्या खोलीतील टेबलावर व्यवस्थित नेऊन ठेवलं. बॅगेतील टिफिनचे डबे उघडून धुवायला बेसिनमध्ये ठेवले. पाण्याची बॉटल नीट जागेवर ठेवली आणि हात-पाय स्वच्छ धुऊन तो डायनिंग टेबलवर येऊन बसला.

हेही वाचा…बालमैफल : शेताची सफर

त्याची आई नमिता हे सर्व जरा आश्चर्यानेच पाहत होती. ‘‘अरे व्वा! आज सूर्य कुणीकडे उगवला बरं.’’ त्याला खायला देता देता न राहवून तिनं विचारताच ‘‘अं… ते आहे आमचं आपलं एक सिक्रेट,’’ असं तेजसनं उत्तर दिलं. शिवाय खाणं झाल्यावर ‘‘आता मी तुला काय मदत करू’’ असं त्यानं विचारताच तिला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला.

‘‘मदत होय? काय बरं करशील? हं… भाजी आणतोस का सोसायटीतील भाजीवाल्याकडून?’’
‘‘हात्तीच्या! एवढंच ना! आत्ता आणून देतो, दे पैसे, काय आणायचं तेवढं सांग.’’
‘‘तुझ्या आवडीची कुठलीही भाजी आण.’’ नमिताने त्याला पैसे देत म्हटलं.
‘‘वाव’’ म्हणत तेजस आनंदाने उड्या मारत बाहेर पडला. भाजीवाल्या काकांनी सर्व भाजीपाला छान पद्धतीने मांडून ठेवला होता. एरव्ही आईबरोबर आल्यावर तेजसचं भाज्यांकडे मुळीच लक्ष नसतं. तो आपला रस्त्यावरची गंमत पाहत बसतो. पण आज त्याला त्या वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या पाहून खूप छान वाटलं. ‘‘कित्ती छान दिसताहेत या भाज्या!’’ तेजसकडे पाहून ‘‘काय तेजस! आज एकटाच? आई कुठे आहे?’’ असं भाजीवाल्या काकांनी विचारताच ‘‘आई घरी आहे आणि मी आज एकटाच भाजी घ्यायला आलोय,’’ असं तेजसने जरा ऐटीतच सांगितलं. ‘‘असं होय, मग काय भाजी हवी तुला?’’ असं त्यांनी विचारताच तेजसने नेहमीप्रमाणे बटाट्यांकडे हात दाखवला, पण लगेच त्याचा विचार बदलला, ‘छे! बटाटे तर आपण नेहमीच खातो, आज आपण आईच्या आवडीची भाजी घेऊन जावी.’ आणि त्याला एका टोपलीत एकदम वेगळी भाजी दिसली. त्याचे डोळे लकाकले.

हेही वाचा…बालमैफल : ‘अपोफिस’

‘‘ढेमसं… (दिलपसंद) कारण तेजस राहात होता चेन्नईत! तिथे तर ही अप्राप्य भाजी, कारण आई नेहमी बाबांना ती पुण्याहून आणायला सांगायची. ठरलं, आज आईच्या आवडीची भाजी. अगदी कोवळी दिसताहेत, मडकी करण्यासारखी. तेजसने भराभर दोन किलो ढेमसं मोजायला दिली. आता ३-४ दिवस रोज याचेच वेगवेगळे प्रकार खाऊ.’’ दोन-तीन टोपल्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा ठेवलेल्या होत्या. ‘अरे व्वा! मुळ्याच्या शेंगा! (डिंग्य्रा) त्यातल्या तब्बल दोन किलो शेंगाही त्याने मोजून घेतल्या. मला मिठासोबत कच्च्या खायला आवडतात, आईला पुरणावळ आवडते आणि बाबांना वाळवून तळलेल्या. सर्वांच्याच आवडीच्या. या दोन मेथीच्या जुड्याही घेऊन टाकाव्यात. आईच्या भाषेत हेल्दी भाजी.’ असा विचार करून हिशोबाचे पैसे त्या काकांना देऊन तो ‘घ्या हो घ्या, ढेमसं घ्या, डिंर्ग्या आणि मेथी घ्या’ असं स्वरचित गाणं गुणगुणतच घरी आला. आल्याबरोबर त्याने पिशवीतील भाजी खाली एका पेपरवर ओतली आणि आतल्या खोलीतील नमिताला जोरजोरात हाक मारत- ‘‘आई, आई, बघ तरी, मी हे ढेमसं आणलेत भाजीसाठी, तुला आवडतात ना आणि या मुळ्याच्या शेंगा आणि ही मेथीची जुडी. अगदी महाराष्ट्रात राहिल्यासारखं वाटतंय की नाही आज! आता या वेळी बाबांना पुण्याहून भाज्या आणायला नको.’’ असं त्यानं म्हणताच ‘अगं बाई! खरंच की काय?’ असं म्हणत नमिता बाहेर आली. आणि आता आई खूश होऊन आपल्याला शाबासकी देईल या अपेक्षेने तेजस नमिताकडे बघू लागला. नमिताने भाज्यांकडे बघितलं आणि तिला हसू आवरेना, पण तेजसचा हिरमोड होईल म्हणून तिनं आपलं हसू दाबून ठेवलं.

‘‘काय झालं आई?’’ असं तेजसनं विचारताच मात्र तिनं सहज स्वरात खुलासा केला.
‘‘अरे! काही नाही. आज तू तुझ्या आवडीचे बटाटे सोडून माझ्या आवडीच्या, शिवाय इथं न मिळणाऱ्या भाज्या आणल्या त्याही भरपूर म्हणून खरंच कौतुक वाटतंय. पण ज…राशी गडबड झाली बघ बाळा, तू ज्याला ढेमसं समजलास ती थोडीशी मोठी जून झालेली तोंडली आहेत. या शेंगाच आहेत, पण मुळ्याच्या शेंगांप्रमाणेच दिसणाऱ्या चवळीच्या, आणि ही आहे मेथीसारखी दिसणारी, पण माठाची भाजी.’’

हेही वाचा…चित्रास कारण की… : कांचीवरम

तेजसचा चेहरा एकदम उतरला. पण मग त्यालाही हसू आलं. आता सुट्टीच्या दिवशी मीच तुला भाजी आणून देणार आणि स्वयंपाकातसुद्धा मदत करणार. म्हणजे भाजी ओळखायची कशी आणि ती करायची कशी हेही मला कळेल असं त्यानं खिलाडूपणानं जाहीर करून टाकलं. पण या एवढ्या मोठ्या भाज्यांचं आता काय करायचं असं त्यानं विचारताच थोड्या आपल्या घरी काम करणाऱ्या मावशींना देऊन टाकूयात असं नमितानं सांगताच त्याला हायसं वाटलं.

संध्याकाळी बाबा घरी आल्यावर तेजसने त्यांना हसत हसत हा किस्सा सांगितला. त्यांनाही खूप मजा वाटली आणि कौतुकपण…
‘‘पण तेजस, आता सांग बरं, आज सूर्य पश्चिमेला कसा काय उगवलाय?’’ या नमिताच्या प्रश्नावर ‘‘फक्त आजच नाही काही, आता तो रोज असाच उगवणार आहे,’’ असं उत्तर देत तेजसनं त्यांना त्या नाटिकेबद्दल सांगितलं.

हेही वाचा…बालमैफल : चिन्मयची दुनिया

‘‘सोनारानेच कान टोचायला हवेत, एरव्ही मी रोज कानीकपाळी ओरडत असते तेव्हा…’’ नमिताने म्हटलं, अर्थात मनातल्या मनातच हो, तेवढ्यामुळे रंगाचा भंग नको व्हायला.

bharati.raibagkar@gmail.com

Story img Loader