उन्हाळा
सुरू झाला उन्हाळा
४२ वर पारा
झरझर झरल्या
घामाच्या धारा
A.C., कुलर
गरागरा पंखा
वाळय़ाचे पडदे
देती गारवा
थंडगार पन्हे
कोल्ं्रिडक, पेप्सी
बर्फाच्या गोळय़ाची
मज्जाच न्यारी!
खस-लिंबाचे
सरबत मस्त
काकडी, कलिंगड
होई फस्त
उन्हाळय़ात डोक्यावर
टोपी घाला
डोळय़ाला गॉगल
नक्की लावा
आपणच आपली
घ्यायची काळजी
उन्हाळय़ापासून
तब्येत जपायची
चांदोबा
चांदोबा गेला बागेत
झोके घेतले झोकात
खेळून खेळून दमला
गवतावर लोळला
भेळपुरी खाताना
दिवस मावळला.
आठवण येता आईची
हिरमुसली स्वारी
काय करावे आता
कळेना काही.
क्षणांत दिसला फुगा
लटकून चालला बघा
ढगांवर मारली उडी
हळूच काढली कडी
आईच्या कुशीत शिरला
पौर्णिमेचा चंद्र
ढगाआडून हसला.
-कलिका महाजन