लहानपणी जो हवाहवासा वाटतो, पण मोठं झाल्यावर आपण टरकतो, ती गोष्ट म्हणजे कुत्रा! आणि मुलांनी कितीही हट्ट केला तरी तो घरी न आणण्यासाठी आई-बाबा प्रचंड मेहनत करत असतात. त्यांच्याकडे इतकी कारणं असतात की कारणं लिहू लागलो तर आपल्या ‘बालमैफल’चं अख्खं पान भरेल. आता बोला!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कुत्रा केवळ भू भू.. भो भो करतो, चावतो, गुरगुरतो, खातो-पितो, धावतो, झोपतो, खेळतो असं मोठय़ांना वाटतं. तो शूर असा कुत्रा मालकाच्या रक्षणाला धावून जातो, अत्यंत प्रामाणिक राहतो हेही माहीत असतं. पण या गुणांशिवाय तो अनेक नवे गुण उधळू शकतो, असं तुम्हाला वाटतं, कारण कार्टूनमध्ये आपण भन्नाट कुत्रे पाहतो.
१९३० साली म्हणजे मिकी-माऊसने कुत्रा पाळायला आणला. प्लूटो नावाचा कुत्रा म्हणजे गोंधळात गोंधळ. तो पिवळ्या रंगाचा ‘मिक्स ब्रीड’ होता. कुत्र्याला हाडुक चघळायला आवडतं हे आपल्याला प्लूटोमुळे कळतं. याच मिकीचा मित्र गुफी हादेखील कुत्राच असला तरी तो प्लूटोसारखा नाही.. कारण तो बोलू शकतो. आणि मुख्य म्हणजे कपडे घालतो.
‘टॉम अॅण्ड जेरी’मधला ‘बुलडॉग’ जातीचा मसल्सवाला कुत्रा पाहून जगातले तमाम कुत्रे हे उंदराचे मित्र व मांजरांचा शत्रू असतात, हे डोक्यात कोरलं जातं. याला मांजर व उंदराची भाषा समजते.‘शिन चॅन’चा शिरो हा पामेरियन जातीसारखा दिसणारा ‘किशु’ जातीचा असावा. तो पाहून कुत्रे म्हणजे कित्ती गरीब बिच्चारे बुजरे असावेत असा भास होतो. कुत्रा आपल्या मालकाप्रमाणे वागू लागतो, हे म्हणतात ते काही खोटं नाही. जियान सारखाच रावडी त्याचा कुत्रा मुकू, तोही नोबीताला त्रास देत असतो. उगाचच.
१०१ डालमेशियनमधले काळ्या ठिपक्यांची पिलावळ ही डालमेशियन जातीचीच आहेत. तर स्कुबी डु हा ताडमाड उंच अशा ‘ग्रेटडेन’ जातीचा आहे. तरी जाम फट्टू आहे. तोडकंमोडकं इंग्रजी त्याला येत असलं तरी तो कपडे घालत नाही. केवळ गळ्यात पट्टा. टेल्सपीन नावाच्या कार्टून सीरिजमध्ये वैमानिक गुंड म्हणून बिनडोक कुत्र्यांची टोळी असते. जी कोणा विमानं लुटणाऱ्या लांडग्याचे ऐकत असते. कुत्रे म्हणजे सर्वच प्रामाणिक असतात हा भ्रम मोडला तो डकटेल्स कार्टूनमधल्या बिगल बॉइज नावाच्या गँगने. बिगल याच जातीच्या कुत्र्यांना अंकल स्क्रुजची तिजोरी हवी असते वगैरे.. हे बॉईज आणि त्यांची गँगलीडर मम्मी ही पहिली ‘कुत्री’ असावी. आपण जसे प्रत्येकाला कावळा म्हणतो.. कावळीन म्हणत नाही तसं कार्टूनमध्ये शिरो,प्लूटो, गुफी, स्कुबी, इत्यादी सगळेच्या सगळे ‘मेल’ कुत्रे, असं का बरं असावं? असो.
आपल्या आई-बाबांना उंदीर, माशा, मांजरी, मुंग्या, ढेकूण, मच्छर घरात आलेल्या चालतात, पण इतके क्युट, विनोदी, धमाल करणारे कुत्रे असूनही आपल्या घरी तो नसतो याचं वाईट वाटतं.. काय मग, पुन्हा एकदा हट्ट धरून बघू या?
श्रीनिवास आगवणे shreeniwas@chitrapatang.in