‘व्यास क्रिएशन’तर्फे स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रकाशित केलेला दीडशे पुस्तकांचा संच मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी तसेच शाळा व पालकांनाही खूपच उपयुक्त आहे. दीडशे या भारदस्त
विजया राजाध्यक्षांचे वसंत ऋतू किंवा ‘फेरफटका फुलासंगे, किल्ले, प्रवासवर्णन अशी पुस्तके मुलांमध्ये निसर्गप्रेम विकसित करतील. या संचात एक चरित्रमालिकाही आहे. त्यात भगतसिंग, रामकृष्ण परमहंस, विनोबा यांचा समावेश आहे.
लेखकांमध्ये प्रामुख्याने शकुंतला फडणीस,
रा. ग. जाधव, यु. म. पठाण, द. भि. कुलकर्णी, भारत सासणे, विजया राजाध्यक्ष, शंकर सारडा यांसह अनेक लेखक आहेत. या सर्व लेखकांनी मुलांसाठी आनंदाने लिहिले आहे. ही सर्व पुस्तके अगदीच छोटी म्हणजे १६ ते २४ पानांची आहेत. पुस्तकांची किंमत प्रत्येकी २० रुपये इतकी आहे. त्यात छान चित्रे आहेत. बहुतेक पुस्तकांच्या मलपृष्ठावर एक चांगली मराठी कविता उद्धृत केली आहे. तर काही पुस्तकांच्या मागे मराठी साहित्यिकांचा परिचय आहे.
हेमा लेले यांची ‘अरे संस्कार संस्कार’ ही १५ पुस्तकांची मराठी व इंग्रजीतील मालिका ही स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली आहे. आकाराने छोटी, किमतीने कमी व विषयांत वैविध्य असा प्रयोग मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजवायला महत्त्वाचा आहे. मुलांना खाऊच्या पशात पुस्तक घेता आले पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून जास्तीत जास्त पुस्तके बाजारात यायला हवीत.
खजिना १५० पुस्तकांचा, व्यास क्रिएशन्स, संपूर्ण संच किंमत- ३००० रुपये, सवलतीत २५००.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा