उन्हाळ्याचे तापलेले दिवस. भर दुपारची वेळ आणि अचानक सूर्यदेव ढगामागे लपले. सगळीकडे कुंद वातावरण निर्माण झालं. ढगाचा ढकलाढकलीचा खेळ सुरू झाला. त्या गडगडाटाने आसमंत दुमदुमून गेला. ‘गर्जतच पडणार’ असं म्हणत पावसाचे थेंब खाली ओघळू लागले. थेंबांच्या सरी झाल्या आणि जमिनीवर धावत उडी मारू लागल्या. जमिनीच्या पोटात लपून ओलाव्याची वाट पाहणारं बी बहरलं. झिरपलेल्या पाण्याच्या स्पर्शानं सुखावलं. किती तरी दिवसांनी त्याची तहान भागली. पोटभर पाणी पिऊन ते फुगलं. त्याच्याही नकळत अंकुरलं. मूळ खालच्या दिशेनं मातीत घुसू लागलं. तर खोड लिफ्टमध्ये बसून यावं तसं झर्रकन् जमिनीतून प्रकाशाच्या दिशेनं वर डोकावलं. थोड्या अहंकाराने ताठ झालं. आपण खूपच पराक्रम केला असं त्याला वाटू लागलं.

‘‘अरे मुळा, बघ मी कसा जमिनीच्या वरती आलो. तुला जराही वरती बघण्याची आवड नाही. काय सारखा अंगाला माती लावून बसतोस.’’ खुशीत येऊन दोन्ही पानांचे दोन हात पसरत वाऱ्याबरोबर डोलत खोड थोडं शिष्टपणानेच बोललं.
‘‘जा रे तू वरती हवा तेवढा, मी तुला पडू देणार नाही. काळजी करू नको. मातीत घट्ट पाय रोवून मी उभा आहे.’’ मूळ न कुरकुरता म्हणालं.
‘‘बरं बरं’’ खोडानं ‘आला मोठा शहाणा’ असा आविर्भाव चोहीकडे बघत व्यक्त केला.
‘‘मी किंचित ‘वडील’ आहे ना तुझ्यापेक्षा; मग समजूतदारपणा दाखवायला नको का!’’ मुळानं वडीलकी मिरवली.
‘‘बरं ते राहू दे, पटापट जमिनीतील पाणी शोषून वरती पाठव. मला सगळ्यांच्या पोटापाण्याची सोय करायची आहे.’’ खोडाने फर्मान सोडलं.
‘‘पाठवतो तर… मी कामाला लागल्याशिवाय तू काही करूच शकणार नाहीस.’’ मुळानं आपलं महत्त्व अधोरेखित केलं.
‘‘सकाळी एकदा पाणीपुरवठा केला की दिवसभर आरामच असतो ना… मला सूर्यदेवाच्या उपस्थितीचा फायदा घेत पानातील हरितद्रव्य, तू पाठवलेलं पाणी आणि हवेतील कर्बद्विप्राणील वायू घेऊन पोटपूजेची व्यवस्था करावी लागते. या प्रक्रियेतून प्राणवायू माणसांसाठी हवेत सोडावा लागतो. शिवाय माझा फांद्या, पानं, फुलं यांचा पसारा केवढा आहे, तो सावरावा लागतो. वारा सारखा बागडत असतो ना!’’ आपल्या कामाचा बाऊ करण्याची खोडाची तशी जुनी खोडच होती.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

हेही वाचा…बालमैफल : एक व्रात्य मुलगा

‘‘आजकाल इतकं प्लास्टिक मातीत मिसळलेलं असतं की वाट काढत काढत पाणी शोधावं लागतं. कधी कधी प्लास्टिकच्या अडथळ्यामुळे पाणी मिळतच नाही. शोधाशोध करून थकवा येतो. या कारणानं आपले काही बांधव उन्मळून पडले आहेत. यामुळे डोक्यावर कामाचा चांगलाच बोजा असतो. कधी कधी कोणत्या तरी कारणाने माती वाहून जाते आणि मग आम्ही उघडे पडतो. त्यातून तुम्हा सर्वांची जबाबदारी असतेच. आमची सोटमुळं, तंतुमुळं सदैव कार्यरत असतात. मात्र मातीशी आम्ही नेहमी इमान राखतो. एखादेच वडाच्या पारंब्यांसारखे वरती असतात. पण त्यांचंही लक्ष जमिनीवर वंशविस्तार करण्याकडे असतं.’’ मुळानं आपली बाजू मांडली.

‘‘आम्ही सहा ऋतूंचे सहा सोहळे अनुभवत असतो. वसंत आला की कोवळ्या पालवीनं मोहरतो. पावसाळ्यात वार्षिक स्नान उरकतो. शिशिर मात्र उघडं बोडकं करून टाकतो. दवबिंदूंनी नटतो. वाऱ्याच्या लहरीपणाला तोंड देतो. कधी कधी वणव्याच्या झळा सहन करतो. अशा वेळेला तुझा हेवा वाटतो. नशीबवान आहेस.’’ – इति खोड.

इतक्यात वाऱ्याची झुळूक कानगोष्टी करते.
‘‘अरे चाललंय काय तुमचं दोघांचं? ही माणसं काय म्हणताहेत तिकडे लक्ष द्या नं. जीवनात तुमचा आदर्श ठेवायला एकमेकांना सांगताहेत. ती म्हणतात, ‘‘झाडं कशी परोपकारासाठीच जन्म घेतात. कोणी दगड मारला किंवा मारला नाही तरी त्याला पानं, फुलं, फळं मुक्तहस्तानं वाटून टाकतात. सगळ्यांप्रति समभाव जपतात. न्यूटननं झाडाचं फळ पडताना बघून शोध लावला. गौतमबुद्धाला बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं. झाडांनी आपलं जीवन व्यापलंय, समृद्ध केलंय. तुमच्याप्रति माणसं अशी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.’’ वाऱ्याचं बोलणं ऐकून मूळ आणि खोड दोघांनाही थोडं लाजल्यासारखं झालं.

हेही वाचा…चित्रास कारण की… : पळते डोंगर काढू या…

‘‘होय रे होय. आम्ही दोघं उगाचच मी-तू, मी-तू करत राहिलो. मूळ, खोड, पानं, फुलं, फळं सगळे एका झाडाचेच भाग आहेत. आम्ही वेगळे नाहीच. ही विविधतेतील एकता आहे. वनराणीनं हे कार्य आमच्यावर सोपवलं आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. वाऱ्या, तू आम्हाला ही जाणीव करून दिलीस ते बरंच झालं. आता आम्ही कधीही वाद घालत बसणार नाही. निमूटपणे जबाबदारी पार पाडू. आम्हाला आमची ओळख करून दिलीस, सहयोगाचं नातं, महत्त्व सांगितलंस त्याबद्दल धन्यवाद.

फांद्यांनी जमिनीच्या दिशेनं झुकून अनुमोदन दिलं.

suchitrasathe52@gmail.com