अन्विताला गणपतीबाप्पा खूप आवडतो. तिच्या घरी गौरी-गणपती येत असल्यामुळे दरवर्षी गणपतीचं मखर करणं, घर आवरणं, मोदक करणं, गौर सजवणं या सगळ्यात ती जमेल तशी मदत करत असते. आता तर तिला बहुतेक सगळ्या आरत्याही पाठ झाल्यात. यावर्षी एकही आरती पुस्तकात न बघता आणि न चुकता म्हणायची असं तिने ठरवलंच होतं. अन्विताला गणपतीबाप्पा आवडण्याचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे- गणपतीसाठी दरवर्षी तिचे काका-काकू आणि चुलत भाऊ – ओम त्यांच्याकडे येतात. तशी गणपतीत गडबडच असते, तरी सुट्टी काढून आठवडाभर ते येत असल्यामुळे अन्विताला ओमशी मनसोक्त खेळता येतं. सगळे आले की घर अगदी भरल्यासारखं वाटतं, असं म्हणत आजी-आजोबाही खूश असतात.
पहिल्या दिवशीची गणपतीची पूजा, नवेद्य वगरे सगळं यथासांग पार पडलं आणि जेवणं झाल्यावर आई, काकू, आजी जरा विश्रांती घ्यायला आडव्या झाल्या. बाबा, काका आणि आजोबाही निवांत गप्पा मारत बसले. आता चहाची वेळ होईपर्यंत ओम आणि अन्विताला खेळायला वेळच वेळ होता. ओमने बाबाला सांगून आपली बॅग उघडली आणि त्यातून पत्त्यांच्या कॅटसारखा एक बॉक्स काढला. बॅग नीट जागेवर ठेवून त्याने अन्विताला हातातला बॉक्स दाखवला. ‘‘पत्ते तर माझ्याकडे आहेत की, मग याने कशाला आणले.’’ असा विचार करत अन्विताने तो बॉक्स हातात घेऊन उघडला. त्यातले पत्ते बाहेर काढले आणि तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. ओम जणू याच क्षणाची वाट बघत होता. ‘‘हे पत्ते असे काय वेगळेच.’’ असा भाव अन्विताच्या चेहऱ्यावर उमटलेला बघून ओम म्हणाला, ‘‘या खेळाला ‘उनो’ (वठड) म्हणतात. चल आपण खेळू या. मी शिकवतो तुला.’’ अन्विताही उत्सुकतेने बघत होती.
ओम पुढे म्हणाला, ‘‘दिसायला हा खेळ थोडा पत्त्यांसारखाच दिसतो. पण तो खेळायची पद्धत, नियम मात्र वेगळे असतात. यात एकूण १०८ कार्डस असतात. हे बघ लाल, लाल, हिरव्या आणि पिवळ्या अशा चार रंगांची २५ कार्डस असतात. त्यांच्यावर ० ते ९ मधले रँक्स असतात. ‘स्किप’, ‘ड्रॉ टू’ आणि ‘रिव्हर्स’ अशी अॅक्शन कार्डसही असतात. शिवाय ‘वाईल्ड’ आणि ‘वाईल्ड ड्रॉ फोर’ अशीही कार्डस असतात. खेळायला सुरुवात करताना प्रत्येकाने सात पानं हातात घ्यायची आणि उरलेल्या पानांचा गठ्ठा करून त्यातलं सगळ्यात वरचं पान आपण रमी खेळताना ठेवतो तसं उलटून ठेवायचं.’’
इतकं सगळं एकदम सांगितल्यामुळे अन्विताच्या थोडं डोक्यावरूनच गेलं. ओमलाही ते जाणवलं. तो म्हणाला, ‘‘असं नुसतं सांगून कोणालाही कळणं जरा कठीणच आहे. पण एक काम कर, खेळायला सुरुवात कर. म्हणजे हळूहळू तुला कळत जाईल आणि आम्ही इथे असेपर्यंत तू एकदम एक्सपर्टच होशील!’’ अन्विताला उनोचा खेळ पटकन कळला नाही तरी तिला ‘डंबो’ वगरे म्हणून न चिडवता ओमने तिला समजावून सांगितलं आणि खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे अन्विताला खूपच बरं वाटलं. ‘‘ओम अन्वितापेक्षा एका वर्षांनेच मोठा आहे, पण नेहमी तिला समजून घेतो.’’ असं आजोबा म्हणालेसुद्धा!
अन्विता आणि ओम उनो खेळायला लागले आणि मग जिंकण्यासाठी सगळ्यात आधी ५०० पॉइंट्सस्कोअर करण्याचा प्रयत्न करायचा, रिव्हर्स कार्ड आलं तर खेळणाऱ्या भिडूंचा क्रम उलट करायचा, वाईल्ड ड्रॉ फोर कार्ड आलं तर चार पानं काढायची अशा सगळ्या गोष्टी अन्विताला समजायला लागल्या. खेळ समजल्यामुळे आता तिला खेळायला मजाही येत होती. थोडी विश्रांती घेऊन झाल्यावर बाबा आणि आजोबाही उनो शिकायला-खेळायला त्यांच्यात येऊन बसले. अन्विताच्या काकाला अशा वेगळ्या खेळांचा किंवा वेगळ्या पदार्थाचा, वस्तूंचा वगरे इतिहास शोधायची आवड होती. म्हणे? एखादा नवीन पदार्थ खाल्ला की पहिल्यांदा तो कोणी केला असेल, पदार्थ कसा सुचला असेल अशा अनेक गोष्टी याला शोधाव्याशा वाटत. तसंच खेळांच्या बाबतीतही तो करत असे. त्यामुळे महिन्याभरापूर्वी जेव्हा त्याने ओमसाठी उनो आणला तेव्हाच त्याचा इतिहासही शोधला होता.
काका म्हणाला, ‘‘उनो हा खेळ मी ओमसाठी अलीकडेच आणला, पण उनोचा इतिहास शोधताना मला कळलं की हा खेळ आमच्या लहानपणीसुद्धा होता. १९७१ मध्ये हा खेळ अस्तित्वात आला. अमेरिकेतल्या सिनसिनाटीमधल्या रॉबिन्स नावाच्या माणसाने उनोचा शोध लावला. हा रॉबिन्स सलून चालवत असे. उनो तयार केल्यावर आधी त्याच्या घरचे लोक किंवा जवळचे मित्र-मत्रिणी उनो खेळत असत. मग त्याला वाटलं की सागळ्यांना उनो फारच आवडतोय तर त्याला आपण इतरांपर्यंतही पोहोचवू या. मग त्याने त्याचे पाच हजार सेट बनवून घेतले. ते करायला त्याला त्या काळी आठ हजार डॉलर्स खर्च करावे लागले, बरं का अन्विता!’’ आठ हजार डॉलर्स म्हणजे किती रुपये होतील त्याची आकडेमोड अन्विता मनातल्या मनात करायला लागली तेवढय़ाात काका पुढे सांगायला लागला, ‘‘आधी रॉबिन्स उनोचे सेट विकायला त्याच्या दुकानातच ठेवायचा. तिथल्या स्थानिक बाजारात जो उनो मिळत असे. मग मात्र रॉबिन्सने त्याचे हक्क विकले आणि नंतरच्या काळात तर मोठय़ा प्रमाणात मार्केटिंग होऊ लागल्यामुळे उनो जगभरात लोकप्रिय झाला.’’
काकाचं बोलणं सुरू असतानाच आई आणि काकू चहाचे कप घेऊन तिथे आल्या. आजीने लाडू-चिवडय़ाचं मोठं ताट सगळ्यांच्या मधे ठेवलं आणि ‘‘गणपतीच्या दर्शनाला माणसं यायला लागतील. त्याआधी चहापाणी आवरा आणि मग काय त्या गप्पा मारत बसा..’’ असं म्हटल्यावर सगळे हसले आणि चहाचा आस्वाद घेऊ लागले!
अंजली कुलकर्णी-शेवडे – anjalicoolkarni@gmail.com