पृथ्वी स्वत:भोवती २४ तासांत फिरते. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वाना दिवस आणि रात्र अनुभवायला मिळतात. भारतात जेव्हा दिवस असतो तेव्हा अमेरिकेत रात्र असते. ज्या वेळेला सूर्य डोक्यावर येतो तेव्हा स्थानिक वेळेनुसार दुपारचे १२ वाजतात. यानुसार जगातल्या बहुतेक देशांनी आपल्या प्रमाणवेळा निश्चित केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया या देशांची रुंदी एवढी जास्त आहे की त्या देशांमध्ये एकापेक्षा जास्त प्रमाणवेळा आहेत. आजचे आपले कोडे हे प्रमाणवेळांवर आधारित आहे.
क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना आज- २९ मार्च रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे खेळला जाणार आहे. स्थानिक वेळेनुसार हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे; आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी नऊ वाजल्यापासून आपण तो पाहू शकणार आहोत. सदर सामना जगभरातील पुढील शहरांत (स्थानिक वेळेनुसार) किती वाजता दिसेल? हे तुम्ही सांगायचे आहे. त्यासाठी तुम्हाला प्रमाणवेळांतील फरकांचा तक्ता सोबत दिलेला आहे.
टीप :- काही देशांमधे सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करण्याच्या उद्देशाने हिवाळ्यात प्रमाणवेळा एका तासाने मागे-पुढे केल्या जातात. त्याला ‘डे लाईट सेव्हिंग’ असे नाव आहे. सोबतच्या तक्त्यातील फरक हे २९ मार्च रोजीचे आहेत.
डोकॅलिटी
पृथ्वी स्वत:भोवती २४ तासांत फिरते. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वाना दिवस आणि रात्र अनुभवायला मिळतात. भारतात जेव्हा दिवस असतो तेव्हा अमेरिकेत रात्र असते.
आणखी वाचा
First published on: 29-03-2015 at 01:19 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use mind