आजचे कोडे शब्दकोडय़ाप्रमाणेच असले तरी ते आकडय़ांवर आधारित आहे. दिलेल्या सूचक माहितीवरून त्याची उत्तरे सोबत दिलेल्या चौकोनात (उभी आणि आडवी) भरायची आहेत. बघा तुम्हाला आवडतं का?
आडवे –
१) पृथ्वी २४ तासात स्वत:भोवती — अंशांच्या कोनात फिरते.
३) भारतीय पंचांगानुसार सूर्य पूर्ण वर्षांत — राशींमध्ये भ्रमण करतो.
४) — कॅरेट म्हणजे शुद्ध सोने.
५) खेळातल्या फाशांवरील बिंदूंची एकूण संख्या —
६) सर्वसाधारणपणे माणसाच्या हृदयाचे दर मिनिटाला — ठोके पडतात.
८) स्क्रॅबल खेळाच्या बोर्डवरील चौकटींची संख्या.
९) लीप वर्षांतील दिवसांची संख्या.
११) एक मिलेनियम म्हणजे — वर्षे
उभे-
१) समुद्रसपाटीस शुद्ध पाण्याचा गोठणबिंदू — अंश फॅरनहीट आहे.
२) बुद्धिबळाच्या पटावरील चौरसांची संख्या.
३) हॉकी, फुटबॉल खेळातील मैदानावरील एका संघातील खेळाडूंची संख्या.
५) माणसाच्या कवटीतील हाडांची संख्या.
६) अमृत महोत्सव म्हणजे — वर्षे पूर्ण झाल्यावर करण्याचा समारंभ.
७) एक मैल म्हणजे — यार्ड.
८) प्रौढ माणसाच्या शरीरातील हाडांची संख्या
९) तास काटा प्रत्येक तासाला — अंश कोनातून पुढे जातो.
१०) हीरकमहोत्सव म्हणजे — वर्षे पूर्ण झाल्यावर करण्याचा समारंभ.
डोकॅलिटी
आजचे कोडे शब्दकोडय़ाप्रमाणेच असले तरी ते आकडय़ांवर आधारित आहे. दिलेल्या सूचक माहितीवरून त्याची उत्तरे सोबत दिलेल्या चौकोनात (उभी आणि आडवी) भरायची आहेत.
First published on: 08-03-2015 at 06:26 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use mind