आजचे कोडे शब्दकोडय़ाप्रमाणेच असले तरी ते आकडय़ांवर आधारित आहे. दिलेल्या सूचक माहितीवरून
आडवे –
१) पृथ्वी २४ तासात स्वत:भोवती — अंशांच्या कोनात फिरते.
३) भारतीय पंचांगानुसार सूर्य पूर्ण वर्षांत — राशींमध्ये भ्रमण करतो.
४) — कॅरेट म्हणजे शुद्ध सोने.
५) खेळातल्या फाशांवरील बिंदूंची एकूण संख्या —
६) सर्वसाधारणपणे माणसाच्या हृदयाचे दर मिनिटाला — ठोके पडतात.
८) स्क्रॅबल खेळाच्या बोर्डवरील चौकटींची संख्या.
९) लीप वर्षांतील दिवसांची संख्या.
११) एक मिलेनियम म्हणजे — वर्षे
उभे-
१) समुद्रसपाटीस शुद्ध पाण्याचा गोठणबिंदू — अंश फॅरनहीट आहे.
२) बुद्धिबळाच्या पटावरील चौरसांची संख्या.
३) हॉकी, फुटबॉल खेळातील मैदानावरील एका संघातील खेळाडूंची संख्या.
५) माणसाच्या कवटीतील हाडांची संख्या.
६) अमृत महोत्सव म्हणजे — वर्षे पूर्ण झाल्यावर करण्याचा समारंभ.
७) एक मैल म्हणजे — यार्ड.
८) प्रौढ माणसाच्या शरीरातील हाडांची संख्या
९) तास काटा प्रत्येक तासाला — अंश कोनातून पुढे जातो.
१०) हीरकमहोत्सव म्हणजे — वर्षे पूर्ण झाल्यावर करण्याचा समारंभ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा