‘भी मरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मारुती स्तोत्र तुम्ही पाठ केले असेलच. कुठलेही कार्य सिद्धीस नेण्यासाठी शरीर सुदृढ आणि निरोगी असावे लागते. त्यासाठी समर्थानी मारुतीची म्हणजेच बलाची उपासना करणारा हा मंत्र जगास दिला. यातील भीमरूपी हे विशेषण त्यांनी धिप्पाड, भव्य, विशाल, बलवान या अर्थाने वापरले आहे, हे आपणास माहीतच आहे. आजच्या कोडय़ात या स्तोत्रातील काही निवडक ओळी दिलेल्या असून, त्यातील वैशिष्टय़पूर्ण शब्दांचे अर्थ सोबत दिलेले आहेत. हे अर्थ श्लोकातील कुठल्या शब्दांसाठी आहेत ते तुम्हाला शोधायचे आहे.
आनंदाचे गाणे
आला उन्हाळा
मुले झाली गोळा
झाडाच्या फांदीवर
बांधला झोपाळा
खेळ म्हणे खास
नाही कसला ध्यास
झोपाळ्यावर बसू आता
तासन् तास
झाडाच्या सावलीत
वेळ मुले घालवीत
झोपाळ्यावर बसायला
पाखरांना बोलवीत
मुले खेळ खेळतात
वाऱ्यासंगे पळतात
झोका उंच घेऊन
आकाशाशी बोलतात
झोके घेती भरभर
फांदी वाजे करकर
आनंदाचे गाणे
साऱ्यांच्या ओठावर
मुले गात बसतात
कुणावर ना रुसतात
टाळी देत उन्हाला
खूप खूप हसतात
-एकनाथ आव्हाड