आजचे कोडे गणितावर आधारीत असले तरी ते शब्दकोडय़ाप्रमाणे सोडवायचे आहे. दिलेली उदाहरणे सोडवून त्याची उत्तरे सोबत दिलेल्या चौकोनात (उभी आणि आडवी) भरायची आहेत. बघा, तुम्हाला आवडतं का?
आडव्या संख्या
१) एका मोठय़ा बॉक्समध्ये १८ छोटे बॉक्सेस आहेत. त्या प्रत्येकात २५ चॉकलेट्स आहेत. तर मोठय़ा बॉक्समध्ये एकूण किती चॉकलेट्स आहेत?
४) अजय, अक्षय, नीरजकडे मिळून ४९ खेळणी आहेत. अक्षयकडे अजयपेक्षा ५ खेळणी जास्त असतील आणि नीरजकडे अक्षयपेक्षा १२ खेळणी कमी असतील तर नीरजकडे किती खेळणी आहेत?
५) मोठय़ात मोठय़ा तीन आकडी संख्येला तीनने दोनदा (म्हणजेच ९ ने) भाग दिला असता ही संख्या मिळते. शिवाय या संख्येला तीनने आणखी एकदा भाग जाऊ शकतो. तर ती संख्या कोणती?
६) अनूने बिस्किटाचे ८ पुडे आणि केकचे २ पुडे आणले. बिस्किटाच्या प्रत्येक पुडय़ात ६ बिस्किटे आणि केकच्या प्रत्येक पुडय़ात ४ केक आहेत. तर अनूने केकपेक्षा किती बिस्किटे जास्त आणली?
७) एक ऑफिस रंगवण्याकरता लागणाऱ्या साहित्यासाठी रंगाऱ्याने २७५० रु. घेतले. ताशी १२५ रु. प्रमाणे त्याने काम केले. त्याला संपूर्ण कामाचे ५००० रु. मिळाले, तर त्याने किती तास काम केले?
८) मी १००४ पानी पुस्तकातली १८२ पाने वाचली. मला पुस्तकाच्या मध्यात पोहोचण्यासाठी अजून किती पाने वाचावी लागतील?
उभ्या संख्या
२) एका पूर्णाक संख्येला ३५ ने भागल्यावर १४३ भागाकार मिळाला आणि बाकी ५ उरली, तर ती संख्या कोणती?
३) एका आठवडय़ात एकूण किती मिनिटे असतात?
५) ह, , , े ची सरासरी १४१ आहे व , , ची सरासरी १३९ आहे, तर ह ची किंमत किती?
७) चौरसांची परिमिती त्रिकोणाच्या परिमितीच्या दुप्पट आहे. त्रिकोणाच्या बाजू ७, ८, ९ अशा आहेत, तर चौरसाच्या बाजूची लांबी किती?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा