चला, आज आपण बँकेत फेरफटका मारू या! बॅंकेसंदर्भात वारंवार कानावर पडणारे काही शब्द हा आपल्या आजच्या कोडय़ाचा विषय आहे. यातले बरेचसे शब्द तुम्हाला पालकांच्या तोंडून तसेच प्रसारमाध्यमांतून कानावर पडले असतीलच. हे शब्द ओळखण्यासाठी आम्ही सूचक माहितीही दिलेली आहे. करा मग सुरुवात! (सोयीसाठी हे शब्द इंग्रजीत दिलेले आहेत.)

अ गट – सूचक माहिती
१) ठरावीक कालावधीसाठी बँकेत ठेवलेली ठेव.
२) ठेवीदाराने ठेवलेल्या व काढलेल्या रकमांच्या नोंदी असलेली छोटी वही.
३) पैसे देणारा.
४) पैसे घेणारा.
५) बँकेच्या एका शाखेने त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेवर एका ठरावीक व्यक्तीला त्यात लिहिलेली रक्कम द्यावी अशी सूचना.
६) खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची ग्राहकाला दिलेली सवलत.
७) ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू व दस्तावेज सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित ठेवघरांची तरतूद.
८) खात्यातील पैसे केव्हाही व कुठेही यंत्राद्वारे काढायची सुविधा.
९) खाते काढू इच्छिणाऱ्याची सर्व माहिती पुराव्यासहित दाखल करण्याची अनिवार्य पद्धत.
१०) व्यवसायासाठीचे व्यवहार या खात्यामार्फत करतात. या खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही.
११) सर्वसामान्य ग्राहकाने आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काढलेले खाते. या खात्यातील रकमेवर व्याज मिळते.
१२) तुमच्या मालकीच्या शेअर्सची नोंद ठेवणारे विशेष खाते.
१३) खात्यातील रक्कम काढणे किंवा खर्ची टाकणे.
१४) खात्यात रक्कम जमा होणे.
१५) वारंवार किंवा नियमितपणे होणारे व्यवहार- जसे की पगार, व्याज, डिव्हिडंड इत्यादी एका खात्यातून इतर अनेक खात्यांत पैसे संगणकाद्वारे थेट भरण्याची सुविधा.
१६) चेक घेऊन येणाऱ्याला त्या चेकची रक्कम देऊ  नये अशा अर्थाची खातेदाराने बँकेला दिलेली सूचना.
१७) चेकच्या तळाशी विशिष्ट शाईने लिहिलेला बँकेच्या शाखेचा नऊ आकडी नंबर.
१८) इन्कम टॅक्स खात्यातर्फे व्यक्तीला किंवा संस्थांना हा नंबर दिला जातो. खाते उघडताना हा आवश्यक असतो.
१९) कर्जाची परतफेड करण्यासाठी ठरवून दिलेला मासिक हप्ता.
२०) बँकेतील मुदत ठेवीवर मिळणारे व्याज दहा हजारापेक्षा जास्त झाले तर त्यातून टॅक्स कापला जाऊन उरलेली रक्कम खातेदाराला दिली जाते.
२१) खाते उघडताना बँकेकडे सादर केलेली खातेदाराची नमुना सही.
२२) ज्या व्यक्तीच्या नावे चेक दिलेला आहे, त्याच्या खात्यातच रक्कम जमा करण्याचा आदेश.
२३) चेक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला रोख रक्कम देण्याचा आदेश.
२४) प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत न जाता घरबसल्या संगणकाद्वारे किंवा स्मार्टफोनद्वारे व्यवहार करण्याची सुविधा.

ब गट – शब्दगट

lr17lr18

अंकुर चव्हाण
५ वी, महात्मा स्कूल,  खांदा कॉलनी, नवी मुंबई<br />lr19

नभ बनये, पहिली, स्वामी विवेकानंदlr20

Story img Loader