दीप्ती विक्रम बारवाल

वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील आदिवासींची एक प्राचीन कला आहे. आदिवासींनी वारली चित्रकलेचा आपल्या आयुष्यातील सण, समारंभ, जीवनातील विविध प्रसंगाचे चित्रण करण्यासाठी वापर केला आहे. वारली चित्रकला हा लोककलेचा उत्तम नमुना आहे.

आदिवासी लोक वारली चित्र काढण्यासाठी गेरू आणि तांदळाच्या पिठाचा वापर करून भिंतींवर, घरांवर सजावटीसाठी चित्रं काढतात. आज आपण जलरंगाचा किंवा पोस्टर रंगांचा वापर न करता पेपर, कॅनव्हास किंवा पुठ्ठ्यावर हे चित्र काढू शकतो. तुम्हाला जे चित्र दिसते आहे त्यामध्ये गेरू आणि खाण्यासाठी वापरला जाणारा चुना या उपलब्ध माध्यमातून काढले आहे. गेरूचा लेप कागदावर लावून खायच्या चुन्याने नक्षीकाम केलेले आहे.

बटाट्याचे त्रिकोणी काप करून तुम्ही चुन्यामध्ये बुडवून छापेही घेऊ शकता. तुम्हीही वारली चित्र आणखी कशाप्रकारे काढू शकता याचा विचार करा. छान छान वारली चित्र काढा आणि मला ई-मेलवर पाठवा. deeptibarwal11 @gmail.com