आमादेर शांतिनिकेतन
मुलांनो, नुकताच शिक्षक दिन साजरा झाला. शिक्षकांचे शिक्षक रवींद्रनाथ टागोरांचं शांतिनिकेतन हे तमाम भारतीयांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे. शांतिनिकेतन नेमकं होत तरी कसं, हे शांतिनिकेतनमध्ये शिकलेल्या
पुस्तकात ठिकठिकाणी खूप सुंदर बंगाली गाणी आहेत. तिथलं शिकणं कसं दडपणरहित होतं हे सांगताना ती लिहिते की, वर्गात शिकताना कंटाळा आला तर पक्ष्यांकडे पाहायला बंदी नव्हती. लिहिता लिहिता हात थकले तर बासरीचे स्वर ऐकायला कुणाचीही ना नव्हती. पाठय़पुस्तकं खूपच चित्रमय होती. ती पुस्तकं न वाटता, आम्हाला मिठाईचा डबा वाटायचा. विद्यार्थ्यांवर हात उगारायचा नाही असा टागोरांचा आदेशच होता. साहित्य सभेत धोतर-कुर्ता व मुलींनी पारंपरिक पोशाख करून लेख, कविता सादर करायच्या. फाल्गुन पौर्णिमेला रात्री सर्व जण बाहेर येत. कधी मुले स्वयंपाकापासून सारी कामे करत. अधूनमधून जवळच्या खेडय़ात मुलांना कामे करायला पाठवून ग्रामीण जीवनाचा परिचय करून देत. व्यक्तिचित्रे लिहून तिने ते शिक्षक जसेच्या तसे आपल्याला भेटविले आहेत. रवींद्रनाथांचे तिने रेखाटलेले चित्र मनात रुतून राहते. केवळ पाच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सुरू केलेलं शांतिनिकेतन समजून घ्यायला हे पुस्तक वाचायलाच हवं
आमादेर शांतिनिकेतन,
मूळ लेखिका – शिवानी,
अनुवाद- आशा साठे,
पृष्ठे- ११७, किंमत -६० रुपये.
कजा कजा मरू प्रकाशन, गरवारे बालभवन, पुणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा