आपल्या शरीरातील अब्जावधी पेशींना अनेक पोषकतत्त्वे तसेच ऑक्सिजन यांच्या सुरळीत पुरवठय़ाची नितांत गरज असते. रक्तामार्फतच त्याचा पुरवठा शरीराला केला जातो. कार्बन डायऑक्साइड आणि इतर टाकाऊ पदार्थाचे वहन करण्याचे महत्त्वाचे कार्य रक्तातून पार पडते. रक्तातून हे टाकाऊ पदार्थ फुप्फुसे, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेपर्यंत नेले जातात. त्यानंतर त्या त्या अवयवांमार्फत ते शरीराबाहेर टाकले जातात. याबरोबरच जंतुसंसर्गाविरोधात लढा देण्यासाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी रक्त मोलाची भूमिका पार पाडते. तसेच शरीरावर कुठेही कापले गेले, जखम झाली तरी काही कालावधीनंतर त्या ठिकाणचे रक्त गोठते. त्यामुळे बाहेरील जीवजंतू शरीरात प्रवेश करण्यापासून रोखले जाते.
आणखी वाचा