२६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन. या दिवशी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात राष्ट्रपतींना सर्व सेनादलांकडून मानवंदना दिली जाते. नौसेना, वायुसेना आणि स्थलसेना आपल्या सर्व वैशिष्टय़ांसह या परेडमध्ये सहभागी होतात. आजचे आपले कोडे हे आपल्या सैन्यदलांमधील अधिकाऱ्यांच्या (ऑफिसर्स) हुद्यांशी संबंधित आहे. सोबत दिलेल्या यादीतील हुद्यांची नौसेना, वायुसेना आणि स्थलसेना यांत तुम्हाला वर्गवारी करायची आहे. काही हुद्दे हे एकापेक्षा जास्त सन्यदलांमध्ये उपयोगात आहेत. वर्गवारी केल्यानंतर हे हुद्दे तुम्हाला अधिकाराच्या उतरत्या क्रमाने लावायचे आहेत.
कॅप्टन (Captain), कमांडर (Commander), विंग कमांडर (Wing Commander), ग्रुप कॅप्टन (Group Captain),  रिअर अ‍ॅडमिरल (Rear Admiral), मेजर (Major), लेफ्टनंट (Lieutenant), एअर मार्शल (Air Marshal),  जनरल (General), अ‍ॅडमिरल (Admiral),  मेजर जनरल (Major General), स्क्वाड्रन लीडर (Squadron Leader), कमोडोर (Commodore), ब्रिगेडियर (Brigadier), कर्नल (Colonel), एअर चीफ मार्शल (Air Chief Marshal), पायलट ऑफिसर (Pilot Officer), व्हाइस अ‍ॅडमिरल (Vice Admiral), एअर कमोडोर (Air Commodore)

उत्तर:

टीप : या यादीत सर्व हुद्यांचा समावेश झालेला नाही.

Story img Loader