‘शहराचा जाहीरनामा, लवकरच..’ अशी बातमी मागच्या आठवड्यात प्रसिद्ध झाली होती. म्हणजे काय? हे काही कळत नव्हतं. लोकांना फार वाट बघायला लागली नाही. सोमवारचं वृत्तपत्र आलं आणि सगळा खुलासा झाला. नेहमीच्या वृत्तपत्राबरोबर एक खास पुरवणी आली होती. पुरवणीचं नाव होतं ‘आपला जाहीरनामा’.

पहिल्या तीन पानांवर छोटे छोटे आयत होते. ते वैयक्तिक जाहीरनामे होते. सर्व वयाचे लोक त्यात होते. मुलांची संख्या जास्ती होती. आपण पर्यावरणासाठी काय करणार, काय टाळणार हे त्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं- ‘आम्ही प्लॅस्टिकऐवजी स्टीलचा डबा वापरू’, ‘पुस्तकांना प्लॅस्टिकचे कव्हर न घालता जुन्या वृत्तपत्राचे कव्हर घालू’, ‘जेथे प्लॅस्टिक टाळणे शक्य नाही तेथे ते परत परत वापरू आणि रिसायकलिंगला पाठवू’, ‘बाल्कनीत फुलपाखरांसाठी एकतरी होस्ट प्लांट लावू’, ‘नदीत कधीही कचरा फेकणार नाही’, ‘आमच्या वाढदिवसाला पार्टी करण्याऐवजी मित्रांना नदी फेरीसाठी घेऊन येऊ आणि नदीबरोबर वाढदिवस साजरा करू’, ‘आवारातली पाने न जाळता त्यांचे खत करू’, ‘शाळेत जायला सायकल वापरू’, ‘जेथे शक्य आहे तेथे कार-पूलिंग करू’, ‘मखरामध्ये थरमोकॉल वापरणार नाही’, ‘दर वेळी वस्तू घेताना याची खरंच गरज आहे का’ हा विचार करू’ आणि असं बरंच काही त्या जाहीरनाम्यांमध्ये लिहिलं होते.

sobhita dhulipala celebrated diwali with naga chaitnya and family
लग्नाआधी सोभिता धुलीपालानं नागा चैतन्याच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी; अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकमुळे वेधलं लक्ष, पाहा फोटो
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
maharashtra irrigation scam
विश्लेषण: सिंचन घोटाळा काय होता? त्यात अजित पवारांविरुद्ध गुन्हा का नाही?
loksatta readers response
लोकमानस : मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रकल्पांचा लाभ मिळत नाही
Teli community in elections, teli against teli, Teli,
निवडणुकीत तेली समाजाचे पक्षीय प्रतिनिधित्व, काही ठिकाणी तर तेली विरुद्ध तेलीच
lokjagar bacchu kadu and prakash ambedkar role in maharashtra assembly
लोकजागर : साटेलोट्यांचे ‘शिलेदार’!
loksatta readers feedback
लोकमानस : खोटे दावे, उपद्रवींना प्राधान्य

मग होते ते कौटुंबिक जाहीरनामे. आई-बाबा आणि मुलांनी मिळून निसर्गासाठी घराच्या पातळीवर काय करता येईल हे ठरवलं होतं. ‘इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडली तर टाकून न देता ती आधी दुरुस्त होते का ते बघू, ‘ट्रेकिंगला जाताना वस्तू विकत घेण्याऐवजी एकमेकांत देवाण-घेवाण करू’, ‘घरच्या समारंभात कधीही सिंगल यूज प्लॅस्टिक वापरणार नाही, त्याऐवजी प्लेट शेअरिंग ग्रुपमधून घेऊ,’ इत्यादी.

पुढच्या पानावर शाळांचे जाहीरनामे होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी, सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून शाळेच्या पातळीवर काही गोष्टी ठरवल्या होत्या. जसे, ‘शाळेच्या आवारातले एकही पान जाळले जाणार नाही, तर खत होऊन परत मातीत जाईल’, ‘शाळेत नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशाबरोबर स्टीलचा डबा आणि स्टीलची बाटलीच आणावी असं सांगण्यात येणार होतं’, ‘शाळेतल्या समारंभात पेपर कपचा वापर बंद केला होता,’ ‘ऑफिस, कॉलेजमध्ये वापरलेले, एका बाजूनं कोरे कागद हस्तकलेसाठी वापरू असं ठरवलं होतं.’

तसंच ऑफिस, विविध सोसायटी, संस्था यांचे जाहीरनामे होते. लोकांनी एकत्र येऊन आपण जेथे राहतो, जेथे काम करतो, ती जागा सुधारण्यासाठी, निसर्गासाठी काय करणार हे जाहीर केलं होतं.

एक गोष्ट स्पष्ट होती. लोक एकत्र येऊन, आपण वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर सगळं मिळून निसर्ग संवर्धनासाठी काय करता येईल हे ठरवत होते. सरकारनं आधी हे केलं पाहिजे, त्यानं ते केलं पाहिजे हा सूर अजिबात नव्हता. आपण काय करू शकतो आणि काय करणार यावर सगळा भर होता.

वृत्तपत्रात शेवटी वेबसाईटची लिंक होती. जागेच्या अभावामुळे अनेक जाहीरनामे छापता आले नव्हते, ते सगळे वेबसाईटवर उपलब्ध होते. ते सगळे एकत्र केले तर संपूर्ण शहर आणि आजूबाजूच्या गावांचा जाहीरनामा तयार होत होता.

‘हे तर पहिलं पाऊल आहे, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, पण सुरुवात तर नक्की झाली आहे’ असं तिथं लिहिलं होतं.

aditideodhar2017@gmail.com