प्रवाहाच्या दिशेने सारेच पोहत असतात, कारण तसे पोहणे सोपे असते. त्यासाठी वेगळे श्रम करावे लागत नाहीत. खरा कस लागतो तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात. अन् प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना शारीरिक अपंगत्व असेल तर प्रवास अगदीच कठीण बनत असतो. पण काही ध्येयवादी माणसे ध्येयाप्रति इतके समर्पित वृत्तीने प्रयत्नांच्या यज्ञकुंडात स्वत:ला झोकून देतात की ‘बावनकशी’ यश त्यांच्या पदरात पडत असते. अशाच एका दुर्दम्य इच्छावादी व यशस्वी उद्योजक जयसिंग चव्हाण यांची ही साहस कथा..

डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे जयसिंग चव्हाण यांना वयाच्या १८व्या महिन्यात कायमचे अपंगत्व आले. मुलाचे दोन्ही पाय निकामी झाल्याचे कळताच आई रंजना व वडील कृष्णकांत यांनी नागपूर व जयपूर येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेऊन अनेकवेळा शस्त्रक्रिया केल्या. मात्र जयसिंगला त्याच्या पायावर उभे करण्यात त्यांना यश मिळले नाही. अन् त्यामुळे जयसिंगला ८७ टक्केकायमचे अपंगत्व आले. अपंगत्वामुळे जयसिंगचे पूर्ण जीवन अधांतरी झाले. त्याचे संपूर्ण जीवन पालकांवर अबलंबून होते. अशात जयसिंगने शाळेत जाण्यास नकार दिला. घरीच राहून लहान भावांची पुस्तके वाचण्यात त्याने पसंती दर्शविली. वयाच्या अठरा वर्षांपर्यंत आई जयसिंगला कडेवर घेऊन जात असे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान

lr06इतवारी भागात राहत्या घराच्या गॅलरीमधून जयसिंग मुलांना खेळताना नेहमी बघत असे. लहानग्या जयसिंगलाही खेळण्याची भरपूर इच्छा व्हायची, मात्र अपंगत्वामुळे ते शक्य होत नसे. मात्र १९९३ मध्ये जयसिंगने पहिल्यांदा धाडस केले. घराजवळ आयोजित संगीतखुर्ची स्पध्रेत त्याने भाग घेतला. काही मुलांनी त्यांची मजादेखील घेतली. मात्र त्याचा आत्मविश्वास ढासळला नाही. अगदी गुडघे रक्तबंबाळ झाले तरीही हार मानली नाही अन् मोठय़ा जिद्दीने खेळत जयसिंग विजयाचा मानकरी ठरला. याच विजयाने जयसिंगच्या जीवनाला नवीन कलाटणी दिली. त्यानंतर जयसिंगने आपले अपंगत्व विसरून पाय आणि हात यांतले अंतर मिटवले आणि यशाच्या दिशेने धावणे सुरू केले.

जयसिंगच्या वडिलांचा घरीच दंतमंजनाचा लघुउद्योग होता. यावरच कुटुंबाची उपजीविका अवलंबून होती. एक दिवस त्यांच्या घराला आग लागली. त्यात उद्योगही जळून खाक झाला. जयसिंगच्या वडिलांचा आर्थिक कणा तर मोडलाच, पण आत्मविश्वासदेखील गेला. त्या काळात जयसिंगच्या घरची परिस्थिती गंभीर झाली होती. आर्थिक संकट आले तर नातेवाईकही पाठ फिरवतात, तेच यांच्याबाबतीत झाले. कोणीही मदत करण्यास तयार नसल्याचे पाहून जयसिंग जिद्दीला पेटला आणि मोडलेला आर्थिक कणा पुन्हा उभारण्याचा पण केला.

नागपूर महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागातर्फे जयसिंगला तीनचाकी भेट मिळाली अन् जयसिंग स्वत:च्या बळावर पहिल्यांदा चार िभतीबाहेर पडला. वडिलांपासून व्यवसायाचे बाळकडू आत्मसात करून जयसिंगने वॉिशग पावडर उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले आणि आईने खाऊसाठी दिलेले चारआणे- पन्नास पसे साठवून जमा झालेले दोनशे रुपये घेऊन आईच्या नावाने उद्योगाला सुरुवात केली. घरीच साबण, डिर्टजट पावडर, फिनाइल, टाइल्स क्लिनर तयार करण्यास प्रारंभ केला. सकाळी उत्पादन करणे आणि दुपारी दिवसभर उत्पादन केलेले साहित्य घेऊन जयसिंग दारोदारी तीनचाकीने फिरायचा. ऊन, पाऊस व थंडीची तमा न बाळगता जयसिंगने शहरातील अनेक हॉटेल्स, किराणा दुकान, बीअर बार येथे जाऊन मालाची विक्री केली. आईने दिलेल्या पशातून उद्योगाला पालवी फुटली अन् बाजारातून मालाच्या गुणवत्तेमुळे मागणी वाढली. अशात जयसिंगने सुवर्ण जयंती कर्ज योजनेंतर्गत ७० हजारांची मागणी केली, पण केवळ २० हजार मंजूर झाले. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने तो पसा घरीच खर्च झाला अन् बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हप्त्यासाठी एकच तगादा लावला. स्वाभिमानी जयसिंगने एका वर्षांत कर्ज फेडले. दरम्यान, पॅकेजिंगचे प्रशिक्षण घेऊन विपणनाचे कौशल्य विकसित केले. शिक्षण कमी असल्याने व्यवसायात अनेक अडचणी येत असल्याचे बघून इंग्रजीच्या खासगी वर्गात प्रवेश मिळवला व अभ्यास करत नॅशनल ओपन स्कूलमधून थेट दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर जयसिंगने स्मॉल फॅक्टरी  एरिया, भंडारा मार्ग, वर्धमाननगर येथे ‘रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ची स्थापना केली. तब्बल १५० लोकांना तेथे रोजगार मिळाला. व्यवसाय वेगात असतानाच ५ मे २०१० रोजी कारखान्याला मोठी आग लागली, अन् क्षणातच होत्याचे नव्हते झाले. लाखो रुपयांची गुंतवणूक आगीत भस्म झाली. बँकेकडे विम्यासाठी गेल्यावर बँकेच्या कर्मचाऱ्याने विमा नूतनीकरण न केल्याचा फटकाही जयसिंगना सहन करावा लागला.

पहिल्यांदा वडिलांचा उद्योग आगीत भस्मसात झाला आणि आता स्वत:चाही उद्योग आगीतच संपला. मात्र जयसिंग खचले नाहीत. धर्याने सर्व परिस्थिती हाताळली. ‘अगर पुरा घर ही जल गया हैं तो बचा क्या है और अगर मैं बच गया हूं तो फिर जला ही क्या हैं,’ असा विचार करून जयसिंगने पुन्हा नव्या उद्योगाकडे वाटचाल केली. पूर्वीच बुटीबोरी भागात घेतलेल्या एक एकर जमिनीवर जयसिंगने नवीन ऑइल रिफायनिरग आणि रिसायकिलग ऑफ युज्ड ऑइलचा कारखाना सुरू केला. त्यासाठी बँक, नातेवाईक व मित्रांनी जयसिंगला मदत केली. यात जयसिंगला दोन्ही लहान भाऊ विजयसिंग व विक्रमसिंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कठोर मेहनत आणि काही करण्याची जिद्द उराशी बाळगून जयसिंगने नव्याने सुरू केलेला उद्योगदेखील यशस्वी करून दाखविला.

आज त्यांच्या कारखान्यात तीनशेहून अधिक कामगार आहेत. विशेष म्हणजे जयसिंग यांचा केवळ व्यावसायिक दृष्टिकोन नसून ते सामाजिक बांधिलकीदेखील जोपासत आहेत. कारखान्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीसाठी ते प्राधान्य देतात. आज बुटीबोरी औद्योगिक परिसरात शून्यातून विश्व निर्माण करणारे ते एकमेव यशस्वी उद्योजक आहेत. करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे मालक जयसिंग चव्हाण यांना उद्योग क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००४-२००५ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेतर्फे अपंग उद्योजक आणि समाजसेवेसाठी यशश्री पुरस्कार, २००७ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट स्वयंरोजगार राष्ट्रीय पुरस्कार, २००८ मध्ये जिल्हा उद्योग पुरस्कार, तर २०१६ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्यांग उद्योग भूषण पुरस्कारही मिळाला आहे. परिवारात मोठे असलेले जयसिंग आजही स्वत:ला अपंग मानत नाहीत. कुणाची मदत घेणे त्यांना पसंत नाही. जे काही करायचे ते स्वत:च्या बळावर, अशी  त्यांची जिद्द आहे. त्यांनी व्यवसायासोबतच बी.कॉम.ची पदवीदेखील मिळवली असून ते आता एम.बी.ए. करत आहेत. जयसिंगच्या पत्नी संगीता गृहिणी आहेत. त्यांना कृष्णल नावाचा मुलगाही आहे. भविष्यात आणखी मोठा कारखाना टाकून हजारो लोकांना रोजगार देण्याचा त्यांचा मानस आहे.

अविष्कार देशमुख/ avishkar.deshmukh@expressindia.com

दिनेश गुणे / dinesh.gune@expressindia.com

Story img Loader