स.न.वि.वि

विषय: चिमणी दिनानिमित्त शुभेच्छा देण्याबद्दल

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Childrens day 2024 | childhood days never come back
Children’s day 2024 : बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही! VIDEO पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं

तर उपरोक्त विषयाप्रमाणे तुला जागतिक चिमणी दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…

आता तू म्हणशील अचानक कोण आला हा शुभेच्छा देणारा? तू मला ओळखलंही नसशील ना? खरंच ओळखलसं का गं तू मला?… काय म्हणतेस नाही ओळखलंस?… हे असं डिसपॉइण्टींग असतं ना च्यामारी की आपण एखाद्याला लहानपणापासून ओळखतो आणि ती व्यक्ती (या केसमध्ये पक्षी) भेटल्यावर आपल्याला ओळखतही नाही… मेल्याहून मेल्यासारखं होतं… असो तसा त्यात तुझाही दोष नाही हल्ली तुझी आठवण आम्हाला २० आणि २१ मार्च म्हणजेच तुझ्या नावाने साजरा होणारा दिवस आणि मोबाईल टॉवरचे दुष्परिणाम या दोनच लेखांसंदर्भात होते. त्यामुळे तू आम्हाला लक्षात ठेवण्याची शक्यता कमीच.

पण मी तुला ना अगदी लहानपणापासून ओळखतो. हो म्हणजे अगदी चिऊताई चिऊताई दार उघडपासून…. आम्हा दोघां भावांना अक्कल येण्याआधी राखी बांधणाऱ्या ताईंआधी दोन ताई ओळखीच्या झाल्या त्यातली एक तू म्हणजे चिऊताई आणि दुसरी खारूताई. हे तुम्हाला ताई म्हणणं इतकं सवयीचं झालयं ना. म्हणजे तुला तरी आता मी चिमणी, चिऊ वगैरे म्हणतो पण खारीला अजूनही वयाच्या पंचवीशीनंतरही खाऊताईच म्हणतो. नाही नाही संस्कार वगैरे नाही सवयीचा भाग झाला आहे इतकचं बाकी काही नाही. हे उंदराला मामा म्हणणं, चिमणीला ताई म्हणणं हे असं सगळं ‘The things I like about Being Marathi’ या लिस्टमध्ये येतं.

हा म्हणजे बघं ना या अशा लहानसहान गोष्टी अक्कल येतानाच लहानपणापासूनच आमच्या कळत न कळत इतक्या सहजपणे शिकवल्या जातात की त्या डिग्री घेतल्यानंतरही डोक्यातून जात नाहीत. अर्थात चांगल्या अर्थाने म्हणतोय हे मी. कारण आजही या गोष्टींबद्दलचे प्रेमच या ताई, मामा, दादा मधून दिसून येते. या गोष्टी मनावर इतक्या खोलवर रुझवल्या गेल्यात ना हे आत्ता आत्ता लिहायला वाचायला लागल्यावर थोडं कळायला लागल्यावर लक्षात येतंय. म्हणजे लहान मुलीला कसली क्यूट दिसतेय ऐवजी ‘ए.. चिमणे इकडे ये’ म्हटल्यावर जो आपलेपणा वाटतो ना त्या चिमणेमध्ये तो मोजण्यापलिकडचा आहे. कसला मस्त शब्द आहे ना हा… चिमणे!

लहान असताना किंवा अगदी चार पाच वर्षापूर्वीपर्यंत चिऊ-काऊची गोष्ट ऐकत एक घास चिऊचा एक घास काऊचा करत घरभर भ्रमंती करून आई किंवा आज्जीच्या हातचे छोटे छोटे घास असलेला डाळभात एकीकडे आणि आज टॅब किंवा मोबाईल हातात ठेऊन पोरांना भरवणं एकीकडे. चिमण्या जश्या नामशेष झाल्या तसंच हा नाजूकपणा, खरेपणाही. आज ‘आमचा हा ना युट्यूब सुरु असल्याशिवाय काही खातच नाही’, असं आया अभिमानाने कसं सांगू शकतात असा प्रश्न पडतो. तुला समजेल असं सांगायचं झालं तर झालंय काय की तू जशी कमी कमी दिसू लागलीयस ना तसाचं सगळा नैसर्गिकपणा पण हळूहळू कमी होऊन हे असं युट्यूब वगैरेच्या माध्यमातून कृत्रिमपणा आलाय आणि तोही पार बालपणापासूनच. आधीच्या चिऊची जागा आता अँग्री बर्डने घेतलीय तर काऊ म्हणजे आमच्या छोटूला कावळा दूरदूरपर्यंत आठवणे शक्यच नाही कारण तो ज्या इंग्रजी प्ले स्कुलमध्ये जातो तेथील शिकवणीनुसार काऊ म्हणजे गाय. (घ्या कपाळावर हात मारुनवाला इमोन्जी)

पण तू घाबरू नकोस मला किंवा एकंदरितच 90’s Kids ला आजही ‘माझा आवडता पक्षी’ असा निबंध आजही लिहायला सांगितला तर चिमणीवरच लिहितील अनेकजण. अगं हसतेस काय खरंच सांगतोय उगचं खोटं खोटं तुला बरं वाटावं म्हणून नाही म्हणतंय हे असं.

सध्या दिसत नाहीस ताई तू वरचेवर. हो म्हणजे रोज शोधत नाही तुला पण बरचं काही शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून. तू अगदी लहानपणापासून तुझ्या गोष्टीमधून शिकवत आलीयस हे आत्ता थोडं लॉजिक लावल्यावर कळतंय. जेव्हा कावळा तुझ्या घराबाहेरून चिऊताई चिऊताई दार उघड ओरडत होता तेव्हा तु तुझ्या बाळाला दिलेले प्राधान्य असो किंवा पाऊस पडेल म्हणून दूरदृष्टीने आधीच पक्के घरटे बांधून घेणं असो बरंच काही तू रीड बिटवीन द लाईन टाइप शिवत गेलीस. आम्ही जसे मोठे झालोयत ना तसं तुझ्याकडून शिकण्याच्या गोष्टींकडे पाहण्याची आमची पद्धत बदललीय. आज तुला शोधताना तुझ्याकडून शिकण्यासारखी एक गोष्ट समजली ती म्हणजे सर्वांमध्ये राहून आपल्याच जगात राहणं तुला छान जमतं बरं का. म्हणजे तू अस्तित्वात आहेस की नाही कळतंही नाही. दुसरी तुझ्याकडून शिकण्याची गोष्ट की आपल्या कामात आपण सुखी रहावं. बघं ना आता तुला केवळ स्वत:च्या खाण्याशी आणि उडण्याशी देणंघेणं असतं. कोणाला तुझा त्रास नाही की कधी तक्रार नाही. तू दिसलीच तर बोनसच समजायचा या ठाण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये. अक्कल आल्यापासून मी कावळ्यांचा त्रास, कबुतरांचा त्रास, कोंबड्यांचा त्रास असं ऐकलंय पण चिमण्यांचा त्रास आत्तापर्यंत ऐकलं नाही. नाही सांगून तरी टाकं तू त्रास देतच नाहीस की मी ऐकलंय नाहीय.

आणि तू दिसतेही कसली सुंदर गं. आहेस अगदी मुठीच्या आकाराइतकी पण तो तपकिरी, चॉकलेटी आणि क्रिम रंगाचा अल्टीमेट कॉम्बोवाला लूक ‘चिमणी’ हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर येतो. तुझ्यातील सौंदर्याबद्दल थोडा विचार केला की समजतं गोंडस लहान मुलीला उगच ‘अगं ए चिमणे…’ नाही म्हणतं कोणी.

तू आज दिसेनासी झालीय आज मुद्दाम शोधत होतो तुला पण काही दिसली नाहीस. काही दिवसापूर्वी दोन की तीनच दिसल्या होत्या पण दिसल्या यातच सगळं आलं असं मला वाटतं. म्हणजे मी राहतो त्या ठाण्यात अजून तू सुद्धा राहतेस हे छाती ठोकपणे तरी सांगता येतेय याचा विशेष समाधान आहे. आता ही छाती किती वर्षे ठोकता येईल हा वेगळा प्रश्न पण खरंच या गोंडस त्रास न देणाऱ्या तुझ्यासारख्या लहानपणापासून सोबत करणाऱ्या आणि बालपणीच्या आठवणींचा अविभाज्य भाग असलेल्या पक्षाला वाचवायला हवे हे कळतंय पण वळतं नाहीय असं झालंय. आजच एक छान बातमी वाचली की तू आम्ही देऊ केलेली रेडीमेड घरं स्वीकारू लागलीयस. कसलं भन्नाट ना. आमच्यापैकी काही सेन्सेबल लोकांच्या या प्रयत्नांना साथ देत असल्याबद्दल पुन्हा एकदा थँक यू… नाही नाही आपलं नातं सॉरी- थँक यूच्या बंधनातलं फॉर्मल नातं नाहीय तरी थँक यू…

अशीच वरचे वर भेटत जा…

परत एकदा तुला जागतिक चिमणी दिनाच्या शुभेच्छा ‘ताई’….

पत्राचं उत्तर देशील का गं?

तुझाच

लहानपणापासूनचा सोबती

– स्वप्निल घंगाळे

swapnil.ghangale@loksatta.com