कित्येक सेलिब्रिटीजची पोलखोल करणारा, गॉसिप्सनी भरपूर असा ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझन नुकताच सुरू झाला आहे. करण जोहरच्या या चॅट शोमध्ये पहिल्याच भागात दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंह या बॉलिवूडच्या आयकॉनिक जोडीने हजेरी लावली अन् नेहमीप्रमाणेच या पहिल्या भागामुळे सोशल मीडियावर वातावरण गढूळ झालेलं पाहायला मिळत आहे. या भागात करणने दीपिका आणि रणवीर दोघांनाही त्यांच्या भूतकाळाबद्दल आणि त्यांच्या आत्ताच्या नात्याबद्दल बरेच प्रश्न विचारले आणि त्यांची या दोघांनी अत्यंत मानमोकळेपणे उत्तरंही दिली.

याच भागात आपल्या लव्ह लाईफबद्दल आणि एकूणच भूतकाळातील घटनांबद्दल दीपिकाने असं वक्तव्य केलं जे रणवीर सिंहच्याही जिव्हारी लागल्याचं त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. दीपिकाच्या या वक्तव्यावरुन तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे. रणवीरविषयी भावना मनात असतानासुद्धा दीपिका इतर लोकांना भेटत होती, आपल्यासाठी योग्य जोडीदार शोधत होती पण शेवटी तिचे विचार रणवीरपाशीच येऊन थांबायचे असं काहीसं विधान दीपिकाने केलं आहे.

aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
Manisha Kelkar Success Story
मराठी अभिनेत्रीची यशोगाथा! जागतिक पातळीवर करतेय देशाचं प्रतिनिधित्व, ‘कार रेसर’ म्हणून मिळवली ओळख, जाणून घ्या…
Siddharth Chandekar & Mitali Mayekar first movie together
Video : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा पहिला चित्रपट! नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार, पाहा पहिली झलक

आणखी वाचा : Gadkari Review: अत्यंत उथळ, सुमार अन् भरकटलेला चित्रपट

या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी तिला चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. नेमकं दीपिका काय म्हणाली हे जाणून घेऊया. ती म्हणाली, “मी त्यावेळी सिंगल होते, रणवीरसुद्धा एका जुन्या नात्यातून बाहेर पडत होता, अन् त्यावेळी मला सिंगलच राहायचं होतं, कोणामध्येही मला मानसिकरीत्या गुंतायचं नव्हतं, मला कसलीही कमिटमेंट द्यायची नव्हती, मला फक्त धमाल, मजा करायची होती, कारण ते वयच तसं असतं.”

पुढे दीपिका म्हणाली, “त्यानंतर माझ्या आयुष्यात रणवीर आला, पण मी त्याला कसलंही वचन दिलेलं नव्हतं किंवा कसलीही कबुली दिली नव्हती. त्याने जोवर मला प्रपोज केलं नाही तोवर मी त्याला काहीही कमिट केलं नव्हतं. तो एक असा काळ होता जेव्हा आम्ही आमचा योग्य जोडीदार शोधण्यासाठी इतरांना भेटत होतो काही पर्याय बघत होतो, पण माझ्या डोक्यात सतत रणवीरचाच विचार असायचा. माझं मन घुमून फिरून त्याच्यापाशीच यायचे.” दीपिकाचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. इतकंच नव्हे तर एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे ज्यात त्या वक्तव्यादरम्यान रणवीरला धक्का बसल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे.

दीपिकाच्या या वक्तव्यावर बऱ्याच लोकांनी टीका केली आहे तर काहींनी दीपिकाची बाजू घेत जुन्या गोष्टी उकरून काढायला सुरुवात केली आहे. कित्येकांनी दीपिका पदूकोणने केलेलं हे वक्तव्य अजिबात चुकीचं नसल्याचं मत मांडलं आहे. अभिनेता वीर दासनेसुद्धा सोशल मीडियावर होणाऱ्या या ट्रोलिंगची दखल घेत दीपिकाची बाजू घेतली, पण एकूणच आपण जरा तटस्थ राहून यावर विचार केला तर आपल्याला नेमकं चित्र आपोआप समोर येईल. दीपिकाचा भूतकाळ रणबीर कपूरमुळे तिला त्रासदायक ठरला असला तरी दीपिका ही स्वतः काही पूर्ण योग्य आहे अशातलाही भाग नाही.

२०१२ मध्ये दीपिका आणि रणवीर यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असं नुकतंच या दोघांनी करण जोहरच्या चॅटशोवर कबूल केलं. त्याआधी दीपिका आणि क्रिकेटर युवराज सिंग यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या, त्यानंतर दीपिकाने त्याला रणबीरसाठी सोडल्याचा खुद्द युवराजने खुलासा केला होता. त्यामुळे रणबीरबरोबर रिलेशनशिपमध्ये असतानासुद्धा तिच्या डोक्यात केवळ रणवीर सिंहचाच विचार सुरू होता ही गोष्ट कदाचित खटकणारी वाटुच शकते नाही का?

इतकंच नव्हे तर रणबीरपासून फारकत घेतल्यावर दीपिकाचं नाव विजय मल्याच्या मुलाशी, सिद्धार्थशी जोडलं गेलं. आरसीबी सामना जिंकल्यावर जेव्हा सिद्धार्थने भर स्टेडियममध्ये दीपिकाला किस केलं अन् तो फोटो व्हायरल झाला तेव्हासुद्धा दीपिकाच्या मनात फक्त आणि फक्त रणवीर सिंहच होता नाही का? पदोपदी मुलाखतीच्या माध्यमातून रणबीर कपूरवर ताशेरे ओढणाऱ्या दीपिकाविषयी जेव्हा रणबीरला सिमी गरेवाल यांनी त्यांच्या टॉक शोमध्ये विचारलं तेव्हा रणबीरने दिलेलं उत्तर ऐकून नेमकी दीपिका खरी की रणबीर खरा या संभ्रमात तुम्ही पडाल. या मुलाखतीमध्ये रणबीर म्हणाला, “माझ्या मनात दीपिकाविषयी आदरच आहे, आमचं खरंच एक सुंदर नातं तयार झालं होतं. तिच्या मनात माझ्याबद्दल बरीच कटुता आहे. मुलाखतींच्या माध्यमातून अशा रीतीने भाष्य करण्यापेक्षा तिने जर मला फोन करून सांगितलं असतं तर अधिक बरं झालं असतं. अर्थात हे तिचं आयुष्य आहे, पण माझ्या मनात आजही तिच्याबद्दल आदरच आहे.”

आज ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमध्ये “मला त्यावेळी कोणत्याही बंधनात अडकायचं नव्हतं” असं दीपिका टाहो फोडून बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे, पण तुम्हाला माहितीये का की याच शोमध्ये काही वर्षांपूर्वी दीपिकाने याच्या अगदी विपरीत वक्तव्य केलं होतं. दीपिकाने जेव्हा प्रियांका चोप्राबरोबर ‘कॉफी विथ करण’मध्ये काही वर्षांपूर्वी हजेरी लावली तेव्हा तेव्हा ती म्हणाली, “अगदी सहज म्हणून डेटिंग करणं हे माझ्या आकलनापलीकडचं आहे. डेटिंग करणं पण कोणत्याही बंधनात अडकण्यास तयार नसणं ही गोष्टच माझ्या पचनी पडत नाही.” कदाचित दीपिकाला आपल्या स्वतःच्याच वक्तव्याचा विसर पडला असावा. बरं ते डेटिंग वगैरे ठेवा बाजूला दीपिकाने तर थेट विवाहबाह्य संबंधसुद्धा कसे योग्य असतात हे सिद्ध करायचा केविलवाणा प्रयत्न ‘माय चॉइस’ नावाच्या जाहिरातीच्या कॅम्पेनमधून केला होता ज्यावरून लोक आजही तिला ट्रोल करत आहेत. आता तुम्हीच सांगा इतकं होऊनसुद्धा दीपिका पुन्हा तोच मुखवटा घेऊन कॉफी विथ करणमध्ये येऊन आपल्या नवऱ्याबरोबर बसून आपल्या याच गोष्टींचं, वक्तव्याचं समर्थन करणार असेल तर लोक तरी स्वस्थ बसणार आहेत का? ये पब्लिक सब जानती है दीपिका!

ज्या अभिनेत्रीकडे देशातील युथ आयकॉन म्हणून पाहिलं जातं त्या दीपिका पदूकोणच्या या दुटप्पी वागण्यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे चित्रपटसृष्टी आणि त्यामागील झगमगाटाच्या पलीकडे एक भयाण वास्तव लपलेलं आहे. हे वास्तव वारंवार आपल्यासमोर आलेलं आहे तरी आपली लोक त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा करतात. ही इंडस्ट्री पार आतपर्यंत पोखरली गेली आहे, नाती, प्रेम जिव्हाळा या सगळ्याचा खेळखंडोबा करून या तथाकथित युथ आयकॉन्स आणि सेलिब्रिटी जोडप्यांनी काही वेगळेच आदर्श सध्याच्या पिढीसमोर ठेवले आहेत. त्यामुळे तटस्थ राहून, कोणत्याही गोष्टीचा नीट विचार करूनच आपण एखाद्या निष्कर्षावर पोहोचणं हे आजच्या काळात फार गरजेचं आहे.

Story img Loader