सध्या कोपऱ्यावरचा नाका, चावडीपासून ते सोशल मीडियावरील असंख्य वॉल्स आणि प्रोफाईल्सवर रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची जबरदस्त चर्चा आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस उलटले आहेत अन् याबद्दल वेगवेगळी मतं आपल्यासमोर येत आहेत. चित्रपट म्हटलं की त्यावर वेगवेगळी मतं येणार ही गोष्ट स्वाभाविक आहे. सोशल मीडियाचा वापर वाढल्याने सर्वसामान्य प्रेक्षकही चित्रपटाची समीक्षा वगैरे करू लागला आहे. यामुळे झालेला एक बदल प्रकर्षाने जाणवतो, तो म्हणजे कोणत्याही बाबतीतली तीव्र मतं किंवा विचारधारा. एखाद्याला एखादी कलाकृती इतकी आवडते की त्यासम दुसरं काहीच नाही अशी धारणा त्या व्यक्तीची होती याउलट एखाद्या व्यक्तीला एखादी कलाकृती आवडली नाही की शक्य होईल तितकं त्याबद्दल अपप्रचार किंवा वाईट बोलायचाच प्रयत्न ती व्यक्ती करते. सुवर्णमध्य साधून एक प्रेक्षक म्हणून त्या कलाकृतीचा आनंद घेणं आणि त्यावर प्रांजळ मत मांडणं हा प्रकार तर दुर्मिळच झाला आहे. एकाने ‘अ’ म्हंटलं की समोरचा ‘ट’ म्हणणार हीच वृत्ती सध्या सगळ्याच बाबतीत अन् खासकरून चित्रपटांच्या बाबतीत सोशल मीडियावर मत मांडताना पाहायला मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : Animal Review: वडील-मुलाच्या विचित्र नात्याची, आजवर कधीही न ऐकलेली अन् पाहिलेली अस्वस्थ करणारी ‘हिंसक’ गोष्ट

‘अ‍ॅनिमल’च्या बाबतीतही असेच दोन टोकाचे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. ज्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे ते लोक या चित्रपटात मांडलेल्या काही प्रचंड प्रॉब्लेमॅटीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याचंही स्पष्टीकरण देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत तर ज्यांना हा चित्रपट आवडलेला नाही त्यांनी याचा अपप्रचार करण्यासाठी ‘Misogyny’, ‘Toxic-Masculinity’सारख्या बऱ्याच गोष्टींच्या कुबड्या घेऊन या चित्रपटाशी जोडलेल्या कलाकारांवरही वैयक्तिक टीका करायला सुरुवात केली आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने एका प्रसिद्ध मीडिया हाऊसला जेव्हा मुलाखत दिली त्यावेळी त्यांने अत्यंत स्पष्टपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील आक्रमक समीक्षण यावर भाष्य केलं होतं. त्या मुलाखतीमध्ये तो हे म्हणालाच की हिंसक चित्रपट काय असतो ते तो लवकरच दाखवेल, पण त्याबरोबरच त्याने आणखी एक वक्तव्य केलं होतं की ‘कबीर सिंह’च्या वेळेस समीक्षकांनी कथा, पटकथा, तंत्रज्ञ, पार्श्वसंगीत या सगळ्या चित्रपटाच्या मुख्य अंगांना बगल देऊन अत्यंत एकांगी समीक्षण केलं. दुर्दैवाने हीच गोष्ट ‘अ‍ॅनिमल’च्या बाबतीतही घडताना दिसत आहे अन् इथे संदीप रेड्डी वांगा याने पुन्हा स्वतःचा मुद्दा सिद्ध करून दाखवला आहे. ज्या गोष्टींमुळे ‘कबीर सिंग’ वादाच्या भोवऱ्यात अडकला त्याच गोष्टींमुळे ‘अ‍ॅनिमल’वर सुद्धा टीका होताना दिसत आहे.

आपण नीट लक्ष दिलं तर ‘अ‍ॅनिमल’ वर टीका व्हायला हिंसाचार किंवा रक्तपात कारणीभूत नाही. तर सामाजिक मान्यतेला झुगारून काही विषयांवर दिग्दर्शकाने केलेलं परखड भाष्य यामुळे या चित्रपटावर जास्त टीका होत आहे. चित्रपटातील मुख्य पात्रं रणविजयचं आपल्या बहीणींप्रती असलेली प्रेम आणि ते प्रेम एका वेगळ्या पद्धतीने दाखवण्याची पद्धत, त्याची वर्तणूक, बहीणींवर वर्चस्व गाजवणं या वृत्तीला काही तथाकथित बुद्धिजीवी लोकांनी ‘Toxic Masculinty’ म्हणत नाकारलं आहे. चित्रपटातील तो सीन नीट आठवा जिथे रणबीर आपल्या बहिणीला घेऊन तिच्या कॉलेजमध्ये जाऊन रायफल चालवतो, तो सीन पाहिला तर आपल्याला ध्यानात येईल की त्याजागी इतर कोणतीही व्यक्ती असती त्यानेदेखील असेच काहीसे पाऊल उचलले असते. आपल्या बहिणीला छेडलं म्हणून काय आपण रणबीरसारखं एके ४७ घेऊन कॉलेजमध्ये दंगा घालणार नाही की महागडी पजेरो घेऊन त्या गुंडांच्या मागे लागणार नाही, परंतु त्यावेळी एक पुरुष म्हणून आपल्याकडून जे शक्य होईल ते आपण नक्कीच करू अन् यात काहीच गैर नाही, कारण काही परिस्थितीत जेव्हा तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येतं आणि त्यावेळी जर तुमच्या कुटुंबाचा प्रमुख सदस्य तिथे उपस्थित नसेल तेव्हा तुम्हाला काही ‘Masculine’ अॅक्शन या घ्याव्याच लागतात आणि हेच चित्रण चित्रपटात करण्यात आलं आहे.

खरी ‘Toxic Masculinity’ चित्रपटात मध्यंतरानंतर दाखवण्यात आली आहे जेव्हा रणविजय आपल्या पत्नीला फसवून एका दुसऱ्या स्त्रीबरोबर शारीरिक संबंध ठेवतो अन् नंतर त्याची पत्नीला कबुली देतो. बरं इथेही तो त्याची चूक कबूल करतानाच दाखवलेला आहे. ‘फोर मोर शॉट्स’ किंवा ‘विरे दी वेडिंग’सारख्या असंख्य सीरिज आणि चित्रपटातील निर्बुद्ध महिलांप्रमाणे ‘Sexual liberation’च्या नावाखाली कोणताही धिंगाणा घालताना दाखवलेलं नाही. चित्रपटात रणबीरचं ते कृत्य नकारात्मक पद्धतीनेच दाखवण्यात आलं आहे. जेव्हा रणविजय ही गोष्ट कबूल करतो तेव्हा त्याची पत्नी गीतांजली त्याला म्हणते की आता तीदेखील एका परपुरुषाबरोबर संबंध ठेवेल तेव्हा रणविजय तिला जीवे मारायची धमकी देतो. ही खरी ‘Toxic Masculinity’ आहे, पण हा सीन बऱ्याच लोकांनी नीट पाहिलेला नाही कारण तो सीन अन् त्यामागची मानसिकता व बारकावे समजून घेण्यापेक्षा लोकांना रश्मिका मंदानाच्या डायलॉग डिलिव्हरीवर हसायचं होतं ना! त्यामुळे लोकांना हा फरक नेमका समजलेलाच नही. बरं चित्रपटात रणबीरचं पात्र हे अजिबात कुठेही ग्लोरीफाय केलेलं नाही, उलट ते शक्य होईल तितकं नकारात्मक पद्धतीनेच दाखवण्यात आलं आहे. ‘अल्फामेल’ ही संकल्पना आणि त्यामागचा अर्थ गीतांजलीला समजावून सांगणारा रणविजय अन् आपल्याच कित्येक चुकीच्या अन् घाणेरड्या कृत्याचे स्पष्टीकरण देण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा निर्ढावलेला ‘अ‍ॅनिमल’ या दोन परस्परविरोधी बाजू संदीप रेड्डी वांगाने ज्या ताकदीने मांडल्या आहेत ते समजून घ्यायला हा चित्रपट सर्वप्रथम एक कलाकृती म्हणून पहावा लागतो. केवळ एखाद्या कलाकाराला टार्गेट करायचं, केवळ काहीतरी शब्द खरडायचे म्हणून चित्रपट पाहिला तर अशीच तीव्र टोकाची मतं तयार होतात.

फोटो : सोशल मीडिया

याहीपलीकडे जाऊन कित्येकांनी या चित्रपटामध्ये लॉजिक शोधायचा जो पराक्रम केला आहे तो तर हास्यास्पद आहे. आपल्या पाळीव कुत्र्याला मारल्यावर असाच किंबहुना याहीपेक्षा भयंकर असा हिंसाचार करणाऱ्या ‘जॉन वीक’मध्ये या लोकांना लॉजिक दिसलं नव्हतं का? ‘मिशन इम्पोसीबल’मध्ये टॉम क्रुज जे काही करतो त्यावेळी ही मंडळी लॉजिकची भाषा का करत नाही? क्वेन्टिन टेरेन्टिनोच्या चित्रपटात हाच हिंसाचार चविने पाहताना कुणीच लॉजिकबद्दल काहीच का बोलत नाही? इतकंच कशाला गेला बाजार शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये तो ज्या तुरुंगाचा जेलर दाखवला आहे तसं जेल या पृथ्वीतलावर कुणी शोधून दाखवेल का? ‘टायगर ३’मध्ये सलमान खान पाकिस्तानला मदत करण्यासाठी जो आटा-पिटा करतो त्यावेळी कुणीच लॉजिकबद्दल का बोलत नाही? मग रणबीर आणि वांगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’च्या बाबतीतच हा दुजाभाव का? वांगाने खुलेआम बॉलिवूडला ललकारलं म्हणून की त्यांनी खरंच एक वेगळ्या धाटणीचा प्रयोग सादर करून लोकांची तोंडं बंद केली म्हणून, याचं उत्तर तुम्हालाही माहित आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर ५०० लोकांना क्रूरपणे मारूनही त्याला पोलिस का हात लावत नाहीत? त्या हॉटेलमध्ये ५०० कीलोची मशीन गन आणताना उपेंद्र लिमयेच्या पात्राने टोल भरला होता की नाही? असे बाळबोध प्रश्न ज्यांना पडले आहेत खरंच त्यांच्या बुद्धीमत्तेची कीव करावीशी वाटते, कारण हा एक काल्पनिक चित्रपट आहे हे ही मंडळी सोयीस्कररित्या विसरली आहेत.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह इंटीमेट सीन देणारी तृप्ती डिमरी रातोरात बनली नॅशनल क्रश; जाणून घ्या अभिनेत्रीचा प्रवास

याबरोबरच चित्रपटाचा फर्स्ट हाफ हा उत्कृष्ट आणि सेकंड हाफ हा अत्यंत टुकार असं म्हणणाऱ्या लोकांना चित्रपट खरंच कळला नसावा किंवा त्यांची बौद्धिक कुवत ही ‘टायगर’ आणि ‘पठाण’ पुरतीच मर्यादित असावी असा माझा अंदाज आहे. कारण रणविजय ते अ‍ॅनिमल हा प्रवास खरा चित्रपटाच्या उत्तरार्धात उलगडण्यात आला आहे. पोस्ट क्रेडिटला रणबीरचे भयावह रूप आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यासमोर पुढच्या भागात उभं राहणाऱ्या रणविजयसाठी उत्तरार्ध बांधण्यात आला आहे. अर्थात यामध्ये तृप्ती डीमरीचं पात्रं, रणबीरचं तिच्याकडे आकर्षित होणं अन् पुढील भावनिक गुंतागुंत हा एक सबप्लॉट सोडला तर बाकी सगळ्याच बाबतीत ‘अ‍ॅनिमल’चा उत्तरार्ध खऱ्या अर्थाने तगडा आहे. ‘अ‍ॅनिमल’चा शेवटचा अनिल कपूर आणि रणबीर कपूरच्या सीनमध्येच या सगळ्या कोलाहलामागचं सार मांडलं आहे. रणविजयची आपल्या कुटुंबाप्रती असलेली काळजी अन् प्रेम जेव्हा कोणाच्याच ध्यानात येत नाही तेव्हा त्याचा पडलेला हताश चेहेरा खूप काही सांगून जातो. चुकीचा मार्ग अवलंबूनही आपल्या बापाला जसं अपेक्षित होता तसा मुलगा आपण होऊ शकलो नाही याची खंत त्याच्या चेहेऱ्यावर साफ पाहायला मिळते. रणबीरचा हा आतून पार पोखरलेला रणविजय लोकांसमोर आणण्यासाठीच उत्तरार्धातील कित्येक सीन्सची नितांत गरज होती हे आपल्याला तेव्हाच ध्यानात येतं.

चित्रपटात बॉबी देओलला स्क्रीन टाइम आणखी द्यायला हवा होता हे मत मांडणाऱ्या लोकांवर तर हसावं का रडावं हाच प्रश्न मला पडतो. मुळात बॉबी या चित्रपटातून कमबॅक करत असला तरी हा चित्रपट काय ‘गदर २’सारखा बॉबी देओल शो नव्हता. बरं त्यातूनही बॉबीच्या वाट्याला आलेले मोजके तीन सीन्स हे इतिहास रचणारे आहेत. बॉबीचं पात्र अब्रार हक हा तिसऱ्या महिलेबरोबर लग्न करताना दाखवण्यात आला आहे, तो बोलू शकत नसण्यामागेदेखील असाच काहीसा इतिहास दडलेला आहे. जेव्हा आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी त्याला मिळते तेव्हा त्या बातमी देणाऱ्यालाच बॉबी भर लग्नात सगळ्यांसमोर अत्यंत क्रूरपणे ठार मारतो, त्यानंतर तो आपल्या तिसऱ्या पत्नीबरोबर तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांसमोरच सेक्स करायला सुरुवात करतो. यानंतर लगेचच पुढच्या सीनमध्ये आपल्या तीनही बायकांबरोबर तो फोरसम आणि लैंगिक शोषण करताना पाहायला मिळतो. माझ्यामते विकृत खलनायक उभा करण्यासाठी बॉबीचे हे तीन सीन पुरेसे आहेत. बॉबीचा रोल आणखी वाढवला असता तर त्याची याहून भयावह कृत्य आपल्याला पहावी लागली असती अन् मग बॉबीला आणखी सीन हवे असं म्हणणारी हीच मंडळीच त्याच्या या पात्रावर टीका करू लागली असती. आणि बरं का, त्या भोळ्या भाबड्या टीकाकरांना इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की बॉबीचे पात्र हे खरे ‘Toxic Masculinity’चे सर्वात मोठे उदाहरण आहे, पण तिथे फारसं कुणी लक्ष देणार नाही. माझ्यामते ‘संघर्ष’मधला आशुतोष राणा, ‘मर्डर २’मधला प्रशांत नारायणनंतर ‘अ‍ॅनिमल’मधल्या बॉबीचाच नंबर लागेल. अंगावर शिसारी आणणाऱ्या, लोकांची झोप उडवणाऱ्या या बॉबीच्या पात्राबाबत एक गोष्ट वाटते की “रोल बडा होना चाहिये, लंबा नही.” बॉबीनेदेखील हाच विचार करून ही भूमिका स्वीकारली असणार याची मला खात्री आहे.

फोटो : सोशल मीडिया

या सगळ्या गोष्टींचा विचार करता ‘अ‍ॅनिमल’ हा फारच उत्कृष्ट चित्रपट आहे का? तर नाही, यातही बऱ्याच त्रुटी आहेत, प्रॉब्लेमॅटीक गोष्टी आहेत. पण म्हणून आपण त्याच्या इतर बाबींकडेही दुर्लक्ष करणार आहोत का? कीर्तनाने समाज जसा सुधारत नाही तसाच तो तमाशाने बिघडतही नाही हे आपल्या ध्यानात कधी येणार कोणास ठाऊक? ‘सैराट’पाहून पोरा-पोरींचं पळून जाणं आणि ऑनर किलिंग थांबलं का? ‘दिल्ली क्राइम’सारख्या सीरिजनंतर देशातील बलात्कार थांबले का? ‘पीके’ किंवा ‘ओह माय गॉड’ पाहून लोकांनी देवाच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह उभं करायला सुरुवात केली का? ‘३ इडियट’सारखा चित्रपट पाहून किती पालकांनी आपल्या मुलांवर आपल्या इच्छा आकांक्षा लादायचं बंद केलं? या सगळ्याची उत्तारं जेव्हा आपण देऊ तेव्हा एक गोष्ट ध्यानात येते की शेवटी हे चित्रपट आहेत, त्याकडे कितपत गांभीर्याने पाहायचं आणि नेमकं किती वाहवत जायचं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. माणूस आणि जनावर यातील हाच फरक संदीप वांगा रेड्डीने मांडायचा प्रयत्न केला आहे. जर आपणही सगळ्याच गोष्टींचा सारासार विचार न करता प्रत्येक गोष्ट मनावर घेत आलो तर आपल्यातीलही ‘अ‍ॅनिमल’ जागा व्हायला फारसा वेळ लागणार नाही.

केवळ दिग्दर्शकाने प्रक्षोभक मुलाखत दिल्याने त्याच्या कलाकृतीला जाणून बुजून पाडायचा प्रयत्न करणं ही विखारी मनोवृत्ती आहे. खासकरून हिंदी चित्रपटसृष्टीत ही वृत्ती जास्त पाहायला मिळते हे संदीप रेड्डी वांगाने पुन्हा ‘अ‍ॅनिमल’च्या माध्यमातून दाखवून दिलं. ‘अ‍ॅनिमल’चा पोस्ट क्रेडिट सीन हा खास या वृत्तीच्या लोकांसाठी संदीपने ठेवला असावा अन् आगामी ‘अ‍ॅनिमल पार्क’मधून तर तो आणखी कोणाकोणाला चिथवणार आहे याचा विचारदेखील न केलेलाच बरा. अगदी मनापासून सांगायचं झालं तर ‘अ‍ॅनिमल’ हा काही उत्कृष्ट चित्रपट नाही, यातही असंख्य त्रुटी आहेत, पण तरी अशा बेधडक चित्रपट सादर करणाऱ्या कलाकारांची सध्या भारतीय चित्रपटसृष्टीला आणि एकूणच या ईकोसिस्टमला फार आवश्यकता आहे.