भारतीय जनमानसातील महाकाव्य म्हणजे रामायण आणि महाभारत. या दोन्ही महाकाव्यांमधील कथांची पकड भारतीय मानसावर आजही दांडगी आहे. त्यामुळे रोजच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांना बहुतांश वेळेस याच कथांचे दाखले देऊन विशेषणं जोडली जातात. प्रभू राम हे मांसाहारी होते, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या मेळाव्यात केले होते. त्यामुळे विविध स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात नाशिकमधील साधूंनी आणि महंतांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात FIR देखील दाखल केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांचे आता शिशुपालाप्रमाणे १०० अपराध भरल्याचेही महंत सुधीरदास पूजारी यांनी म्हटले, याच पार्श्वभूमीवर शिशुपाल नक्की कोण होता? आणि त्याचा १०० अपराध भरल्यावरच वध का झाला हे जाणून घेणे माहितीपूर्ण ठरावे.

महाभारतातील कथा काय सांगते?

शिशुपालाच्या वधाची मूळ कथा महाभारताच्या सभापर्वात येते. श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला, या कथेशिवाय महाभारताची कथा पूर्णच होऊ शकत नाही. परंतु महाभारतात येणारी कथा अगदीच थोडक्यात आली आहे. या कथेच्या विस्ताराचे श्रेय संस्कृत कवी माघाकडे जाते.

Asen Me Nasen Me Review
असेन मी नसेन मी!
penguin parade on phillip island in australia
मोहक शिस्तबद्धतेची ‘पेंग्विन्स परेड’…
jyachi tyachi love story review by sabby parera
ज्याची त्याची लव्ह स्टोरी!
thiruchitrambalam romantic comedy drama film
थिरुचित्रंबलम
Navratri 2024: Jijabai
Navratri 2024: जिजामातेच्या जन्मकथेचा संबंध रेणुकादेवीशी कसा जोडला गेला; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?
Mithun Chakraborty, Dadasaheb Phalke Award,
डिस्को डान्सर…
Hungry Ghost festival
भारतातील पितृपक्षासारखी संस्कृती जगात इतर ठिकाणी कुठे सापडते?
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची अवस्था अश्वत्थाम्यासारखी झाली आहे का?
dombivali dahihandi celebration
सण..संस्कृती आणि पुढची पिढी!

शिशुपाल हा भगवान श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा होता तसेच कौरव आणि पांडवांचा भाऊ होता. इतके जवळचे नाते असूनही श्रीकृष्णाला शिशुपालाचा वध करण्याची गरज का भासली, हे जाणून घेण्यासारखे आहे. शिशुपालाच्या जन्माच्या वेळी शिशुपालाला तीन डोळे आणि चार हात होते. शिशुपाल हा वसुदेवाच्या बहिणीचा आणि चेदीचा राजा दमघोष यांचा मुलगा होता. म्हणजेच तो श्रीकृष्णाचा आत्येभाऊ होता. शिशुपालचे बाल्यावस्थेतील अक्राळ विक्राळ रूप पाहून त्याचे आई आणि वडील घाबरले आणि चिंताग्रस्त झाले. त्यांनी शिशुपालचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. पण तेवढ्यात आकाशवाणी झाली, ‘या मुलाला सोडू नका, योग्य वेळ आल्यावर या मुलाचे रूप सामान्य बालकांप्रमाणे होईल. हे बालक ज्याच्या मांडीवर बसल्यानंतर त्याचे अधिकचे डोळे आणि हात नाहीसे होतील, तोच त्याचा काळ ठरेल.’

अधिक वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केलेल्या मलंगगडाशी संबंधित ‘मच्छिन्द्रनाथ’ कोण होते?

श्रीकृष्णाने दिलेले वचन

एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्याच्या घरी आले. शिशुपालही तिथे खेळत होता. या बालकाला खेळताना पाहून श्रीकृष्णाला त्याच्या विषयी जिव्हाळा निर्माण झाला आणि त्यांनी त्याला आपल्या मांडीवर घेतले. त्यांनी मांडीवर घेताच शिशुपालाचा अतिरिक्त डोळा आणि हात नाहीसे झाले. हे पाहून शिशुपालाच्या आई- वडिलांना आकाशवाणीची आठवण झाली आणि ते खूप घाबरले. तेव्हा श्रीकृष्णाच्या आत्याने तू त्याला मारणार नाहीस, अशी विनंती केली, परंतु विधिलिखितात मी हस्तक्षेप करणार नाही, असे श्रीकृष्णाने सांगितले, परंतु आत्याचा मान राखत ‘त्याचे १०० अपराध पूर्ण होईपर्यंत मी वध करणार नाही’ असे वचन दिले.

शत्रुत्त्व का?

मूलतः शिशुपालाचा कौल कौरवांच्या बाजूने झुकणारा होता. याशिवाय शिशुपालाला रुक्मिणीशी विवाह करायचा होता. परंतु रुक्मिणीचे भगवान श्रीकृष्णावर प्रेम होते आणि तिला फक्त त्यांच्याशीच लग्न करायचे होते. पण रुक्मिणीचा भाऊ रुक्मीला याला हे नाते मान्य नव्हते. यामुळेच भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीचे हरण करून तिच्याशी विवाह केला. यामुळे शिशुपाल भगवान श्रीकृष्णांना आपला शत्रू मानू लागला. या शत्रुत्वामुळे जेव्हा युधिष्ठिराला युवराज घोषित करून राजसूय यज्ञाचे आयोजन करण्यात आले, तेव्हा सर्व नातेवाईक आणि राजांनाही आमंत्रण देण्यात आले होते. यात वासुदेव, श्रीकृष्ण आणि शिशुपाल यांनाही समावेश होता. याच समारंभात शिशुपाल आणि भगवान श्रीकृष्ण एकमेकांच्या समोर आले. युधिष्ठिर श्रीकृष्णाचा आदर करतात, हे शिशुपालला आवडले नाही आणि त्याने सर्वांसमोर भगवान श्रीकृष्णांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भगवान श्रीकृष्ण शांत चित्ताने हे सर्व पाहत आणि ऐकत होते, परंतु शिशुपालाने आपल्या मर्यादा ओलांडल्या.

श्रीकृष्ण वचनबद्ध असल्याने ते शिशुपालाच्या चुका सहन करत राहिले. परंतु शिशुपालने शंभर शिव्या पूर्ण केल्या आणि १०० व्या शिवी नंतर शिशुपालाला सावध होण्याचा इशारा दिला. परंतु अहंकारी शिशुपाल यावर थांबला नाही, यानंतर मात्र जे विधिलिखित होते तेच घडले, श्रीकृष्णच्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचा शिरच्छेद केला. त्यामुळेच एखाद्याचे १०० अपराध भरले की, शिक्षा होतेच अशा आशयाचा वाक्प्रचार रूढ झाला.

माघाचे ‘शिशुपालवध’

शिशुपालवध हे अभिजात संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक महाकाव्य आहे. या महाकाव्याचे वीस सर्ग असून त्याची श्लोकसंख्या १६४५ आहे. तर काव्याचा नायक कृष्ण असून ते वीररसप्रधान आहे. मूळ कथेच्या तुलनेत या काव्यात माघाने बरीच भर घातली आहे.

अधिक वाचा: भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजाचे अपहरण करणारे हूती आहेत तरी कोण?

शिशुपाल ‘मिथ्या की सत्य’

शिशुपाल हा चेदी राज्याचा राजा दमघोष याचा पुत्र होता. चेदी हे प्राचीन भारतीय १६ महाजनपदांपैकी एक राज्य होते. सध्याच्या मध्य प्रदेश राज्यातील बुंदेलखंड विभागात यमुना नदीच्या दक्षिणेस केन नदीच्या काठी चेदी वसलेले होते. या राज्याच्या राजधानीच्या शहराला संस्कृतमध्ये सुक्तीमती आणि पालीमध्ये सोत्तीवती-नगर असे नाव होते. पाली भाषेतील बौद्ध ग्रंथांमध्ये, हे सोळा महाजनपदांपैकी एक म्हणून सूचीबद्ध आहे. महाजनपद ही सोळा राज्ये किंवा प्रजासत्ताक होती जी प्राचीन भारतात इसवी सनपूर्व सहाव्या ते चौथ्या शतकादरम्यान अस्तित्वात होती.

महाभारतातील संदर्भानुसार, चेदी राज्यावर मगधचा जरासंध आणि कुरुचा दुर्योधन यांचा सहयोगी शिशुपाल याचे राज्य होते. तो वासुदेव कृष्णाचा प्रतिस्पर्धी आणि कृष्णाच्या आत्याचा मुलगा होता. भीमाच्या पत्नींपैकी एक चेदी राज्यातील होती. महाभारत काळातील प्रमुख चेदीमध्ये दमघोष, शिशुपाल, धृष्टकेतू, सुकेतू, सराभा, भीमाची पत्नी, नकुलाची पत्नी कारेनुमती आणि धृष्टकेतूची मुले यांचा समावेश होता. इतर चेदींमध्ये राजा उपरीचारा वासू, त्याची मुले, राजा सुबाहू आणि राजा सहज यांचा समावेश होता. सुरुवातीच्या काळात पौरव राजांनी आणि नंतर देशाच्या मध्यवर्ती भागात यादव राजांनी राज्य केले. पुरातत्वशास्त्रज्ञ दिलीप कुमार चक्रवर्ती यांनी नमूद केल्याप्रमाणे सुक्तिमती हे मध्य प्रदेशातील सध्याच्या रेवा शहराच्या बाहेरील इटाहा हे ठिकाण आहे.

एकूणच महाभारतातील अनेक स्थळांच्या ठिकाणी पुरातत्वीय अवशेष सापडलेले आहेत, त्यामुळे कथा कोणत्याही स्वरूपात आल्या तरी या स्थळांना विशिष्ट इतिहास आहे हे मात्र नक्की! जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची तुलना शिशुपालाशी करण्यात आली आणि पुन्हा एकदा महाभारतातील या गोष्टींना नव्याने उजाळा मिळाला.

Story img Loader