आज जागतिक बौद्धिक संपदा दिन (World Intellectual Property Day) जशी सोने, दागिने, मालमत्ता ही जशी संपत्ती असते, त्याचप्रमाणे स्वतःची बुद्धिमत्ता हीदेखील संपत्ती म्हणून ओळखली जाते. जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त वाङ्मयचौर्याच्या इतिहासाविषयी काही गोष्टी जाणून घेऊया.
वाङ्मयचौर्य म्हणजेच प्लॅजेरिझम. प्लॅजेरिझम हा शब्द प्रथमतः पहिल्या शतकामध्ये आलेला आढळतो. मूळ लॅटिन असणारा plagiarius हा शब्द आहे. याचा अर्थ अपहरणकर्ता असा होतो. एखाद्याच्या सृजनात्मक कामाचे अपहरण करणे म्हणजे ‘प्लॅजेरिझम’ होय. ‘प्लेजिअम’ म्हणजे चोरी करणे. इंडो-युरोपियन भाषांमध्ये ‘प्लेज’चा अर्थ जाळे किंवा सापळा असा होतो. एखाद्याला नकळतपणे जाळ्यात पकडले जाते. या अर्थाने ‘प्लेजिअरिअस’ हे परिष्कृत रूप बनले गेले आणि तसे करण्याची वहिवाट म्हणून ‘प्लेजिअरिझम’ ही संज्ञा आली असावी. ग्रीक, लॅटीननंतर नंतर १६०१ साली बेन जॉन्सन या नाटककार-समीक्षकाने साहित्यचोराला उद्देशून ‘प्लेजिअरी’ हा शब्द उपयोगात आणला. इंग्रजीमध्ये ‘प्लेजिअरिझम’ ही संज्ञा १६२० च्या दरम्यान स्वीकारण्यात आली. सॅम्यूएल जॉन्सनने त्याच्या १७५५ साली प्रकाशित झालेल्या शब्दकोशात ‘प्लेजिअरी’च्या “A thief in literature, one who steals the thoughts or writings of another”, “The crime of literary theft” अशा व्याख्या दिल्या आहेत. ऑक्सफर्ड शब्दकोशात लॅटीन ‘प्लेजिअरिअस’ हा शब्द सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात आल्याचे म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा