दोन महिन्यापूर्वीचा प्रसंग. ठिकाण-वानखेडे स्टेडियम. निमित्त ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना. चाहत्यांचा पाठिंबा अफगाणिस्तानला होता आणि ते खेळतही चांगले होते. आमच्या समोर डेव्हिड वॉर्नर फिल्डिंगला आला आणि वातावरण पालटून गेलं. दाक्षिणात्य चित्रपटातील पुष्पाची स्टाईल वॉर्नर इन्स्टाग्राम रील्समध्ये नेहमी दाखवतो. त्यामुळे वॉर्नर फिल्डिंगला येताच ‘पुष्पा पुष्पा’चा नारा सुरू झाला. त्याने हसून प्रतिसाद दिला. वॉर्नर म्हणजे शंभर टक्के कमिटमेंट. तो एकट्याने २०-२५ धावा वाचवतो. तो जिथे फिल्डिंगला उभा असतो त्याच्या उजवीकडे, डावीकडे, समोर, मागे चित्त्यासारखा पळतो. त्याच्या परिघात चेंडू आला तर तो झडप घालतो. झेल सुटणं, रनआऊट मिस होणं वगैरे विषयच नाही.

‘पुष्पा पुष्पा’चा घोष सुरू असताना अफगाणिस्तानच्या बॅट्समनने खणखणीत कव्हर ड्राईव्ह मारला. वॉर्नरपासून चेंडू खूप लांब होता. जसं चेंडू बॅटची कड घेऊन गोळीबंद सुटला तसा वॉर्नर उजवीकडे धावू लागला. चेंडू बाऊंड्री जाणार आहे, हा का धावतोय असा सूर होता. वॉर्नरने जीवाचं रान केलं आणि डाईव्ह मारली. चेंडू त्याच्या शरीराला अडला. वाऱ्याच्या वेगाने त्याने विकेटकीपरला थ्रो दिला. थ्रो सुद्धा इतका अचूक की बरोबर विकेटकीपर अॅलेक्स कॅरेच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन बसला. त्या स्थानापासून धावत तो पुन्हा मूळ ठिकाणी फिल्डिंगला आला. तोवर राखीव खेळाडूने एनर्जी ड्रिंक आणलेलं. दोन घोट प्यायला तोवर त्याच्या डाव्या बाजूने चेंडू जाताना दिसला. वॉर्नर सुसाट पळायला लागला. चेंडूचा वेग जास्त होता, जोरात मारलेला. वॉर्नरने जीवाच्या आकांताने चेंडू अडवला. एक धाव वाचवली. पुन्हा मूळ जागेवर आला. राखीव खेळाडूला टपली मारत दोन घोट एनर्जी ड्रिंक प्यायला.

process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
leakage from main water pipeline schedule for water supply disrupts in bandra
मुख्य जलवाहिनीतून गळती; वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी विशेष वेळापत्रक
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Milind Gawali
“तुम्ही कायम माझे हिरो”, वडिलांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट; म्हणाले, “पोलीस खात्यातून Retire…”
India vs Australia Border Gavaskar Trophy Australia dominate in second Test sport news
पिछाडीनंतर पडझड, भारतीय फलंदाजांकडून निराशाच; हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दबदबा

पुढच्या चेंडूवर स्ट्राईक बदलले गेले. लेफ्ट राईट कॉम्बिनेशनमुळे फिल्डिंग बदलली. आम्हाला काही कळेपर्यंत वॉर्नर मैदानाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचला. तो तिथे जातोय तोच चेंडू पडला. ३० गज वर्तुळात कोणीच नव्हतं त्यामुळे तो चेंडू अडवायला वॉर्नरलाच पुढे यावं लागलं. एकाच षटकात एवढी पळापळ करुन वॉर्नर पुढच्या षटकासाठी पुन्हा आमच्या बाजूला आला. ‘पुष्पा पुष्पा’चा नारा टिपेला पोहोचला. यावेळी त्याने व्यवस्थित मागे बघितलं आणि पुष्पाची स्टाईल करून दाखवली. दोन चेंडू नंतर चाहत्यांपैकी एकाने एनर्जी ड्रिंक दे म्हणून त्याला विनंती केली. विनंती करणारा छछोर नाही हे बघून त्याने एनर्जी ड्रिंकची बाटली त्या चाहत्याच्या दिशेने भिरकावली. तो वेडाच झाला.

पुढच्या दोन चेंडूंवर वॉर्नरला खूप काम पडलं. त्याच्या चपळाईत जराही घट झाली नाही. चेंडू अडवून, थ्रो करुन मूळ जागी आल्यावर ‘१० रुपये की पेप्सी, डेव्हिड वॉर्नर से**’ अशा घोषणा सुरू झाल्या. ते वर्ल्डकप का घेऊन जातात आणि आपण ड्रीम११वर टीमा लावत बसतो याचं उत्तर त्या टपराट घोषणेत होतं. जवळपास तासभरासाठी वॉर्नर तिथेच फिल्डिंगला होता. तो अभेद्य तटबंदी झाला. सळसळती ऊर्जा म्हणजे काय याचा प्रत्यय त्याने घडवला. पुष्पा पुष्पाचा नारा पुन्हा सुरू झाल्यावर त्याने आपल्या पद्धतीने नमस्कार करुन थँक्यू म्हटलं. त्यादिवशी मुंबईत सूर्य आग ओकत होता. घामाने त्याच्या जर्सीचा चिखल झालेला. वॉर्नरचं वय होतं ३७. पण त्याची कामाप्रति निष्ठा एक ग्रॅमही कमी झाली नाही.

क्रिकेट असंख्य खेळाडू खेळतात. अनेक येतात, अनेक जातात. अगदी मोजकी माणसं मापदंड प्रस्थापित करतात. वॉर्नरने नवे मापदंड रचले. कसोटी खेळण्यासाठी तुमच्याकडे तंत्रकौशल्य हवं. तासनतास नांगर टाकून खेळण्याची तयारी हवी. ऑफस्टंपबाहेरचे शेकडो चेंडू सोडून देण्याची मानसिकता हवी. वाईट चेंडू पडण्याची वाट पाहायला हवी. वॉर्नरने या सगळ्याला छेद दिला. कसोटीतही अशक्य वेगाने धावा करता येतात, कसोटीत एका सत्रात शतक करता येतं. नवीन चेंडू हाताळत असलेल्या गोलंदाजांलाही निरुत्तर करता येतं. नवीन चेंडूच्याही ठिकऱ्या उडवता येतात. कसोटीत चौथ्या डावात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता येतो. कसोटीतही मनमुराद षटकार मारता येतात. तंत्रात उणिवा असल्या तरी त्या झाकून धावांची टांकसाळ उघडता येते हे वॉर्नरने सप्रमाण सिद्ध केलं.

14 वर्षांपूर्वी फर्स्टक्लास क्रिकेटचा टिळाही न लागलेला वॉर्नर ऑस्ट्रेलियाची ट्वेन्टी२० जर्सी परिधान करुन दक्षिण आफ्रिकेसमोर अवतरला. शिंगखुपश्या मारकुटा बैल असतो ना तसा त्याचा रागरंग होता. नंतर कळलं की न्यू साऊथ वेल्सच्या सहकाऱ्यांनी त्याला ‘बुल’ हे टोपणनाव दिलं होतं ते याच कारणासाठी. ‘आलं अंगावर की घेतलं शिंगावर’ हाच त्याचा खाक्या होता. आफ्रिकेचा डेल स्टेन आग ओकायचा. स्टेनच्या चेंडूवर पूल करणं धारिष्ट्याचं काम होतं. वॉर्नरने पहिल्याच सामन्यात ते केलं. त्यावर स्टेनने टाकलेला जळता कटाक्ष आजही स्मरणात आहे. वॉर्नरने त्या सामन्यात ४३ चेंडूत ८९ धावांची खेळी केली होती. ट्वेन्टी२० प्रकारात बॉलरला तुडवणं हेच अपेक्षित असतं. ते करायला ऑस्ट्रेलियाला हुकूमी एक्का मिळाला अशी चर्चा झाली. पॉकेट डायनॅमो वगैरे बिरुदावलीही मिळाली.

हा माणूस ऑस्ट्रेलियासाठी कसोटी खेळेल, शंभरहून अधिक कसोटी खेळेल, त्रिशतकी खेळी करेल असं त्यादिवशी कोणी सांगितलं असतं तर लोकांनी वेड्यात काढलं असतं. पण वॉर्नरने सलामीवीराची, कसोटी फलंदाजीची परिभाषाच बदलून टाकली. नीट टप्प्यावर बॉलिंग केली नाही तर वॉर्नर आपला कोथळा बाहेर काढेल ही भीती त्याने जगभरातल्या बॉलर्सच्या मनात बसवली. बरं फक्त चौकार-षटकार चोपून धावा करेल असंही नाही, वॉर्नर अविश्रांत पळतो. समोरच्या फिल्डरला दडपणात आणून एकच्या जागी दोन, दोनच्या जागी तीन पळतो. बाऊंड्री लांब असेल तर तो चार धावाही पळून काढतो. बाऊंड्रीवर फिल्डर ठेवला तर तो त्याच्या डोक्यावरून मारुन धावा करतो. त्याची धावांची भूक कधीच आटली नाही. बरं खेळाडू शतक होईस्तोवर दमतात. शतक झाल्यावर वॉर्नर मैदानाभर दौडून हवेत जी उंच उडी मारतो ती नुसती पाहूनच मनाची उमेद उंचावू शकते. लहान मुलांना बागेत नेल्यावर कशी बागडतात तसा वॉर्नर बागडतो. शतक तर करणारच ना, त्यासाठीच तर घेतलंय इतकं त्याचं सेलिब्रेशन बायडिफॉल्ट असतं. शतक झाल्यावर त्याच्या शरीररुपी शिडात आणखी ऊर्जा संचारतो आणि तो पुन्हा कत्तलखाना सुरू करतो.

वॉर्नरच्या झंझावातामध्येही एक राकट सौंदर्य आहे. त्याची बॅटिंग म्हणजे आक्रमकतेची एक नवी बाराखडी आहे. असं नाही की वॉर्नरने कायम वर्चस्व गाजवलं. अजिबातच नाही. अनेक बॉलर्सनी त्याला मामा बनवला. त्याच्या तंत्रातल्या उणीवा उघड झाल्यावर लोकांनी त्याला लक्ष्य केलं. त्याला स्पिन खेळता येत नाही मग फिरकीच्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न झाले. खूप बॅड पॅचेस आले पण वॉर्नर पुरुन उरला. सगळे कौशल्यसंच भरुन आपण येत नाही. काही कप्पे रिकामे असतात, काही अल्पस्वल्पच भरतात हे वॉर्नरने मान्य केलं. ऑस्ट्रेलियन वाण असल्याने त्याने उणीवांवर काम केलं. स्वीप कधी मारायचा, कधी नाही, बॅकफूटवरुन कधी खेळायचं, क्रीझच्या बरंच बाहेर कधी उभं राहायचं, उंची कमी असल्याने शॉर्ट बॉलचा मारा झाला तर त्यांचा सामना कसा करायचा या सगळ्यावर वॉर्नरने उत्तर शोधलं. त्याला ३० पार करु देऊ नका, नंतर तो पिसं काढेल आपली असं बॉलर्सची चर्चा व्हायची. कसोटीत नवा चेंडूचा सामना करणं सगळ्यात कठीण असतं. कारण गोलंदाज ताजेतवाने असतात. चेंडू करामत करत असतो आणि खेळपट्टीचीही साथ असते. वेळेचं बंधन नसतं. गोलंदाजांसाठी आदर्श अशा परिस्थितीत वॉर्नरने धावांच्या राशी ओतल्या. तो पडला, धडपडला, चाचपडला पण तो पुन्हा पुन्हा नव्या ताकदीने येत राहिला. म्हणूनच १४ वर्षानंतर वॉर्नरच्या नावावर ११२ कसोटी सामन्यात ८७८६ धावा आहेत. यात २६ शतकांचा समावेश आहे. सरासरी आहे ४४.५९. १६१ एकदिवसीय सामन्यात ६९३२ धावा आहेत. सरासरी आहे ४५.३०. यात २२ शतकांचा समावेश आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत वॉर्नर अव्वलस्थानी आहे. दुसऱ्या स्थानी आहे सचिन तेंडुलकर. आणखी काय पाहिजे!

वॉर्नरने निष्ठेचा मापदंड प्रस्थापित केला. वॉर्नर आहे म्हणजे १०० टक्के निष्ठा. संघव्यवस्थापन, कर्णधार जे सांगेल ते तो श्रद्धेय भावनेने करेल. जितका वेळ सांगाल तितका वेळ करेल. तो दमणार नाही, कंटाळून जाणार नाही, हाती घेईल ते तडीस नेईल. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स कार्यक्रमात व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अँड्यू सायमंड्स आणि डेव्हिड वॉर्नर यांच्याविषयी सुरेख आठवण सांगितली होती. लक्ष्मण यांनी सांगितलं की हे या दोघांबद्दल गैरसमज आहेत. त्यांना आपण नीट समजून घेतलेलं नाही. ते दोघे योद्धे आहेत. सेनापती जे सांगेल ते करणार. त्यांनी पुढे सांगितलं, २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने आयपीएल जेतेपद जिंकलं. सनरायझर्स हा काही चेन्नई किंवा मुंबईसारखा स्टार संघ नव्हता. वॉर्नर हाच त्यांचा स्टार. लो प्रोफाईल राहणाऱ्या कार्यकर्त्यांची मोट वॉर्नरने बांधली. आंतरराष्ट्रीय खेळाडू, भारतीय खेळाडू, राखीव खेळाडू, नेट बॉलर सगळ्यांशी त्यांचा वैयक्तिक संवाद होता. बॅट्समनने तुडवल्यावर बॉलरला प्रोत्साहन देणं, फिल्डिंग सजवणं, सापळे रचणं, स्वत: मोठी खेळी करणं हे सगळं वॉर्नरने एकटाकी केलं. आयपीएल स्पर्धेचे १५ हंगाम झालेत. केवळ दोनच विदेशी खेळाडू आयपीएल विजेते कर्णधार आहेत. एक शेन वॉर्न आणि दुसरा डेव्हिड वॉर्नर. यातून हे साधणं किती कठीण आहे हे लक्षात येतं.

पण लक्ष्मण म्हणाले ते बरोबरच आहे. वॉर्नर लार्जली misunderstood आहे. ज्या वॉर्नरने संघाला जेतेपद मिळवून दिलं त्याच वॉर्नरला सनरायझर्स व्यवस्थापनाने कर्णधारपदावरून काढलं, संघातून काढलं. त्याला पाणक्या बनवलं. एका सामन्यावेळी तर त्याला मैदानातही येऊ दिलं नाही, त्याने हॉटेलच्या रुममधल्या टीव्हीवर सामना पाहिला. सोशल मीडियावर ब्लॉक केलं. वॉर्नर आणि सनरायझर्स यांच्यात काय बिनसलं हे कळलंच नाही.

कारकीर्दीत सुरुवातीला वॉर्नरची प्रतिमा रागीट अशीच होती. प्रतिस्पर्धी खेळाडूंबरोबर त्याचे खटके उडायचे. एक प्रतिभावान खेळाडू बहकणार असंच चित्र होतं. इंग्लंडच्या जो रुटला त्याने श्रीमुखात लगावली होती त्यासाठी त्याला शिक्षाही झाली. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकबरोबर झालेला वाद खूप काळ चर्चेत होता. पत्रकारांना उद्देशून आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. क्रिकेटची मॅच सोडून तो एकदा घोड्यांची शर्यत पाहायला गेला होता. २०१८ सँडपेपर बॉल टेंपरिंग प्रकरणाने वॉर्नर अंतर्बाह्य बदलून गेला. जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याच्या नादात त्याच्या हातून घोडचूक झाली. जगभरात नाचक्की झाली. तोंड दाखवायला जागा उरली नाही. वर्षभरासाठी बंदीची कारवाई झाली. दुसरा कोणी असता तर कायमस्वरुपी खचून गेला असता. हातात बॅट पकडण्याची हिंमत झाली नसती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाचं सरकार, चाहते यांनी हे प्रकरण खूपच गंभीरतेनं घेतलं. पण हरणं, कच खाणं ऑस्ट्रेलियन्सना आवडत नाही. मी चुकलो, मी आईवडिलांचं नाव खराब केलं. मी माझ्या चाहत्यांच्या मनातून उतरलो. मी ऑस्ट्रेलियाचा अपमान केला. मी चाहत्यांची माफी मागतो असं त्याने सांगितलं. वर्षभरानंतर वॉर्नर परतला तो एक वेगळाच माणूस म्हणून. वॉर्नरची मनस्थिती नीट ठेवण्यात त्याच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे. तिने त्याला सावरलं. वॉर्नर एकदम फॅमिली मॅन झाला. बायको, तीन मुली आणि बॅटिंग एवढ्याच तीन गोष्टींवर लक्ष देण्याचं त्याने ठरवलं. पुन्हा त्याची बॅट तळपू लागली.

भारतीय चाहते, भारतीय चित्रपट, गाणी, संस्कृती त्याने अंगीकारली. साध्या गोष्टीवरून प्रतिस्पर्ध्यांशी हुज्जत घालणारा वॉर्नर अंतर्धान पावला. भारतीय गाण्यांवर आपल्या तीन मुलांच्या बरोबरीने तो रील्स करू लागला. चाहत्यांच्या विनंतीला मान देत व्हीडिओ तयार करु लागला. दाक्षिणात्य चित्रपट, त्यातली पात्रं, वेशभूषा त्याला आवडू लागलं. त्याच्या बहुतांश फॉलोअर्सपैकी अर्धेपाऊण भारतातच आहेत. येत्या काही वर्षात तो दाक्षिणात्य चित्रपटात अभिनय करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

मोठी इनिंग्ज खेळून परतताना वॉर्नरला एक लहान मुलगा ऑटोग्राफ मागताना दिसला. वॉर्नरने त्याचे ग्लोव्ह्ज त्या मुलाला देऊन टाकले. तो मुलगा अचंबित झाला. चाहते वॉर्नरची ताकद आहे. आणि हे पीआरप्रेरित मॅनिप्युलेटिव्ह कँडिड नाहीये. आपल्या कामाने लोकांना जिंकून घेणारा कार्यकर्ता आहे. म्हणूनच वॉर्नर लिहिलेली जर्सी घालून अनेकजण दिसतात. लोकप्रियतेचं काय करायचं हे अनेकांना कळत नाही. वॉर्नरला ते उमगलं. यारीदोस्ती निभावणारा जिगरा यार आहे. उस्मान ख्वाजा हा वॉर्नरचा लहानपणापासूनचा मित्र. दोघं एकत्र वाढले, खेळू लागले. वॉर्नर मोठा होत गेला. उस्मान संघात आतबाहेर होत राहिला. आता तोही स्थिरावला आहे. योगायोग म्हणजे आता ही जोडगोळी सलामीला येते. वॉर्नरच्या शेवटच्या इनिंग्जवेळी दोघं पायऱ्या उतरून बाऊंड्रीपाशी आले. उस्मानने त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या हेल्मेटला पंच दिला आणि त्याला शुभेच्छा दिल्या. वॉर्नरची शेवटची कसोटी पाहायला उस्मानची आई आली होती. मॅच संपल्यावर त्या वॉर्नरला भेटल्या आणि कडकडून मिठी मारली. उस्मानने सांगितलं की माझी आई त्याला डेव्हिल म्हणते. तो मैदानावर तसाच खेळतो. तो सच्चा दोस्त आहे. तो माझ्या कुटुंबाचा भाग आहे. उस्मान आणि त्याच्या घरचे मूळचे पाकिस्तानचे. ऑस्ट्रेलियात स्थाईक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा उस्मान पहिला मुस्लीम खेळाडू आहे. उस्मानला वंशवादाचा सामनाही करावा लागला. उस्मान आणि वॉर्नरची दोस्ती कायम राहिली. खेळ मनं जोडतात असं म्हटलं जातं. वॉर्नर हा त्याचा लाईव्ह डेमो आहे.

शिंगावर घेण्यासाठी परफेक्ट असण्याची गरज नाही हे दाखवून देणारा वॉर्नर निवृत्तीनंतर कुठला मापदंड रचतो ते पाहायचं….

Story img Loader