भारतीय संस्कृती ही अनेक रंजक, रहस्यमय कथांचा खजिनाच आहे. कथा कुठल्याही स्वरूपात असोत भारतीय पौराणिक कथा रसिक मनाचा ठाव घेण्यास कुठेच मागे नाहीत. भारतीय पौराणिक कथा या भरत मुनींनी वर्णन केलेल्या नऊ रसांची पूर्णानुभूती देतात. याच नऊ रसांमधील एक रस म्हणजे शृंगार रस!

शृंगार रसाने ओतप्रत अनेक भारतीय प्रेम कथा आजही आपल्या अद्भुतरम्य शैलीने रसिकांना मंत्रमुग्ध करतात. याच कथा पंगतीतील एक उत्कट प्रेम कथा म्हणजे उर्वशी-पुरुरव्याची.

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध

बहुतांश भारतीय कथानकांचे मूळ रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमध्ये सापडते, ही दोन्ही काव्ये भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ आहेत. राम आणि कृष्ण हे दैवी पुरुष वगळताही या महाकाव्यांमधील राजा, राजपुत्र, स्वर्गीय अप्सरा, गंधर्व, पराक्रमी योध्ये यांनी मानवी मनाला नेहमीच भुरळ घातलेली आहे. भारतीय पौराणिक कथांमधील अप्सरा या आपल्या अद्भुत सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. इंद्र दरबारी त्यांचे नृत्य गायन होते. स्वर्गीय अप्सरांचा वावर सर्वत्र निरंकुश असतो. किंबहुना आपल्या सौंदर्याचेच शस्त्र म्हणून त्या वापर करतात.

अधिक वाचा : श्रावण विशेष : शिवशंकराची प्रेमाची व्याख्या!

इंद्राच्या आदेशानुसार अनेक तपसव्यांचे तप त्यांनी केवळ आपल्या सौंदर्याच्या जोरावर भंग केले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील मर्त्य मानवाच्या आणि त्यांच्या प्रेमकथा हा भारतीय पौराणिक कथानकांचा आवडता विषय आहे. मेनका आणि विश्वामित्र, रंभा आणि शुक्राचार्य यांसारख्या प्रसिद्ध कथा या अप्सरा आणि मानव यांच्यातील ऋणानुबंध उलगडून सांगतात. परंतु बहुतांश कथामध्ये अंत हा दुःखद असतो. कारण शेवटी त्या स्वर्गीच्या अप्सरा आहेत… आपले इप्सित कार्य झाले की त्यांना आपल्या ‘स्व’ स्थानी परतणे हे विधिलिखित होते… त्यामुळे करुण अंत हा या कथांचे मर्म स्थान ठरतो.

महाभारतातील अशीच एक आकर्षक कथा उर्वशी नावाची प्रसिद्ध अप्सरा आणि मानवी राजा पुरुरवा यांच्या मनोमिलनाची तसेच विरहाची आहे. या कथेचे मूळ आपल्याला वेदांमध्ये सापडते. महाभारतात या कथेचे विस्तृत स्वरूप सापडते असे असले तरी कालिदासाने आपल्या कलात्मक शैलीतून या कथेला ‘विक्रमोर्वशीय’ या नाटकात दिलेले स्वतंत्र अस्तित्त्व अधिक वेधक आहे. उर्वशी आणि पुरुरव्याची प्रेमकथा ही उत्कटता, मत्सर आणि शेवटी विरह यात गुंफलेली आहे.

कोण होते पुरुरवा आणि उर्वशी?

पुरुरवा हा पहिला चांद्रवंशीय राजा होता. भारतीय संस्कृतीत बहुतांश राजे हे चांद्र किंवा सूर्य वंशीय आहेत. राजा पुरुरवा हा बुध आणि इला यांचा मुलगा. बुध हा चंद्र आणि तारा यांचा मुलगा आहे. त्यामुळे पुरुरवा हा चांद्रवंशीय ठरतो. पुरुरवा एक शूर, पराक्रमी योद्धा होता. त्याच्या याच पराक्रमामुळे असुरांसोबतच्या युद्धात त्याची मदत घेण्यासाठी त्याला इंद्राने अनेकदा स्वर्गात आमंत्रित केले होते. तर दुसरीकडे उर्वशी, इंद्राच्या दरबारातील एक सुंदर अप्सराहोती, एकदा तिला स्वर्गाचा कंटाळा आला म्हणून तिने मैत्रिणींसह पृथ्वीवर भटकंती करायचे ठरविले. पृथ्वीवरून भटकून स्वर्गात परतत असताना इतर अप्सरांसोबत तिला राक्षसाने पळवून नेले. पुरुरव्याने हे पाहताक्षणी त्या राक्षसाचा पाठलाग केला आणि उर्वशीला त्याच्या तावडीतून सोडवले. या बचावाच्या मोहिमेत ज्या क्षणी पुरुरव्याच्या शरीराचा उर्वशीला स्पर्श झाला त्या क्षणी तिचे आयुष्य कायमचे बदलले. उर्वशीने प्रथमच नश्वराचे उबदार शरीर अनुभवले होते. केवळ तिचं नाही तर पुरुरवा ही तिच्याकडे आकर्षित झाला. पहिल्या नजरेतच स्वर्गाची अप्सरा आणि पृथ्वीतलावरचा शूर योद्धा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली.

प्रेमाची कबुली?

प्रथम भेटीत जरी उर्वशी आणि पुरुरवा प्रेमात पडले असले तरी त्यांचे प्रेम पुरुरव्याच्या स्वर्गातील भेटीमुळे फुलत गेले. त्यांच्या प्रेमाची प्रचिती इतरांना एका नाटकादरम्यान आली, जिथे उर्वशी देवी लक्ष्मीची भूमिका करत होती, उर्वशीने तिचा प्रियकर म्हणून चुकून पुरुरव्याचे नाव घेतले, जिथे तिने विष्णूचे नाव ‘पुरुषोत्तमा’ घेणे गरजेचे होते. त्यामुळे या नाटकाचे दिग्दर्शन करणार्‍या भरत ऋषींनी चिडून तिला शाप दिला ज्याचा तिने उल्लेख केला, त्या नश्वरासह तिलाही नश्वर म्हणून राहावे लागेल. यावेळी उर्वशी पुरुरव्याला शोधत आली आणि त्यांनी एकमेकांबद्दलच्या भावनांची कबुली दिली आणि एकमेकांच्या प्रेमामध्ये विरघळून गेले.

उर्वशीच्या अटी

उर्वशीने प्रेमाचा स्वीकार केलेला असला तरी ती एक अप्सरा होती, तिने पुरुरव्यासोबत आयुष्यभर राहण्याचे मान्य केले. पण तिच्या काही अटी होत्या. तिने तीन अटी घातल्या; या अटी पाळल्या गेल्या नाहीत तर ती स्वर्गी परतणार होती. उर्वशीने घातलेली पहिली अट म्हणजे ती तिच्या दोन शेळ्या आणेल ज्यांच्या सुरक्षेची राजाने खात्रीपूर्वक करायला हवी, दुसरी अट अशी होती की ती पृथ्वीवर असताना केवळ लोणी भक्षण करेल आणि तिसरी अट, त्यांनी (उर्वशी आणि पुरुरवा) एकमेकांना कधीही विवस्त्र (नग्न) पाहू नये. ज्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तिसरी अट ओलांडली जाईल, त्या वेळेस उर्वशीला स्वर्गात जावे लागणार होते. पुरुरव्याने या सर्व अटी मान्य केल्या आणि ते दोघे गंधमादन बागेत एकत्र राहू लागले.

अधिक वाचा : तृतीयपंथीयांचे संदर्भ सांगणाऱ्या पौराणिक कथा !

देवतांचे कारस्थान

दिवसेंदिवस उर्वशी आणि पुरुरवा यांच्यातील प्रेम फुलत होते. त्यामुळे देवांना त्यांचा खूप हेवा वाटू लागला. उर्वशीशिवाय स्वर्ग निस्तेज दिसत होता. त्यामुळे स्वर्गीय देवांनी या दोघांना विभक्त करण्याचा एक कट रचला. एका रात्री उशिरा गंधर्वांनी उर्वशीच्या शेळ्या पळवून नेल्या. जेव्हा शेळ्या ओरडू लागल्या तेव्हा उर्वशीला काळजी वाटली आणि तिने राजाला ताबडतोब जावून त्यांना वाचवण्यास सांगितले. त्या वेळी काहीही न परिधान केलेल्या पुरुरव्याने घाईघाईने बकऱ्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्याच क्षणी, गंधर्वांनी स्वर्गातून प्रकाश टाकला, आणि पुरुरवा आणि उर्वशी दोघांनीही एकमेकांना विवस्त्र पाहिले.

विरहाची शोकांतिका

तिसरी अट ओलांडल्याने उर्वशीला परत स्वर्गात जाणे भाग होते. जड अंतःकरणाने ती विचलित झालेल्या राजाला सोडून गेली. त्यावेळी मात्र उर्वशीने आपल्या आणि पुरुरव्याच्या मुलाला सोबत नेले. तिने राजाला एक वर्षानंतर कुरुक्षेत्राच्या प्रदेशाजवळ येण्यास सांगितले जिथे तिने त्याचा मुलगा त्याला परत दिला. नंतर, बर्‍याचदा अशी परिस्थिती निर्माण झाली की, उर्वशी पुन्हा पुन्हा पृथ्वीवर आली, आणि पुढे पुरुरव्याला आणि तिला आणखी बरीच मुले झाली… हा शेवट गोड असला तरी या कथेतील उर्वशी आणि पुरुरवा यांचा विरह हाच करूण अंत असल्याचा परिणाम मनावर कायम राहातो.