गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दैवत आहे. बाप्पा हे सर्वांचे लाडके असले तरी, त्यांना मात्र लहान मित्र अधिकच प्रिय असतात. त्यांचा आवडता मोदक, पिटुकला उंदीर आणि घरोघरी त्यांची आतुरतेने वाट पाहणारे छोटे दोस्त हे बाप्पाला सर्वात अधिक प्रिय आहेत. बाप्पा बुद्धी प्रदान करतात, आणि अज्ञानाचा नाश करतात. त्यामुळे हुशार, बुद्धिमान होण्यासाठी बाप्पाची पूजा केली जाते. फक्त पूजा करून बुद्धी येत नाही. तर गणपती बाप्पांप्रमाणे शहाण्यासारखं वागावंही लागतं. अशीच एक शहाणपण सांगणारी गणरायाची ही बोधकथा.

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2023: शक्तिशाली रावणाचे गर्वहरण!…

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : हीच ‘सप्रेम इच्छा’अनेकांची!
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत

गणपती बाप्पाचे आपल्या आईवर खूप प्रेम होते. तिची प्रत्येक गोष्ट ते ऐकायचे, तिला कधीही ते उलट बोलत नसतं, ती जो काही खाऊ त्यांना द्यायची ते आवडीने खायचे. बाप्पाची आई पार्वती देवी ही देखील त्यांच्यावर भरपूर प्रेम करायची, पण ते चुकले तर त्यांच्यावर रागवायचीही. एकदा काय झाले, छोटे गणपती बाप्पा बाहेर खेळत असताना त्यांना एक छान, सुंदर मनीमाऊ दिसली. तिच्या अंगावर मऊ, पांढरे, उबदार केस होते, ती अगदीच छोट्या सशासारखी दिसत होती. ती मनीमाऊ छोट्या गणरायाजवळ येवून खेळू लागली. त्याच्या पायाजवळ फिरू लागली, त्याला चाटू लागली. तिच्या मऊसूत केसांमुळे बाळ गणेशाच्या पायावर गुदगुदल्या व्हायला लागल्या. छोट्या गणेशाला याची मोठी गंमत वाटली, त्याने तिला उचलून घेतले आणि तिच्या अंगावरील केस तो ओढून पाहू लागला, त्याबरोबर ती मनीमाऊ जोराने ओरडू लागली. तिच्या या ओरडण्यामुळे बाप्पाला आणखीच मजा येऊ लागली, त्याने तिला मारायला सुरुवात केली, त्याबरोबर ती माऊ पळू लागली, हे पाहताच छोट्या गणेशाने तिला दगडही मारले… बिचारी मनीमाऊ या मुळे आणखी रडायला लागली आणि तिथून निघून गेली.

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2023:रिद्धी-सिद्धी सोबतची गणरायाची दैवी प्रेमकथा !

यानंतर छोटे बाप्पा आपला खेळ संपवून घरी आले… आणि बघतात तर काय, आपली आई घराबाहेर बसून रडत होती! तिच्या अंगातून सगळीकडून रक्त येत होते, गणरायाला आपल्या आईची ही दशा बघून रडू आवरेना. तो धावत तिच्याकडे गेला आणि तिला म्हणाला, ‘आई, काय झाले? हे कोणी केले, सांग ना मला?’ हे ऐकतात देवी पार्वती काही क्षण थांबली आणि तिने गणरायाकडे बोट दाखविले .. आणि ती म्हणाली ‘बाळा, हे तूच केले आहेस, गणरायाला काही कळेना, त्याने हे कधी केले? देवी पार्वती त्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून म्हणाली, अरे गणेशा, मी तर छोट्या मनीमाऊचे रूप घेवून तुझ्यासोबत खेळायला आले होते, पण तू तर मला त्रास दिलास आणि पळवून लावलेस. हे ऐकताच बाळ गणपतीला आणखी रडू कोसळले, त्याने आपल्या आईची माफी मागितली! त्यावर देवी पार्वती म्हणाली, ‘तुला मी आहे हे माहीत नव्हते म्हणून तू त्या मनीमाऊला त्रास दिलास, तिला ओरबाडलेस, मारलेस. मी तिच्या जागी नसते तरी तिला किती त्रास झाला असता? तू वागलास हे किती चुकीचे आहे? त्या बिचाऱ्या माऊला काही बोलता येत नाही म्हणून तू तिला त्रास देणार का? बाळ गणेश यावर काहीच उत्तरला नाही, निमूट मान खाली घालून ऐकत होत. पार्वती देवी पुढे म्हणाली, बाळा, उलट तू त्या छोट्या, निष्पाप प्राण्यावर प्रेम केले पाहिजेस, त्याचे इतरांपासून रक्षण केले पाहिलेस. हे ऐकल्यावर गणेशाला आपली चूक लक्षात आली, त्याने आपल्या आईची माफी मागितली आणि यापुढे मुक्या प्राण्यांची काळजी घेईन असे वचनही दिले!

बोध: बाळ गणेशाप्रमाणे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मुके प्राणी- पक्षी यांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांना त्रास होईल असे काहीही करू नये.