गणपती बाप्पांची आवडते पदार्थ म्हणजे मोदक आणि लाडू. एकदा गणपती बाप्पांच्या भक्तांनी त्यांना भरपूर मोदक आणि लाडवांचा नेवैद्य अर्पण केला होता. गणरायानेही त्या नेवैद्याचा मनसोक्त रसास्वाद घेतला. गणरायाला हा नेवैद्य इतका आवडला की, त्याने आपल्या सोबत घरी परतीच्या मार्गावरही त्याची शिधा बांधून घेतला. या दिवशी गणरायाने इतके खाल्ले होते की गणरायाचे पोट टम्म फुगले होते आणि त्यामुळे गजाननाचा तोल जात होता. अशातच गणपती गणपती बाप्पा अडखळले आणि खाली पडले. सर्व मिठाई सर्वत्र विखुरली आणि त्यांचे कपडेही फाटले.

आणखी वाचा: अतिगर्व बरा नव्हे… कुबेराचे गर्वहरण !…

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Navjot Singh Sidhu
“अर्चना पूरन सिंगच्या जागी मी पुन्हा यावं…” नवज्योत सिंग सिद्धूंचे वक्तव्य; कपिल शर्मा शोमध्ये परतणार का?
Gajakesari Yoga
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…

गणपती बाप्पा स्वतःच उठून उभे राहिले, त्यांनी सर्व मिठाई गोळा केली. त्यांना कोणी पाहिले नसेल या आशेने त्यांनी आजूबाजूला पाहिले. परंतु दुर्दैवाने चंद्राने हा सारा प्रकार पाहिला होता. तो पर्यंत आकाशात सगळे दिवस अखंड चंद्रदर्शन होत होते. गणरायांना पडलेले पाहून चंद्र हसत सुटला. त्याने गणरायाच्या रूपाची टिंगलही केली. मोठं पोट आणि हत्तीचे तोंड अशा शब्दात गणरायाच्या रूपाचा उपहास केला. गणराय हे सारं काही निमूट ऐकत होते. चंद्रदेवाला आपल्याकडे हसताना पाहून भगवान गणेश नाराज झाले. चंद्र माझ्याकडे बघून केवळ हसतच आहे, येवून मदत करत नाही, असे म्हणतं गणपती बाप्पा चिडले. आणि म्हणाले, ‘हे चंद्रा ‘तू माझ्यावर हसलास! तुला वाटते की तू खूप देखणा आहेस! मी तुला शाप देतो की यापुढे तू आकाशातून नाहीसा होशील आणि पुन्हा कधीही दिसणार नाहीस’. हे ऐकताच चंद्र हसायचा थांबला. आणि चंद्राला त्याची चूक लक्षात आली. चंद्राने लगेचच गणरायाची माफी मागितली. ‘प्रभू! कृपया मला माफ करा! मला माझ्या रूपाचा गर्व झाला होता! चंद्रदेवाने गणरायाची क्षमा- याचना केली. ही शिक्षा खूप कठोर आहे, मला माफ करा.

गणेशाने चंद्राकडे पाहिले आणि चंद्राचा अभिमान भंगल्याचे त्यांना जाणवले. भगवान गणेश नेहमी क्षमा करण्यास तत्पर असतात. बाप्पांनी हसून मान हलवली. पण गणेशाला जाणवले की, तो आपला शाप आपण परत घेऊ शकत नाही. गणपती बाप्पा चंद्राला म्हणाले, ‘चंद्रा, मी माझा शाप परत घेऊ शकत नाही’ ‘पण चंद्रा ऐक, मी उ:शाप देतो. तू पूर्णतः नाहीसा होणार नाहीस, परंतु तुझा आकार हळूहळू कमी होईल, जेंव्हा तू नाहीसा होशील तेंव्हा अमावस्या असेल आणि अमावस्येनंतरच्या दिवसात तुझा आकार वाढत जाईल, ती पौर्णिमा असेल आणि शेवटी पंधराव्या दिवशी तुझा आकार पूर्ण असे . चंद्राने आनंदाने मान हलवली, आणि गणरायाचे आभार मानले.

आणखी वाचा: Ganesh Chaturthi 2023: शक्तिशाली रावणाचे गर्वहरण!…

तेवढ्यात गणरायाने काहीतरी विचार केला आणि म्हणाले, ‘आणखी एक गोष्ट आहे. हे ऐकताच, आणखी काय असेल या भीतीने चंद्राने गणेशाकडे पाहिले. गणपती बाप्पा म्हणाले, ‘चतुर्थीला तू माझ्यावर हसलास. या दिवशी जो कोणी तुला पाहील त्याच्यावर चोरीचा आळ येईल. तरी काळजी करू नकोस, कृष्ण आणि स्यमंतक मण्याची कथा या दिवशी जो कोणी ऐकेल त्याला कुठल्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही, असे म्हणून गणपती बाप्पा आपल्या घरी जायला निघाले.

बोध: कोणालाही कधीही त्यांच्या रुपावरुन हिणवू नये !