मुंबईचा गणेशोत्सव आणि या उत्सवातील भव्यता हा नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत त्यामुळे चित्रशाळेत मोठी गडबड सुरू आहे. मुंबईच्या गणेशोत्सवात मंडळाच्या भव्य गणेश मुर्ती हा नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. अमुक एक मंडळाची मुर्ती किंवा अमुक एका मुर्तीकारानं ती घडवली आहे इतकीच ओळख आपल्याला असते. मात्र यामागे शेकडो हात असतात. जे गेल्या काही महिन्यांपासून दिवसरात्र राबून बाप्पांची मुर्ती साकारत असतात. आपल्या भक्तीला आकार देणारे हे हात आहेत तरी कोणाचे असा प्रश्न कधी पडलाय का तुम्हाला?
जसे या व्यवसायात अनेक मराठी कुटुंब आहेत, तसे परराज्यातून आलेले अनेक मजूरही आहेत. गणेशोत्सवाला काही महिने शिल्लक असताना आपलं घरदार सोडून हे मजूर मुंबईत येतात. भव्य मुर्ती घडवण्याच्या कामात यांचाही वाटा मोलाचा असतो. बिहारवरून आलेला विनय भगत गेल्या १० वर्षांपासून कै. विजय खातूंच्या चित्रशाळेत काम करत आहे. साधरण मे महिन्याच्या आसपास तो मुंबईत येतो. मुर्ती घडवण्याच्या कलेत तो आता पारंगत झाला आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई फिरायला आलेल्या विनयनं चित्रशाळेतल्या भव्य मुर्ती पहिल्यांदाच पाहिल्या. इतक्या मोठ्या मुर्ती तयार करता येतात हे त्याला जाणवलं. ही कला आपल्याला आली तर… असा विचार त्याच्या मनात चमकून गेला. काम मिळालं आणि बघता बघता तो या कलेत पारंगत झाला. सहा महिने चित्रशाळेत काम केल्यानंतर विनय पुन्हा आपल्या गावी परततो असा त्याचा क्रम वर्षांनुवर्षे सुरू आहे.
विनयसारखाचे अरविंद कुमार सहानी पोट भरण्यासाठी मुंबईत आले. अरविंद वेल्डिंगचं काम करतात. मंडळांच्या वीस पंचवीस फुटांच्या मुर्ती या ट्रॉलीवरच तयार होतात. या मुर्ती उभ्या राहण्यासाठी आवश्यक असतं ते मजबूत लोखंडाचं काम. वीस पंचवीस फुटांची मुर्ती मजबूतरित्या उभी करण्याचं मोठ्या जोखमीचं काम अरविंद यांचं असतं. यात थोडी जरी कसूर झाली तर ट्रॉलीवर उभ्या असलेल्या मुर्तीचं संतुलन बिघडू शकतं. मान वर करून बाप्पांच्या उंच मुर्तीकडे पाहत एक व्यक्ती त्यांना म्हणाली, बापरे मुंबईच्या रस्त्यांवरून एवढी मुर्ती नेणार कशी?
‘अरे साहब आप टेन्शन मत लो| मैने वेल्डींग काम ठिकसे किया है | आपकी मुर्ती कितनी भी बडी हो, लेके जाईये कुछ नही होगा, मेरे पे भरोसा रखो|’ अरविंद आश्वस्त करत होते. चित्रशाळेतलं काम संपलं की अरविंद आपल्या गावी बिहारमध्ये परतात.
वयाची तिशी ओलांडलेला जयकिशोर कुमारही गणपतीच्या आधी बिहारमधून येतो. मोठी मुर्ती साच्यातून बाहेर आल्यानंतर या मुर्तींना फिनिशींग करण्याचं काम तो करतो. या कामाची कोणतीही माहिती त्याला नव्हती. मुंबईत मोठमोठ्या गणेशमुर्ती तयार होतात हे त्यानं गावातील एका व्यक्तीकडून ऐकलं होतं. त्यावेळी मुर्तीकलेविषयी कुतूहल जयकिशोरच्या मनात निर्माण झालं. त्याची पावलंही चित्रशाळेकडे वळली. बघून, शिकून त्यानं ही कला आत्मसात केली. तो गेल्या सात वर्षांपासून मोठ्या मुर्तींनां फिनिशींग करण्याचं काम तो करतो. दसरा झाल्यानंतर आपल्या गावी परततो. चार महिने चित्रशाळेतून मिळणाऱ्या पैशांवर जयचं घर चालंत. गवतापासून विविध आकाराचे प्राणी तयार करण्याची कलाही त्याला अवगत आहे. त्यामुळे चित्रशाळेतलं काम संपल्यानंतर गावाकडे परतून दुसऱ्या व्यवसायावर तो आपलं पोट भरतो.
संजय पंडित हे १८ वर्षांपासून मोठ्या मुर्ती घडवण्याचं काम करत आहेत. अठरावर्षांपूर्वी एका मराठी कुटुंबाकडून त्यांना या कलेविषयी समजलं. कुतूहलापोटी ते चित्रशाळेत आले. ते मोल्डींगचं काम करतात. अमुक एक मुर्ती मला मोठ्या आकारात हवीयं असं संजयला सांगितलं की तशीच हुबेहूब आणि मोठी मुर्ती ते तयार करून देतात. पुढे याच मुर्तींचा उपयोग करून साचाही तयार केला जातो. साच्यासाठी लागणाऱ्या मुर्तींबरोबरच ते गणरायाच्या अन्य मुर्तीदेखील साकारतात. ही कला त्यांच्या मुलांनाही त्यांनी शिकवली आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर ते बिहारमध्ये आपल्या गावी परतात.
कारपेंटर असणारा चंदन कुमारची पावलंही अशीच कुतूहलापोटी चित्रशाळेकडे वळली. वर्षांचे सहा महिने चित्रशाळेत काढल्यानंतर वेगवेगळ्या शहरात तो पोट भरण्याासाठी फिरतो. वीस फुटांच्या आत ज्या गणेशमुर्ती बेसवर तयार होतात, हा लाकडाचा बेस बसवण्याचं काम तो करतो. इथलं काम संपलं की वेगवेगळ्या शहरात पोट भरण्यासाठी तो निघून जातो. चंदन, जयकिशोर, अरविंदसारखे असे अनेक परप्रांतीय कलाकार आणि कारिगरांचे हात दरवर्षी मुंबईतील मोठमोठ्या चित्रशाळेत गणरायाची मुर्ती साकरण्यासाठी मोलाचा हातभार लावतात.
प्रतीक्षा चौकेकर
pratiksha.choukekar@loksatta.com