रामकथेची लोकमानसावर मोहिनी आहे. सहस्रकांचा कालावधी लोटला तरी राम कथांचे आकर्षण तसेच अबाधित आहे. ९० च्या दशकात दूरदर्शनवरील रामायणातील हलत्या चित्रांनी समुच्च भारतीय समाजाला वेड लावले होते. परिस्थिती अशी होती की प्रेक्षक भक्तिभावाने, शुचिर्भूत होऊन दूरदर्शनच्या पडद्यासमोर बसत होते. रामकथा चालू असताना चित्रपटगृहे ओस पडू लागली. यातूनच भारतीय जनमानसावर असणारी रामायणाची भुरळ दिसून येते. आजही काहीसे असेच चित्र आहे. आणि हेच चित्र तब्बल ७७ वर्षांपूर्वीही होते. महाराष्ट्राच्या घराघरात राम कथांच्या आगळ्या वेगळ्या सादरीकरणाने श्रोतृ वर्गाला मोहीत केले होते. हा कालखंड होता गीत रामायणाचा. गीत रामायण हा रामायणाच्या कथांवर आधारित ५६ गीतांचा संग्रह आहे. या गीतांचे सर्वप्रथम प्रसारण १९५५-५६ मध्ये पहिल्यांदा ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी, पुणे यांनी केले. गीत रामायण हे ग. दि. माडगूळकर यांनी शब्दबद्ध केले होते तर सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले होते. गीत रामायण हे त्याच्या उत्कृष्ट शब्द, संगीत आणि गायनासाठी प्रसिद्ध आहे.
माडगूळकर आणि फडके यांच्या चमूने वर्षभर दर आठवड्याला एक नवीन गीत सादर केले, प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी नवीन गीत सादर केले जात असे, तर त्याच गाण्याचे पुनःप्रसारण शनिवारी आणि रविवारी सकाळी होत असे. ही मालिका जसजशी लोकप्रिय होत गेली, तसतशी पुण्यातील दैनिकांनी नवीन गाण्याचे पहिले प्रसारण झाल्यानंतर दर आठवड्याला त्याचा मजकूर छापण्यास सुरुवात केली. या छप्पन गीतांच्या मजकूराची आणि त्यांच्या गद्य कथनांची पहिली अधिकृत आवृत्ती विजयादशमीच्या मुहूर्तावर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी आकाशवाणीसाठी प्रकाशन विभाग, दिल्लीच्या संचालकांनी पॉकेटबुक आकारात प्रकाशित केली.
गदिमा ‘आधुनिक वाल्मिकी’
गीत रामायणातील पहिले गाणे “कुश लव रामायण गाती” हे १ एप्रिल १९५५ रोजी प्रसारित झाले. गीतरामायण हे ऋषी वाल्मिकींच्या रामायणावर आधारित असले तरी, माडगूळकरांनी मूळ कथेला वेगळे वर्णनात्मक स्वरूप दिले, मूळ कथा अधिक सुगम केली. त्यामुळेच त्यांना ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हटले गेले. माडगूळकरांच्या कथनाचे स्वरूप वाल्मिकींपेक्षा वेगळे होते, वाल्मिकींनी राम आणि सीतेच्या राज्याभिषेकाने कथा संपवली नाही, तर सीतेचा रामाने केलेला त्याग आणि लव आणि कुश यांचा जन्म, सीतेचे शेवटचे क्षणही दर्शविले, तर माडगूळकरांनी मालिकेचा शेवट “गा बाळांनो, श्रीरामायण” या गाण्याने केला, या गाण्यात वाल्मिकी आपल्या शिष्यांना, लव आणि कुश यांना रामाच्या समोर रामायण कसे वाचावे हे सांगतात. एकूणच लव आणि कुश यांच्या गाण्याने कथानकाची सुरुवात होते तर शेवट तेथेच होतो, म्हणजेच एक वर्तुळ पूर्ण होते.
संगीतबद्ध काव्य
सुधीर फडके अर्थात बाबूजींनी मुख्यत्वे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचा वापर गीते रचण्यासाठी केला. प्रसंगाचा काळ आणि कथनकाला अनुरूप गाण्याचा राग आणि तालही त्यांनी निवडला. गीत रामायणात एकूण ३२ पात्रांच्या तोंडी प्रसंग रंगविण्यात आले आहे. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, राम फाटक आणि लता मंगेशकर अशा मोठ्या गायकांच्या फळीने आपल्या स्वरांनी या मालिकेला जिवंत केले. सुधीर फडके यांनी रामासाठी सर्व गाण्यांना आवाज दिला तर किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांनी सीतेच्या पात्राला आवाज दिला. लता मंगेशकर यांनी सीतेसाठी एक गाणे गायले, “मज संग लक्ष्मणा”, ज्यामध्ये सीता रामाला तिच्या त्यागाबद्दल प्रश्न विचारते पण तिचा प्रश्न अनुत्तरित राहतो.महत्त्वाचे म्हणजे गीत रामायण इतर नऊ भाषांमध्ये अनुवादित केले गेले. यात पाच हिंदी भाषांतरे आहेत तर बंगाली, इंग्रजी, गुजराती, कन्नड, कोकणी, संस्कृत, सिंधी आणि तेलगूमध्ये अनुवाद करण्यात आला. तसेच ते ब्रेलमध्येही लिप्यंतरित केले गेले आहे.
अधिक वाचा: Hikayat Seri Ram मलेशियातील मुस्लिमांना प्रिय ‘राम’ नाम असलेले ‘हिकायत सेरी राम’ नेमके आहे तरी काय?
गीत रामायणाची संकल्पना
१९५५ साली गीत रामायणाची संकल्पना मांडण्यात आली होती, ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी, पुणे यांच्या सुरुवातीच्या कालखंडात, स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांना एक रेडिओ कार्यक्रम सुरू करायचा होता. त्यात मनोरंजन आणि बोध या दोन्ही गोष्टी त्यांना अपेक्षित होत्या. म्हणून त्यांनी कवी आणि लेखक ग.दि. माडगूळकर यांना आपली योजना सांगितली. रामायण वाल्मिकींनी लिहिलेले भारतीय महाकाव्य आहे. माडगूळकर आणि लाड यांना संगीतबद्ध रामायणाची संकल्पना सुचली. त्यांनी संगीतासाठी बाबुजींकडे मदतीची मागणी केली.
अधिक मासाची किमया
गीत रामायणाचा कार्यक्रम सुरुवातीला एका वर्षासाठी, ५२ गाण्यांसह नियोजित होता. त्रिवार जयजयकार रामा या समारोप गीतासह नियोजित करण्यात आला होता, राम राजा होतो तिथे या कार्यक्रमाची सांगता होते, परंतु त्या वर्षी (१९५५ साली) हिंदू पंचांगानुसार अधिक मास होता. त्यामुळे अधिकची चार गीते जोडण्यात आली, मालिकेचा शेवट “गा बाळांनो, श्रीरामायण” या गाण्याने झाला आणि राज्य अभिषेकानंतरचा प्रसंग जोडला गेला. आधी या कार्यक्रमाची सुरुवात गुढी पाडव्याला होणार होती, परंतु नंतर रामनवमीच्या दिवशी करण्यात आली.
अधिक वाचा: राम कथा अनेक तरी राम नामाचे गारुड सारखेच; काय आहे कारबि रामायण?
कुश लव रामायण गाती…
माडगूळकरांनी पहिलं गाणं लिहून रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशी बाबूजींना दिलं, अशी आठवण विद्या माडगूळकर (माडगूळकरांच्या पत्नी) यांनी एका मुलाखतीत सांगितली; मात्र, फडके यांच्याकडून ते गीत हरवले. प्रसारण आधीच नियोजित असल्याने, स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांनी माडगूळकरांना हे गाणे पुन्हा लिहिण्याची विनंती केली, जे माडगूळकर यांनी नाकारले. यावर शक्कल लढवत लाड यांनी माडगूळकरांनी पुन्हा गाण्याची रचना करावी यासाठी त्यांना एका खोलीत बंद करण्याचा निर्णय घेतला, यानंतर माडगूळकरांनी १५ मिनिटात गाण्याची रचना केली आणि तेच हे गीत कुश लव रामायण गाती… आजही अजरामर आहे!