– दीनानाथ परब

चीनचा प्रत्यक्ष युद्ध लढण्यापेक्षा युद्धनितीवर जास्त विश्वास आहे. युद्धनितीच्या मार्गाने शत्रूला शक्य तितकं नामोहरम करण्याचा चीनचा प्रयत्न असतो. सीमेवर सैन्याची जमवाजमव, घातक शस्त्रास्त्रांची तैनाती, ग्लोबल टाइम्समधून धमक्या, इशारे देणे, चर्चेच्या टेबलावर कनिष्ठ रँकच्या अधिकाऱ्याला पाठवणे, आपल्या सैन्य शक्तीचे व्हिडीओ प्रदर्शित करणे हा सर्व त्यांच्या युद्धनितीचा एक भाग आहे. प्रत्यक्ष लढाई न लढता शत्रूवर मानसिक दबाव टाकून त्याला तह करण्यासाठी भाग पाडायचे आणि आपला फायदा करुन घ्यायचा, ही चीनची रणनिती आहे. चीन भूमाफिया असलेला देश आहे. आपल्या प्रचंड महत्वाकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठी विस्तार करायचा हेच त्यांचे धोरण आहे.

situation stable on china border says army chief general upendra dwivedi
चीन सीमेवर परिस्थिती स्थिर; लष्करप्रमुखांचे प्रतिपादन, जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीतही सुधारणा
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Ajit Pawar on Walmik Karad
Ajit Pawar on Walmik Karad: वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “दोषींना…”

फक्त भारतचं नाही, शेजारच्या सर्व देशांबरोबर चीनचे सीमावाद आहेत. चीनला आर्थिक प्रगतीच्या बळावर कमावलेली प्रचंड लष्करी ताकत दाखवून समोरच्याचा आवाज दडपून टाकायचा असतो. दक्षिण चीन समुद्रात मलेशिया, फिलीपाईन्स, व्हिएतनाम या देशांबरोबरही चीनचे असेच वाद सुरु आहेत. पूर्व लडाखमध्येही चीन यावेळी नियंत्रण रेषा बदलण्याच्या इराद्यानेच घुसला होता. पँगाँग टीएसओ, हॉट स्प्रिंग, गलवान खोऱ्यात चीनने मोठया प्रमाणावर सैन्य तैनाती केली. भारताने आपल्या हद्दीत सुरु असलेले इन्फ्रास्ट्रक्चरचे काम थांबवावे यासाठी चीनने दबाव टाकण्याचे सर्व प्रयत्न केले. पण भारताने उलट गलवान खोऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या ब्रिजची वेगाने उभारणी केली. डीबीओ रोडच्या कामाला गती दिली. म्हणजे चीन जे रोखण्याचा प्रयत्न करत होता, तेच काम उलट वेगाने पूर्ण केले.

चीनच्या प्रत्येक आक्रमक कृतीला जशास तसे उत्तर दिले. तणाव फक्त लडाखमध्ये होता. पण भारताने चीनला लागून असलेल्या ३४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर सैन्य आणून ठेवले. चीनला लागून असलेल्या फॉरवर्ड बेसजवळील एअर फोर्सचे सर्व तळ अ‍ॅक्टिव्ह केले. गलवान खोऱ्यासारख्या १४ हजार फूट उंचीवरील प्रतिकुल क्षेत्रात रणगाडे तयार ठेवले. सुखाई-३० एमकेआय, मिग-२९, हॉवित्झर, अपाची, चिनूक, ही सर्व अत्याधुनिक शस्त्रे चीनच्या दिशेने तैनात केली. खरंतर चीनला माइंड गेम खेळण्यात जास्त रस असतो. त्यामुळे पहिला अंक त्यांनी सुरु केला. लडाखजवळ चिनी फायटर विमानांची उड्डाणे, तोफांसह सैन्याची आक्रमक तैनाती, ग्लोबल टाइम्समधून इशारे हे सर्व त्यांनी करुन पाहिले.

पण गलवानमधील रक्तरंजित संघर्षानंतर मात्र भारताने आपली आक्रमकता दाखवायला सुरुवात केली. तिथे माइंड गेमचा दुसरा अंक सुरु झाला. लडाखमध्ये भारतीय फायटर जेटचे सराव सुरु झाले. खास डोंगराळ युद्ध लढण्यात पारंगत असलेली माऊंटन फोर्स सज्ज ठेवली. एकूणच चीनची दादागिरी खपवून घ्यायची नाही, हाच चंग भारताने बांधला होता. ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी, रस्ते प्रकल्पातून चिनी कंपन्यांची हद्दपारी असे आर्थिक आघाडीवर चीनला दणके देणारे निर्णय घेतले. या सर्वात मास्टर स्ट्रोक ठरला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लेह दौरा.

कुठलीही कल्पना न देता मोदी थेट लेहमध्ये दाखल झाले. जवानांना संबोधित करताना कुठेही चीनचे नाव घेतले नाही. पण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा रोख चीनकडे होता. एकूणच पूर्व लडाखमधील चीनच्या घुसखोरीला भारत किती गांभीर्याने घेतो आणि प्रसंगी दोन हात करण्यासाठी देखील मागे-पुढे पाहणार नाही हा संकल्प त्यांनी दाखवून दिला. मोदींच्या दौऱ्यानंतर तिसऱ्याच दिवशी चिनी सैन्य गलवान खोऱ्यातून एक ते दोन किमी माघारी फिरले आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्याचे निश्चित झाले आहे, गलवानमधून माघारी हा त्याच प्रक्रियेचा एक भाग आहे.

चीनने हा सर्व वाद विनाकारण उकरुन काढला. इतक्या मोठया प्रमाणावर सैन्याची जमवाजमव केल्यानंतर आता माघार घेणे, हा चीनच्या जिनपिंग यांच्या रणनितीचा सपशेल पराभव आहे. डोकलामच्यावेळी सुद्धा चीनवर अशीच वेळ ओढवली होती. प्रत्यक्ष युद्ध लढण्याऐवजी मानसिक युद्ध लढण्याचा चीनचा डाव भारताने त्यांच्यावरच उलटवला. चीनचा मुकाबला करता येऊ शकतो, हेच भारताने दाखवून दिले. चीनसोबत सीमावाद असणाऱ्या अन्य देशांसाठी सुद्धा हा एक धडा आहे.

Story img Loader