सध्या मणिपूर हे कुकी विरुद्ध मतैई या दोन गटांतील तणावामुळे होरपळले जात आहे. किंबहुना फारशा प्रकाशझोतात नसणाऱ्या मणिपूरकडे आज संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताच्या ईशान्येला असणाऱ्या सात राज्यांची ओळख शांत, निसर्गरम्य अशीच आहे. वेगवेगळ्या स्थानिक आदिवासी गटांच्या वसाहतीने भारतीय संस्कृतीच्या सौंदर्यात मोलाची भर घालण्याचे काम केले आहे. तेथील स्थानिकांची वेशभूषा, खानपान, राहणीमान, भाषा हे सारे काही नक्कीच भारतीय संस्कृतीच्या विविधतेतील सौंदर्य दर्शविणारे आहे. असे असले तरी आपण भारतीय या सात राज्यांविषयी जाणून घेण्यास कमी तर पडतो का, अशी शंका यावी अशी स्थिती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ईशान्य भारतीय नागरिकांच्या दिसण्या- बोलणाऱ्याच्या, खानपानाच्या वेगळेपणातून आपण त्यांना दूर लोटल्याचे चित्र अनेकदा उभे राहते. त्यांची चेहरेपट्टी चीनमधील लोकांसारखी असल्याने इतरत्र भारतात फिरताना तिथल्या महिलांना चिनी वेश्या वैगरे असे संबोधून त्यांचा अपमान करण्यात येतो. याच गोष्टीचा फायदा चीनसारखा देश घेत असतो, आणि भारतीयांच्या या प्रतिक्रियांचा वापर ईशान्येतील जनतेस उर्वरित भारतीयांच्या विरोधात उभे करण्यासाठी केला जातो. आज ईशान्य राज्यातील काही समाज स्वतंत्र राज्य, देशाची मागणी करत आहेत. यासाठी चिनी हस्तक्षेप काही प्रमाणात कारणीभूत असला तरी, आपली म्हणजेच भारतीयांची त्यांच्याप्रती असलेली दुय्यम भूमिकाही तितकीच कारणीभूत आहे, हे येथे विसरून चालणार नाही. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पराक्रम गाजवलेल्या परंतु आज विस्मरणात गेलेल्या मणिपूर मधील ‘राणी गाइदिन्ल्यू’ यांच्या विषयी जाणून घेणे नक्कीच क्रमप्राप्त ठरणारे आहे.
अधिक वाचा :भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी काश्मीरमध्ये नेमके काय घडत होते?
कोण होत्या राणी गाइदिन्ल्यू?
अवघ्या वयाच्या १७ व्या वर्षी इंग्रजांनी गाइदिन्ल्यू यांना पकडून जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यांनी इंग्रजांना जेरीस आणले होते. परंतु दुर्दैव असे की, भारत स्वतंत्र होईपर्यंत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. मूलतः गाइदिन्ल्यू यांचा जन्म मणिपूरमधील लोंग्काओ येथे रौंग्मी नागा जमातीतील लोथोनांग पामेई आणि क्चाक्लेनिऊ या दांपत्यापोटी झाला होता. नागा हा ईशान्य भारत आणि वायव्य म्यानमारमध्ये आढळणारा आदिवासी गट आहे. सध्या भारतापासून विलग होवून नवीन देशाच्या स्थापनेसाठी काही नागा गटांकडून प्रयत्न सुरु आहेत. परंतु हे लोण आजचे नाही, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून याची सुरुवात झाल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. इंग्रजांनी या फुटीरतेच्या बीजाचे रोपण केले. याच विरोधात गाइदिन्ल्यू आणि त्यांचे कुटुंब खंबीर उभे राहिले होते.
गाइदिन्ल्यू यांचा चुलतभाऊ ‘हैपोऊ जादोनांग’ याने हेराका नावाचे धार्मिक आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या माध्यमातून नागा लोकांच्या ख्रिश्चनीकरणास त्यांनी विरोध केला होता. गाइदिन्ल्यू या शिक्षित नसल्या तरी आपली संस्कृती, देशाप्रती त्यांची आस्था मोठी होती. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी आपल्या भावाने सुरु केलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. याच काळात संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध आंदोलन सुरु होते, गाइदिन्ल्यू सहभागी झालेल्या आंदोलनालाही इंग्रजांविरुद्धच्या सशस्त्र आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. याचमुळे २९ ऑगस्ट १९३१ राजी हैपोऊ जादोनांग यांना इंग्रजांकडून अटक झाली आणि फाशीची शिक्षा देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर जादोनांग यांनी सुरु केलेल्या आंदोलनाची धुरा सोळा वर्षांच्या गाइदिन्ल्यूकडे आली.
गाइदिन्ल्यूकडे यांची कामगिरी
गाइदिन्ल्यूकडे यांनी इंग्रजांविरोधात चार हजार लोकांचे संघटन केले होते. इंग्रज सरकारकडे कर भरू नका अशी जनजागृती केली, त्यामुळे इंग्रजांनी अनेक वेळा त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. १९३२ साली गाइदिन्ल्यू यांनी आसाम रायफल्सच्या हंग्रुम गावातील फौजेच्या संरक्षणाकरता असलेल्या आउट पोस्टवर भाल्यांच्या साहाय्याने हल्ला केला. यानंतरही त्यांच्या ब्रिटिशांविरोधात छुप्या कारवाया सुरूच होत्या, त्यामुळे इंग्रजांनी त्यांना पकडून देण्यासाठी बक्षीसही घोषित केले होते. या बक्षिसात कर माफी, ५०० रुपये यासारख्या बक्षिसांचा समावेश होता. ज्या गावांनी त्यांना मदत केली त्या गावांमध्ये इंग्रजांकडून जाळपोळ करण्यात आली.
गाइदिन्ल्यू यांनी १९३२ मध्ये क्रांतिकारकांच्या मदतीसाठी पुलोमी गावात एक लाकडी पूल बांधण्याचे काम हाती घेतले. १७ ऑक्टोबर १९३२ साली इंग्रजांनी येथे टाकलेल्या अचानक धाडीत त्या आणि त्यांचे साथीदार पकडले गेले. त्यांच्यावर खटला चालविण्यात आला आणि भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत जवळपास पंधरा वर्षे त्या कैदेत राहिल्या. या कालखंडात त्यांना कोहिमा, गुवाहाटी, शिलाँग, तुरा अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुरुंगात ठेवण्यात आले. पंडित नेहरू यांनी त्यांना त्यांच्या धाडसाबद्दल ‘राणी’ ही पदवी बहाल केली.
अधिक वाचा : स्वातंत्र्य दिन विशेष: इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य लढ्यात पहिला मानवी बॉम्ब वापरणारी राणी ‘वेलू नचियार’!
स्वतंत्र भारतातील संघर्ष
भारत स्वतंत्र झाल्यावर गाइदिन्ल्यू या नागा संस्कृतीच्या जतनासाठी कार्यरत राहिल्या. नागा नॅशनल कौन्सिलच्या भारतातून स्वतंत्र होण्याच्या मागणीला त्यांचा विरोध होता. त्यांनी भारतातच स्वतंत्र झेलियनग्रोंग प्रदेशाची मागणी केली होती. यामुळे त्यांचे त्यांच्याच समाजातील लोकांशी वितुष्ट आले. नंतरच्या कालखंडात गाइदिन्ल्यू यांनी नागा समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहिल्या. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य आणि नागा संस्कृतीच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नामुळे त्यांची तुलना झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंशी करण्यात येते. गाइदिन्ल्यू यांच्यामुळे मणिपूरची स्वातंत्र्य चळवळ ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी जोडली गेल्याने भारताच्या आणि मणिपूरच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरते.