गणेश जयंती २०२३ : आबालवृद्धांना कधीना कधी पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गणपतीचे वाहन उंदीर का असते ? गणपती तर भव्य आहे, बुद्धिमान आहे. उंदीर चंचल आहे. आकारानेही लहान आहे. मग, उंदीर गणपतीचे वाहन का ठरला ? तसेच गणपतीला मयुरेश्वर म्हटले जाते. मग, मोराचा आणि गणपतीचा संबंध काय? मोर हे गणपतीचे वाहन होते का ? गणेश पुराण गणपतीच्या वाहनांविषयी काय सांगते हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

गणेशोत्सव हा सर्वांना आवडणारा आणि उत्साह जागवणारा सण आहे. गणपती ही देवता अगदी लहान बाळापासून मोठ्यांना आपलीशी वाटते. लडिवाळ भक्ती मान्य असणारी ही एक देवता आहे. परंतु, अनेकांना प्रश्न पडतो की, गणपतीचं वाहन उंदीर का आहे ? गणपती लंबोदर आणि महाकाय आहे. उंदीर हा तर छोटासा प्राणी आहे. मग गजाननाला उंदीर हे वाहन कसे प्राप्त झाले असेल? तसेच बहुतांश लोकांना गणपतीचे वाहन मोर होते, हे माहीत नसते. गणेशपुराणात या संदर्भात आख्यायिका सांगितली आहे.

Tuljabhavani temple, Jagdamba, sambal,
तुळजाभवानी मंदिरात सीमोल्लंघन सोहळा जल्लोषात, संबळाच्या निनादात मंदिर परिसरात जगदंबेच्या नावाचा जयघोष
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Pivali Jogeshwari Temple History
पुण्यातील या जोगेश्वरीला ‘पिवळी जोगेश्वरी’ का म्हणतात? जाणून घ्या काय आहे इतिहास?
Navratri 2024: Jijabai
Navratri 2024: जिजामातेच्या जन्मकथेचा संबंध रेणुकादेवीशी कसा जोडला गेला; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?
Chaitanya Parva of Navratri begins in Kolhapur
कोल्हापुरात नवरात्रीच्या चैतन्यपर्वास प्रारंभ
Daily Horoscope 28th September 2024 Rashibhavishya in Marathi
२८ सप्टेंबर पंचांग: इंदिरा एकादशीला मेषची इच्छा पूर्ती तर व्यापारी वर्गाची चांदी; तुमच्या कुंडलीत पडणार का धन-सुखाचा पाऊस? वाचा राशिभविष्य
Siddhivinayak Temple
Siddhivinayak Temple : प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदरांची पिल्ले? व्हायरल VIDEO वर मंदिर प्रशासनाचं स्पष्टीकरण काय?
Restoration of Shree Chatu Shringi Temple is nearing completion ahead of Sharadiya Navratri festival
पुणे : नवरात्रोत्सवापूर्वी चतु:शृंगी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास,मंदिर रविवारपासून भाविकांना दर्शनासाठी खुले

हेही वाचा : हरतालिका म्हणजे काय ? हरतालिकेची ‘ही’ कथा तुम्हाला माहीत आहे का ?

गणपतीचे वाहन उंदीर का आहे ?

गणेशपुराणानुसार, क्रौंच नावाचा एक गंधर्व इंद्रसभेत उपस्थित असतांना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला. रागावलेल्या वामदेवाने तू मूषक होशील, असा त्याला शाप दिला. त्या शापाप्रमाणे क्रौंच गंधर्व मूषक झाला आणि त्याच रूपात थेट पराशरमुनींच्या आश्रमात दाखल झाला. त्याने आश्रमात जेवढे काही खाण्यासारखे होते, ते सर्व खाऊन टाकले, जे खाण्यासारखे नव्हते ते कुरतडून टाकले. त्याचा हा धुडगूस असह्य होऊन पराशरमुनींनी त्यापासून मुक्तता करावी, अशी श्रीगणेशाला प्रार्थना केली. पराशरमुनींची प्रार्थना स्वीकार करून प्रत्यक्ष गणपती तेथे प्रकट झाले आणि त्यांनी आपला पाश मूषकावर टाकला. पाशामुळे मूषक तेवढ्यापुरता गणपतीला शरण आला. प्रसन्न झालेल्या गणपतीने उंदराला वर मागण्यास सांगितले. मात्र, मूषक गर्वाने आंधळे झाले होते. त्यांनी उलट गणपतीलाच सांगितले की, तुला काय हवे असेल तर मला सांग, मी तुझ्यापाशी वर मागणार नाही. उंदराचे हे बोलणे ऐकून गणेशाने मुत्सद्दीपणाने मूषकाला सांगितले की, मी तुझ्याकडे वर मागतो. तू आजपासून माझे वाहन हो. मूषकाला आपल्या गर्विष्ठपणाचा पश्चात्ताप झाला. त्यामुळे उंदीर हे गणपतीचे वाहन झाले.

गणपतीचे वाहन मोर होते का ?

अष्टविनायकांपैकी प्रथम गणपती मोरगावचा मयुरेश्वर आहे. गणपतीचे वाहन उंदीर असताना मयुरेश्वर हे नाव का प्राप्त झाले ? तर यासंदर्भात एक आख्यायिका आहे. पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. त्यामुळे युद्धाच्या वेळी गणपतीचे वाहन मोर होते. गणपतीचे वाहन सिंहसुद्धा असल्याचे उल्लेख सापडतात.

सध्या गणपतीचे प्रसिद्ध वाहन उंदीर आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी उंदराचीही पूजा केली जाते. गणपतीची षोडशोपचार पूजा करताना वाहन पूजासुद्धा करतात. याकरिता गणपतीला मूषकवाहन, मूषकध्वज असेही म्हटले जाते.