पूजा केळकर

आतापर्यंत हम दिल दे चुके सनम मध्ये ऐकलेला शब्द काल प्रत्यक्ष एका गुजराती मुलाकडून ऐकायला मिळाला!!! So authentic that too in Dombivali!! निमित्त होतं अहोंच्या क्रिकेट क्लब ऑफ डोंबिवली, म्हणजे ‘सीसीडी’चा पतंग महोत्सव!!

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

काल दुपारी चार वाजता योगेश नाख्येंच्या गच्चीवर सीसीडीचे अनेक मेंबर्स सहकुटुंब जमतील असं नियोजन होतं.

माझ्यासाठी तर पूर्ण नवीन अनुभव.

लहानपणी पण कधीच पतंग उडवला नाही. किंवा हा खेळ बघितला पण नाही.

सो मी खूपच excited होते….

फुल्ल तयारी होती.

खास कुर्ल्यावरून निवडून पक्षी फ्रेंडली मांजे आणले होते.

खूप सारे रंगीत पतंग!!

आणि भरपूर सारे बँड एड पट्ट्या….

मला आधी कळेचना….. आणि मग एकदम strike झालं….

उंगली कट सकती है बाबू……

तर हळूहळू मंडळी जमायला लागली.

काहीजण एकदम प्रो होते….. मग आला क्लब मधला गुज्जू भाई!! राजकोट ना छोरा!!! दीव मकवाना!!

पतंग, मांजा, हवेचा जोर, हवेची दिशा याहून काय महत्त्वाचं असेल तर पतंगाला कण्णी बांधणे!!!!
दीव ने जवळपास ८० टक्के पतंगांना कण्णी बांधली असेल….

कुणाचा पतंग भरकटला, हवेत गोल गोल गिरक्या घ्यायला लागला, खाली यायला लागला की दीवच्या नावाचा पुकारा होई…..

दीव पण अतिशय उत्साहाने संपूर्ण गच्चीभर फिरत होता….

लहान मुलांना कण्णी बांधून दे, कुणाचा पतंग हवेत उडवून दे….

लहान मुलांसोबत सगळ्या मोठ्यांना हात सांभाळा, बँड एड लावलं का… ते लावूनच पतंग उडवा असंही काळजीपोटी सांगत फिरत होता…

मग साधारण अर्ध्या पाऊण तासाने पाच सहा पतंग आकाशात दिसू लागले… दीवचा पतंग अर्थात सगळ्यात वर आणि खूप स्थिर होता…..

बच्चे कंपनी मध्ये दीव अंकल ऑन डिमांड!!!!

आणि मग काटा काटी सुरू झाली……

प्रत्येक पतंग काटल्यानंतर दीव मनापासून कायऽऽपोचेऽऽ आरोळी द्यायचा……

आपल्या लहानपणाची गोष्ट परत अनुभवायला मिळणं ते ही आपल्या घरापासून हजारो किलोमीटर दूर याचा nostalgia, आनंद, उत्सुकता आणि समाधान दीव आणि त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर दिसत होत….

आकाशात उडणारे पतंग बघायला मज्जा येते….पण त्यामागे एवढा तामझाम असतो हे काल समजलं…..

चांगल्या तरीही वजनाने हलक्या कागदापासून बनवलेला पतंग, चांगल्या प्रतीचा मांजा जो पक्ष्यांना हानी पोचवणार नाही, कण्णी बांधणे, वाऱ्याची दिशा ओळखणे, फिरकी धरणे, ढील कधी व किती प्रमाणात देणे, हात कोपऱ्यात कसा मुडपणे आणि आपल्या पायांची तालबद्ध हालचाल इतकं सगळं जमलं की पतंग आकाशात उंच जातो!!!!!

कौशल्य, मेहनत, सातत्य, स्वतःची काळजी, मित्र, प्रोत्साहन आणि काही प्रमाणात नशीब म्हणजे पतंगबाजी!!!

असंच आपलं आयुष्य असायला हवं नाही का!!!!

म्हणजे कुणाचंही यश दिसतं तेव्हा आपल्या बॅक ऑफ द माईंड या गोष्टी आहेत म्हणून यश आहे, हे असायलाच हवं……

काल एखादा पतंग कापला गेल्यानंतर उरलेला मांजा हळुवार आणि शिस्तबध्द पध्दतीने परत घेऊन फिरकीला गुंडाळून ठेवत होते हे विशेष!!! And it’s a ritual बर का!! आणि दीव यात पण आघाडीवर होता… “अरे भाई उतार ले किसी को लग-वग जायेगा!!”(भारतीय सणांच्या नावाने गळेकाढू संघटनेसाठी खास)

सरतेशेवटी एकच पतंग राहिला आणि मग त्याला खाली आणलं गेलं…. That too.. too satisfying to watch!!!!

मिसळ पाव आणि आईसक्रीम पार्टी नंतर पतंग महोत्सव संपला!!!

काही नवीन ओळखी, निखळ आनंद, पूर्णतः नवीन अनुभव ह्यात रविवार संध्याकाळ छान गेली!!!

अजून काय हवं!!!!

तेज़ तेज़ तेज़ है
मांजा अपना तेज़ है
उंगली कट सकती है बाबू
तो पतंग क्या चीज़ है
ढील दे
ढील दे दे रे भैया
हे ढील दे
ढील दे दे रे भैया
उस पतंग को ढील दे
जैसे ही मस्ती में आये
हे जैसे ही मस्ती में आये
उस पतंग को खींच दे
ढील दे
ढील दे दे रे भैया………..
काय…ऽऽपो…..चे..ऽऽऽ……

Story img Loader