-सॅबी परेरा

आपण प्रगतीच्या आणि समानतेच्या कितीही बाता मारत असलो तरी आर्थिक / सामाजिक / शैक्षणिक वर्गभेद हे जगभरच्या समाजांचे वास्तव आहे. आपल्या देशाच्या बाबतीत तर, ही दोन वर्गांना दुभंगणारी रेषा अधिकच ठळक आहे. आर्थिक / सामाजिक / शैक्षणिक परिस्थितीवरून आपला समाज “आहे रे” आणि “नाही रे” अशा दोन वर्गात विभागला गेला असून त्याला जाती-धर्माचे अधिकचे कंगोरेही आहेत. या दोन्ही वर्गाचा जीवनगाडा एक दुसऱ्याच्या सहकार्याशिवाय चालणारा नसला तरी यातील एका वर्गाला दुसऱ्याबद्दल असूया आणि दुसऱ्या वर्गाला पहिल्याबद्दल तिरस्कार वाटत असतो. आपल्यावर अन्याय करून सुखासीन जीवन जगणारे म्हणून निम्नवर्गीय उच्चवर्गीयांवर मनातल्या मनात खार खाऊन असतो आणि आपण सरकारला भरणाऱ्या करांच्या जीवावर ऐश करणारे ऐतखाऊ म्हणून उच्चवर्गीयांच्या मनात निम्नवर्गीयांबद्दल संताप खदखदत असतो. दोन्ही गटात वरवर सगळं आलबेल दिसत असलं तरी आतून कुठेतरी एकमेकाविषयी पीळ असतोच. कधीतरी एखादं धार्मिक स्थळ उध्वस्त करण्यासारख्या किंवा बॉम्बस्फोटासारख्या घटना घडतात तेव्हा या दोन वर्गातील दुभंगाचा हिंस्त्र आणि किळसवाणा चेहरा समोर येतो, हे आपण पाहिलेलं आहेच.

evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Nagpur Swapnils Bits Gang emerges as otorious gangs vanish from the city
शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात ‘बिट्स गँग’चा उदय, सत्ताधारी नेत्याच्या छत्रछायेत स्वप्निलचे दुष्कृत्य
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
The Karanja Sub Bazar Committees board was dismissed and an administrator appointed
महायुती एक्टिव मोडवर! बाजार समिती बरखास्त करीत खासदार गटास दिला झटका.

अशाच प्रकारे, एका अगदी शुल्लक गोष्टीच कारण होऊन एकमेकांविरुद्ध संघर्षाच्या पावित्र्यात उभी ठाकलेली एक उच्च मध्यमवर्गीय हाऊसिंग सोसायटी आणि त्या सोसायटीच्या जवळच असणारी गरीब कामगाराची वस्ती यातील संघर्ष जयंत पवारांच्या कथेवर आधारित समीर पाटील दिग्दर्शित “भाऊबळी” या सिनेमात खुमासदार पद्धतीने रंगवला आहे. संपूर्ण सिनेमाला एक अर्कचित्रात्मक ट्रीटमेंट देतानाही जयंत पवारांच्या मूळ कथेतील आत्मा हरवणार नाही ह्याची दिग्दर्शकाने काळजी घेतली आहे आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत.

भाऊ आवळस्करच्या भूमिकेतील मनोज जोशी यांनी आपल्या उच्चवर्गीय असण्याचा दंभ आणि माज आपल्या संवादाच्या उच्चारातून, नजरेतून आणि एकंदर देहबोलीतून नेमका पोहोचवला आहे.

दबलेल्या, पिचलेल्या वर्गाचा प्रतिनिधी ही किशोर कदमची आजवरील सिनेमातील हातखंडा भूमिका असली तरी ‘भाऊबळी’ मधील बळीच्या भूमिकेला एक कॉमिक शेड आहे. बळीच्या भूमिकेद्वारे किशोर कदमने, विनोदी भूमिका देखील उत्तम प्रकारे साकारून आपले अष्टपैलुत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

या सिनेमातील ऋषिकेश जोशीची इन्स्पेक्टरची भूमिका म्हणजे कहर आहे. त्याचा या भूमिकेत असा काही सूर लागलाय की ज्या ज्या सीनमधे ऋषिकेश जोशी पडद्यावर आहे तो तो संपूर्ण सीन त्याने अक्षरशः खाऊन टाकला आहे.

‘क्रांतिगीता’ ही बहुधा मानसी कुलकर्णीची सिनेमातील पहिलीच पूर्ण लांबीची भूमिका असावी. ही भूमिका मानसीने उत्तम वठवली आहे. रमाबाई आवळस्करच्या भूमिकेतील मेधा मांजरेकर, बळीची बायको द्रुपदीच्या भूमिकेतील रसिका आगाशे, नटमोगरी रेशम टिपणीस, निवृत्त न्यायाधीश राजन भिसे, मिलिट्री-मॅन अभय कुलकर्णी, डावा विचारवंत विजय केंकरे, आनंद अलकुंटेचा नगरसेवक, आवळस्करांची मुलगी झालेली प्रियदर्शनी इंदाळकर, न्यूज रिपोर्टर शार्दूल सराफ, विश्वास सोहनीचा बोडलेकर महाराज, अजित भुरेंचा सरकारी अधिकारी या सगळ्यांनीच आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. इतक्या साऱ्या मातब्बर कलाकारांच्या मांदियाळीतही संतोष पवारने वठवलेली वस्तीत राहणाऱ्या बेरकी मास्तरची भूमिका विशेष लक्षात राहते.

सिनेमातील दोन्ही गाणी कथानक पुढे नेण्याचं काम करतात. सिनेमाचा विषय गंभीर असला तरी हलक्याफुलक्या हाताळणीचा टोन सेट करण्यात पार्श्वसंगीताचा मोठा हात आहे. इतर तांत्रिक अंगेही उत्तम आहेत.

एकंदरीत, एका दर्जेदार कथेचं तितकंच दर्जेदार सिने-रूपांतर पाहायचं असेल तर कुटुंबासहित थिएटर मधे जाऊन “भाऊबळी” पाहायला हरकत नाही.

सॅबी परेरा

Story img Loader