बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांना मत देण्याचे मतदारांना आवाहन केले आणि शुक्रवारी इतिहास घडला. तब्बल 24 वर्षे उत्तर प्रदेशमधले हे दिग्गज नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. परंतु नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी सपा-बसपा एकत्र आले आणि मायावतींनी मैनपुरीतील मतदारांना मुलायम सिंहांना मत देण्याचे आवाहन करण्याची एरवी अशक्यप्राय वाटणारी घटना घडली.
मायावतींचं सभेमध्ये स्वागत करताना मुलायम सिंहांनी आपल्या कार्यकर्त्यांना बसपाच्या अध्यक्षांचा मान राखण्यास सांगितलं. परिस्थिती वाईट असताना मायावतींनी नेहमीच आपल्याला साथ दिली असल्याचे मुलायम म्हणाले. तर मायावतींनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी हे नकली व फर्जी मागासवर्गीय असल्याचा आरोप केला. 1995 मध्ये गेस्ट हाऊस प्रकरण नावाने ओळखली जाणारी घटना घडली आणि तेव्हापासून सपा व बसपा एकमेकांचे कट्टर वैरी झाले. तेव्हापासून आजतागायत एकमेकांचा पाणउतारा करणारे मुलायम व मायावती या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं केवळ एकत्रच नाही आले तर राजकीय व्यासपीठावर देखील शुक्रवारी दिसले. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यापासून रोखणं हा एकच दोघांचा सामायिक अजेंडा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा