समीर जावळे

‘शोले’ हा फक्त सिनेमा नाही तर तो भारतीय चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला आहे. कारण आजही शोले पाहिला नाही असा भारतीय माणूस सापडणं तसं कठीणच आहे. ‘शोले’ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय काय येतं? गब्बर सिंग, जय-विरू, ठाकूर बलदेव सिंग, सुरमा भोपाली, ‘अंग्रेज के जमाने के जेलर’, ‘धन्नो’, ‘बसंती’, ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’ विचारणारे ए.के. हंगल, ‘रामगढ’, ‘सांबा’, ‘कालिया’, अगदी डाकूंना घेऊन धावणारे घोडेही. म्हणजेच या सिनेमातली प्रत्येक गोष्ट तिच्या बारकाव्यांसह आपल्याला पाठ आहे.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Aries To Pisces Horoscope Today in Marathi
२६ डिसेंबर पंचांग: शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी १२ पैकी ‘या’ राशींना लक्ष्मीकृपेने मिळेल मेहनतीचे फळ; तुमच्या कुंडलीत धन की कष्ट?
Surya Nakshatra Gochar 2024
२९ डिसेंबरपासून मिळणार छप्परफाड पैसा! सूर्यदेवाच्या कृपेने चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब
Shani Nakshatra Gochar
Shani Nakshatra Gochar 2024 : दोन दिवसानंतर शनि देव करणार नक्षत्र परिवर्तन; या तीन राशींचा सुरू होणार राजयोग, अपार पैसा-संपत्ती मिळणार
25 December Rashi Bhavishya In Marathi
२५ डिसेंबर पंचांग: चारचौघात कौतुक ते अचानक धनलाभ; पंचांगानुसार आज तुमची रास ठरेल का भाग्यवान? वाचा राशिभविष्य
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश

‘शोले’ने सेट केला नवा ट्रेंड

‘शोले’ हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतला मैलाचा दगड का ठरतो? तर या सिनेमाने दे मारधाड पटांचा एक ट्रेंडच सिनेसृष्टीत आणला. १९७५ ला हा सिनेमा येईपर्यंत काही मोजके सिनेमा असे होते की ज्यात मारामारी, अॅक्शन सीन होते. मात्र ‘शोले’ने ट्रेंड सेट केला आणि त्यानंतर अशा सिनेमांची लाटच आली. कारण शोले सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांची अभिरुची एका रात्रीत बदलून गेली. इंग्रजी सिनेमांबाबत बोलायचं झालं तर ‘द गॉडफादर’ हा १९७२ मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा होता. त्याच्या नंतर बऱ्याच हलक्या कॉपी आपल्याकडे आल्या. मात्र शोले हा सिनेमा तसा नव्हता. या सिनेमाचा मूळ धागा होता सूड. त्यानंतर एका चित्रपटात, खासकरुन मसालापटात ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या होत्या. जय-विरुची दोस्ती, बसंती आणि विरुचं प्रेम, गाव, गावातली माणसं.. गावाला धमकवणारा डाकू. अकिरा कुरोसोवांच्या सेव्हन समुराईज या सिनेमावर शोले बेतलेला होता असं म्हटलं जातं. मात्र देशी मातीत तो इतका मिसळून गेला.. की ही बाब लोक विसरुनही गेले. सामान्य माणसाला आपलीशी वाटेल अशा प्रत्येक गोष्टीची भट्टी ‘शोले’ने जमवून आणली होती.

संवादांमुळे शोलेतलं प्रत्येक पात्र ठरलं एकदम खास

‘शोले’तलं प्रत्येक पात्र लक्षात राहण्यासारखं ठरलं कारण त्या पात्रांची देहबोली, त्यांचे डायलॉग आणि त्यांचा अभिनय हे सगळंच सशक्त होतं. जसं सांबाचं काम करणारा मॅक मोहन याला फक्त सिनेमात ‘पुरे पचास हजार’ इतकाच संवाद होता. मात्र तो लोकांच्या आजही लक्षात आहे. तसंच ‘सरदार, मैने आपका नमक खाया है’ म्हणणारा कालिया. ‘हम अंग्रेजो के जमाने के जेलर’ म्हणणारा असरानी.. विशिष्ट हैदराबादी ढंगात बोलणारा सुरमा भोपाली हे सगळे सिनेमाचे आधारस्तंभच होते. अर्थातच महत्वाच्या भूमिका होत्या त्या अमिताभ (जय), धर्मेंद्र (विरू), संजीव कुमार (ठाकूर बलदेव सिंग), हेमा मालिनी (बसंती), जया भादुरी (राधा) आणि अमजद खान (गब्बर सिंग) यांच्या. पण या सिनेमातलं छोट्यातलं छोटं पात्र लक्षात राहिलं आहे कारण त्याला दिलेले संवाद. सलीम जावेदच्या लेखणीतून सिनेमा पूर्ण झाला होता. गब्बरच्या तोंडी असलेले (अमजद खान) ‘सुअर के बच्चो’, ‘कितने आदमी थे?’, ‘तेरा क्या होगा कालिया?’, ‘जो डर गया समझो मर गया’ हे संवाद आजही आपल्याला पाठ आहेत. सलीम खान आणि जावेद अख्तर या दोघांनी मिळून लिहिलेले संवाद सशक्त होते त्यामुळेच शोले भावतो, मनात घर करतो.

१५ ऑगस्ट या दिवसाशी शोलेचं खास कनेक्शन

१५ ऑगस्ट १९७५ हा तोच दिवस आहे ज्या दिवशी शोले प्रदर्शित झाला. समीक्षकांनी हा सिनेमा जेव्हा पाहिला तेव्हा त्यावर सडकून टीका केली होती. इतका हिंसाचार कधी पडद्यावर दाखवला जातो का?, सूडकथा दाखवून काय साध्य करायचं आहे? वगैरे बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र तिकिटबारीवर सिनेमाने कमाल केली आणि त्यानंतर झालेल्या ‘माऊथ पब्लिसिटी’नेही. शोले सुपरहिट ठरला. या सिनेमातले किस्सेही नंतर मोठ्या प्रमाणावर समोर आले. जयच्या भूमिकेसाठी शत्रुघ्न सिन्हाला फायनल करण्यात आलं होतं. तर गब्बरच्या भूमिकेसाठी डॅनीला. पण अमिताभला जयची भूमिका द्या हे धर्मेंद्रने रमेश सिप्पींना सांगितलं आणि अमिताभ सिनेमातला ‘जय’ झाला. तर अमजद खानचा आवाज खर्जातला किंवा व्हिलनला शोभेल असा नाही असं मत तयार झालं होतं. पण सलीम जावेद यांनी जेव्हा अमजद खानची स्क्रिन टेस्ट पाहिली तेव्हा हाच आमचा ‘गब्बर’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे अमजद खान सिनेमात राहिला आणि त्याने गब्बरची भूमिका अजरामर केली.

‘शोले’ हा पहिला ‘मल्टी स्टारर सिनेमा’ही ठरला. कारण आत्तापर्यंत एका सिनेमात इतक्या आघाडीच्या कलाकारांना घेण्यात आलं नव्हतं. शोलेमध्ये हा यशस्वी प्रयोग करण्यात आला. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, जया भादुरी, हेमा मालिनी, जगदीप, असरानी, सचिन असे सगळे आघाडीची कलाकार सिनेमात होते. शोलेचं अजून एक खास वैशिष्ट्य असं की या सिनेमासाठी पारंपरिक सेट किंवा स्टुडिओ न वापरता एक संपूर्ण गावच उभं करण्यात आलं होतं. रामोजी फिल्मसिटीत रामगढ वसवलं गेलं होतं.

संगीत ही ‘शोले’ची आणखी एक जमेची बाजू

शोलेचं टायटल म्युझिक असो किंवा होळीचं गाणं, ‘मेहबुबा’ गाणं असो किंवा ‘कोई हसीना जब रुठ जाती है’ तो.. सगळी गाणी हिट होती. ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ हे तर आजही फ्रेंडशिप डेला म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांपैकी एक गाणं असतं. ‘शोले’चं म्युझिक दिलं होतं आर. डी बर्मनने. १५ ऑगस्ट १९७५ ला प्रदर्शित झालेला ‘शोले’ आज ४८ वर्षांचा झालाय. पण त्याचं गारुड आजही प्रेक्षकाच्या मनावर कायम आहे.

Story img Loader