संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याला २२ वर्ष झाल्यानिमित्त बुधवारी (१३ डिसेंबर २०२३) संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दरवर्षीप्रमाणे नऊ शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. खलिस्तानवादी अतिरेकी गुरुपतवंतसिंग पन्नू याने काही दिवसापूर्वीच २००१ च्या हल्ल्याचा संदर्भ देऊन संसदेवर पुन्हा हल्ला करू अशी धमकी दिली होती. यामुळे संसदेतील सुरक्षा व्यवस्था बाहेरील आक्रमणासाठी सज्ज होती. एवढ्या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेला भेदून दोन तरूण प्रेक्षक गॅलरीपर्यंत पोहोचले. पुढे काय झालं, हे आपण बातम्यांमधून वाचतच आहोत. या गुन्ह्यात सहा तरुणांचा सहभाग असल्याची माहिती उघडकीस आली आहे. कालांतराने त्यांच्या चौकशीतून या कृतीमागचे खरे कारण समोर येईल. पण तत्पूर्वी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे तर सोडाच हे प्रश्नही या खासदारांच्या लक्षात आले आहेत की नाही हाच महत्त्वाचा प्रश्न आहे!

खासदारांकडून तरुणांची ‘पब्लिक धुलाई’

लोकसभेत घुसखोरी केलेल्या सागर शर्मा आणि डी. मनोरंजन या तरुणांना खासदारांनी चोप दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. भारताच्या सर्वोच्च कायदेमंडळात बसलेल्या खासदारांनी युवकांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काम करणे अपेक्षित आहे, त्या सभागृहात खासदार त्या दोन तरूणांना पकडून अक्षरशः पब्लिक धुलाई करताना दिसले. अशी पब्लिक धुलाई ‘मुंबई लोकल’मध्ये अनेकदा पाहायला मिळते. एखादा चोर किंवा नशेबाज सामान्यांच्या हातात सापडल्यावर अशाच प्रकारे त्याची धुलाई होत असते. खासदारांनी ही धुलाई करून तेही ‘सामान्य’ असल्याचेच दाखवून दिले. सागर आणि मनोरंजन यांनी सभागृहात घुसल्यामुळे ते थेट आरोपी तर ठरलेच. शिवाय संसदेच्या बाहेर त्यांचे साथीदार नीलम आझाद आणि अमोल शिंदे यांनी घोषणाबाजी करून या घुसखोरीचा ‘उद्देश’ काय होता? त्याची झलक दाखविली. या प्रकारात आणखी दोन आरोपींचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाचव्या आरोपीला अटक केली असून सर्वांवर यूएपीए कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
cm Eknath Shindes promise to make Mumbais roads pothole free in two years vanished
मतदान यंत्रांमध्ये फेरफार नसल्याचे शपथ घेणाऱ्या विरोधकांना पटले का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
Sanjay Shirsat On Mahayuti Cabinet Politics :
Sanjay Shirsat : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “मंत्रिपदे देताना…”
devendra fadnavis takes oath as chief minister of maharashtra for the third time
तीन ताल… फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पवारांचा सहावा विक्रमी शपथविधी

नीलम आणि अमोल शिंदेने संसदेबाहेर बेरोजगारी, महिला अत्याचार आणि मणिपूर हिंसाचाराबाबतच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीतही पाच आरोपींनी देशातील समस्यांबाबत आम्ही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही कृती केली असे म्हटले. सहावा आरोपी ललित झा पकडला गेल्यानंतर कदाचित आणखी माहिती समोर येऊ शकते.

हे वाचा >> Parliament Attack: इंजिनिअर ते ई रिक्षाचालक कोण कोण आहेत संसदेत घुसखोरी करणारे आरोपी?

विरोधक सरकारला लक्ष्य करण्यात दंग

बेरोजगारी किंवा इतर मुद्द्यांसाठी कुणी एवढा मोठा धोका पत्करू शकतं का, हा विचारच सरकारच्या पचनी पडणं थोडं कठिण आहे. सरकारचं काय तर विरोधक आणि सामान्यांनाही हे पचवणं थोडं कठीण जाईल. घुसखोरीचा प्रयत्न झाल्यानंतर काल विरोधी पक्षातल्या अनेक खासदारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये सर्वांनीच मोदी सरकारला लक्ष्य करण्यात धन्यता मानली. नवे संसद भवन सुरक्षेच्यादृष्टीने कसे कुचकामी आहे, याकडेच सर्वांचा रोख होता. पंचविशी-तिशीत असलेल्या या तरुणांनी इतकी मोठी ‘रिस्क’ घेण्याचा विचार का केला असावा? त्यामागे त्यांचा काय विचार होता? याबद्दल कुणालाच प्रश्नही विचारावासा वाटला नाही.

चौथ्या स्तंभाचा चोथा

खासदार आपल्या वकुबाप्रमाणे वागत असताना संसदेत अधिवेशनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनीही याबाबत खासदारांना प्रश्न विचारणे अपेक्षित होते. जेणेकरून देशातील इतर माध्यमांना खासदारांच्या तोंडून काहीतरी उत्तर मिळाले असते. पण घुसखोरांनी आणलेली स्मोक कँडल एकमेकांच्या हातातून पळविण्यात पत्रकारही मश्गूल होते. पत्रकारांच्या पकडापकडीचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एकूणात माध्यमांची थट्टा उडवली जात आहे.

भगतसिंगांच्या विचारांनी प्रभावित

दिल्ली पोलिसांनी पाचही जणांची चौकशी करून सांगतिले की, हे तरूण सोशल मीडियावरील ‘शहीद भगतसिंग फॅन क्लब’ नावाच्या पेजवरून एकमेकांच्या संपर्कात होते. सागर आणि नीलमच्या सोशल मीडियावर नजर टाकली असता त्यांनी याआधीही देशहितासंबंधी काही प्रश्न उपस्थित केलेले दिसून येतात. दोघेही शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या विचारांनी प्रभावित झाल्याचे पाहायला मिळते. यातील नीलमला तर भाजपाच्या आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी ‘आंदोलनजिवी’ हा टॅगही देऊन टाकला. मालवीय यांनी इथेच न थांबता या तरुणांची तुलना थेट कसाबशी केली. म्हैसूरच्या आपल्या (भाजपा) खासदाराने पास दिला, म्हणून टीका होऊ शकते. हे ओळखून मालवीय यांनी कसाबचे उदाहरण दिले. कसाबने लोकांची दिशाभूल करण्यासाठी आपल्या हातावर केशरी धागा बांधला होता, असे उदाहरण मालवीय यांनी दिले. २०१४ नंतर आंदोलनकर्त्यांना विविध टॅग देऊन हिणवण्याची नवी पद्धत सुरू झालेली दिसते. मग आंदोलक शेतकरी असोत, आदिवासी असोत किंवा कामगार, कष्टकरी असोत. त्यांना ‘टॅग’ देऊन हिणवले म्हणजे काम झालं; त्यांच्या प्रश्नांवर फारशी चर्चा करण्याची गरज उरत नाही, असा सत्ताधाऱ्यांचा समज असावा. याही प्रकरणात हेच झाले आहे. किंबहुना आगामी काळात या प्रकरणाशी निगडित एखादी ‘थिअरी’ही समोर आणण्याचा प्रयत्न होईल. अर्थात आजवरची सत्ताधाऱ्यांची वाटचाल पाहात याचे आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही!

हे वाचा >> Parliament Attack : “…म्हणून मी त्या तरुणांना प्रेक्षक गॅलरीचे व्हिजिटर पास दिले”, भाजपा खासदाराचं स्पष्टीकरण

घुसखोरीचा मार्ग चुकीचाच, पण…

भारतातील वर्तमान प्रश्नांवर सरकारने लक्ष द्यावे, यासाठी या तरुणांनी अंमलात आणलेला मार्ग निश्चितच चुकीचा आहे. पण त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न बिनमहत्त्वाचेही ठरत नाहीत किंवा संपणारही नाहीत. या प्रश्नांना सरकार आणि विरोधक यांना सामोरे तर जावे लागेलच. अनेकजण म्हणतात की, या तरूणांनी शहीद भगतसिंग यांची कॉपी केली, असेलही! पण जेव्हा खुद्द भगतसिंग यांनी ही कृती केली, तेव्हा त्यांनाही अशाचप्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. प्रस्थापित काँग्रेस नेतृत्वाने त्या काळात भगतसिंगाच्या मार्गाची हेटाळणी केली. जेव्हा जेव्हा तरूण वर्ग त्यांच्या समकालीन प्रश्नांबाबत टोकाची भूमिका घेतो. तेव्हा तेव्हा प्रस्थापितांकडून त्याला विरोधच होतो. या विरोधाला कधी कधी राष्ट्रवादाचा मुलामा चढविला जातो. ज्यामुळे सामान्यांचा अशा आंदोलनाला कधीही पाठिंबा मिळत नाही. महत्त्वाचे म्हणजे टोकाच्या भूमिकेची आक्रमकता तरुणच तर दाखवणार ना… की, संसदेतील वयोवृद्धांकडून ही अपेक्षा ठेवायची. त्यांना तर त्यात अपयशच आले आहे आणि म्हणून तर या तरुणांचा या ‘असंसदीय’ मार्गांचा वापर करावा लागला!

आणखी वाचा >> Parliament Attack: लोकसभा घुसखोरी प्रकरणी मोठी कारवाई; आठ कर्मचारी निलंबित; सचिवालयाचा निर्णय

या तरूणांकडून झालेली चूक कोणत्या कारणांमुळे झाली? अटक केलेल्या पाचही तरूणांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती वेगवेगळी आहे. सागर शर्मा, विशाल शर्मा, नीलम वर्मा आणि सहावा आरोपी ललित झा यांची सामाजिक पार्श्वभूमी चांगली आहे. सागर शर्मा तर भाड्याने रिक्षा चालवतो. अमोल शिंदे शिक्षित आहे, पण त्याला नोकरी नाही. म्हणून तो बांधकाम मजूर म्हणून काम करतोय. डी. मनोरंजन संगणक अभियंता आहे. सहाही आरोपींच्या शिक्षणावर नजर टाकली असता सर्वजण उच्चशिक्षित असल्याचे दिसते. त्यामुळे एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपले भवितव्य अंध:कारमय होऊ शकते, याची जाणीव त्यांना असणारच. तरीही एवढी मोठी ‘रिस्क’ ते घेतात, याचाच अर्थ त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत ते गंभीर आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना वैचारिक अधिष्ठान आहे. तसे नसते तर या घटनेत ते खासदारांना अपाय करू शकले असते किंवा अनुचित प्रकारही घडवू शकले असते. पण त्यांनी फक्त त्यांचा मुद्दाच पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने संसदेत ज्यांनी देशाचे प्रश्न मांडायला हवेत, त्यांनी ते मांडले नाहीत. इतर जण ते प्रश्न घेऊन आले, त्यांनाही त्यांनी चोप दिला, हाच या लोकशाहीचा दैवदुर्विलास म्हणायला हवा!

Story img Loader