भाषा हे दोन माणसांतील संवादाचं माध्यम असतं. भाषेच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय म्हणायचंय हे समोरच्याला कळत असतं. शारीरिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या माणसांचा समूह आवाज आणि भाषा या दोन्हीचा मेळ घालून सहज समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना पोहोचवतो. संवाद साधतो. मात्र काही व्यक्तींना निसर्गाकडून ते वरदान लाभलेलं नसतं. आवाजाची म्हणजेच बोलण्याची आणि ऐकण्याची अशी दोन्हीही स्वरूपातील दैवी देणगी त्यांच्याकडे नसते. आणि त्यामुळे त्यांना जगणं जगताना असंख्य समस्यांना तोंड देत आपल्या आयुष्याचा प्रवास सुखकर करावा लागत असतो. आणि तो प्रवास ते सुखकर करतातंही…!

आज आहे आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देशच असा आहे की लोकांना सांकेतिक भाषेचे महत्त्व पटवून देणे. आपल्या साऱ्यांच्या जगण्यात असलेल्या या मूलभूत संवादाच्या जाणिवा किती महत्त्वाच्या आहेत, याचे महत्त्व पटवून देणे. आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याबाबत मनात आदर बाळगणे आणि त्यांच्याकडे नसलेल्या बाबीची सामान्य माणसांनी जाणीव ठेवून त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेणे. समाजात मूक – बधिर व्यक्तींबद्दल सर्वसमावेशकतेची भावना निर्माण करणे.

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
husband and wife conversation another woman search joke
हास्यतरंग : माझ्यासारखी…

सांकेतिक भाषा म्हणजे काय?
सांकेतिक भाषा हा संप्रेषणाचा एक प्रकार आहे. मूक-बधिर व्यक्तींसाठी सांकेतिक भाषा खूप महत्त्वाची ठरते. कारण यामध्ये बोटांनी किंवा हाताच्या हालचालींद्वारे संवाद साधला जातो. जे लोक बोलू किंवा ऐकू शकत नाहीत, ते लोक या सांकेतिक स्वरूपाच्या भाषेतून एकमेकांशी संवाद साधतात. देहबोलीतून ते आपल्या भावना व्यक्त करतात. सामान्य माणसंही याच सांकेतिक भाषेच्या साहाय्याने या कर्ण – बधिर व्यक्तींशी संवाद साधतात आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेतात. या अशा स्वरूपाच्या संवादाच्या भाषेला सांकेतिक भाषा म्हटलं जातं. सांकेतिक भाषा या पूर्णपणे मानवाने विकसित केलेल्या नैसर्गिक भाषा आहेत, ज्या बोलल्या जाणार्‍या भाषांपेक्षा संरचनात्मकदृष्ट्या मात्र वेगळ्या असतात.

मूकबधिर मुलांच्या शाळेतील सांकेतिक भाषेत सुरू असलेला हा वर्ग.
मूकबधिर मुलांच्या शाळेतील सांकेतिक भाषेत सुरू असलेला हा शिकण्याशिकविण्याचा वर्ग…

सायन हॉस्पिटलच्या अंतर्गत व्यवस्थेत चालणारी ही मूकबधिर मुलांची शाळा. या मुलांच्या शिकवणीच्या तासाचा हा आम्ही काढलेला व्हिडीओ आहे. यामध्ये आपल्याला अत्यंत साध्या वाटणाऱ्या संकल्पना शिकताना या मुलांना आणि त्यांच्या शिक्षकांना किती कष्ट – मेहनत घ्यावी लागतेय, हे पाहताना तुमच्या ध्यानात येईल. हा शिकवण्या शिकण्याचा मार्ग किती अवघड आहे, याची यातून जाणीव होऊ शकेल. या शाळेतील शिक्षकांनी अशा अनेक स्पेशल चिल्ड्रनचं आयुष्य त्यांच्या कष्टांनी, त्यांच्या रक्ताचं पाणी करून घडवलंय. या शाळेतली असंख्य मुलं आज विविध ठिकाणी चांगल्या पदावर काम करत आहेत. समाजासाठी इतकं मोठं काम करणाऱ्या या शिक्षकांना खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी तरी त्यामुळे आपण सलाम करणं बनतंच!

आणि सगळ्या नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक बाबींनी परिपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना आपण किती नशीबवान आहोत, याची जाणीव यातून होणं क्रमप्राप्त ठरतं. “माझ्याकडे काय नाही, यापेक्षा माझ्याकडे काय काय आहे;” याचा विचार त्यांनी अधिक करायला हवा. तरच आपलं साऱ्यांचं जगणं सुसह्य होईल. परिणामी आयुष्यातल्या समस्या, समस्या वाटणंही कमी होऊन जाईल!! आजच्या दिवसाचं किमान औचित्य साधून निसर्गाकडून सगळ्या गोष्टी लाभलेल्या माणसांनी आपल्याच जगण्याचा भाग असलेल्या या समाजघटकांना सोबत घेऊन पुढे नेण्याचा प्रयत्न करूयात. सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने सारेच विकसित होत जाऊयात. तेव्हाच खऱ्या अर्थाने आजच्या या दिवसाचं महत्त्व प्रखरपणे अधोरेखित होऊ शकेल!


आणि या खालील ओळी कायम स्मरणात ठेवून आपली जगण्याची वाटचाल सुरू राहील…

जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे…!

Story img Loader