सध्या भाद्रपदातील कृष्णपक्ष म्हणजेच पितृपक्ष सुरु आहे. भारतात या १५ दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताप्रमाणे जगात अनेक संस्कृतींमध्ये पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारताशेजारी असणाऱ्या चीनमध्ये देखील पितृपक्षाप्रमाणे ही प्रथा महिनाभर चालते आणि शेवटच्या दिवशी ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’ साजरा केला जातो. ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’ हा चिनी संस्कृतीतील सर्वात महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक आहे. घोस्ट फेस्टिव्हल किंवा हंग्री घोस्ट फेस्टिव्हल, याला ताओ धर्मात झोंग्युआन फेस्टिव्हल आणि बौद्ध धर्मात युलानपेन फेस्टिव्हल म्हणूनही ओळखले जाते, हा पूर्व आणि आग्नेय आशियाई देशांमधील पारंपारिक उत्सव आहे. चिनी दिनदर्शिकेनुसार घोस्ट फेस्टिव्हल हा सातव्या महिन्याच्या १५ व्या रात्री असतो. चिनी संस्कृतीत चांद्र दिनदर्शिकेतील सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसाला भूत दिवस किंवा तैवानमध्ये पुडू म्हणतात. सातवा महिना हा सामान्यतः भूताचा महिना म्हणून ओळखला जातो. किंगमिंग फेस्टिव्हल (वसंत ऋतूत कबर स्वच्छ करण्याचा दिवस) आणि शरद ऋतूतील दुहेरी नववा उत्सव या दोन्हींपेक्षा हा दिवस वेगळा असतो. या दिवशी वंशज त्यांच्या मृत पूर्वजांना श्रद्धांजली वाहतात.

अधिक वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुपती बालाजीचे घेतले होते दर्शन; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?

Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: दिल्लीचे चतुर!
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार…
elephant census
UPSC Key : यूपीएससी सूत्र : भारतातील हत्ती गणना होणारा विलंब अन् नामिबियामध्ये ७०० प्राण्यांच्या कत्तलीचे आदेश, वाचा सविस्तर…
Shukra Nakshatra Gochar 2024
१३ सप्टेंबरपासून पालटणार ‘या’ तीन राशीधारकांचे नशीब, शुक्र नक्षत्रामुळे अपार धनलाभ
kalyan ganeshotsav 2024
कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान, जलप्रदूषण रोखण्यासाठी कडोंमपाचा उपक्रम
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”
Ganesh idol immersion, Vasai Virar, artificial lake,
वसई विरारमध्ये दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन; कृत्रिम तलावाला नागरिकांचा प्रतिसाद
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा

चिनी लोककथेनुसार नरकाचे दरवाजे या महिन्याच्या पहिल्या दिवशी उघडतात. त्यानंतर पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर फिरण्यास मुक्त असतात. पृथ्वीवर संचार करणारे आत्मे मुख्यतः निर्वंशी असतात किंवा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे योग्य विधी किंवा रीतिरिवाज झालेले नसतात. या भावनेतून चीनमध्ये एक प्रथा निर्माण झाली आहे आणि त्या प्रथेचे परंपरेत रूपांतर झाले आहे. या परंपरेनुसार संपूर्ण महिनाभर मृतांना श्रद्धांजली वाहिली जाते, जेणेकरून त्यांना शांतता लाभेल अशी अपेक्षा असते. हाँगकाँगमध्ये हंग्री घोस्ट फेस्टिव्हलला विशेष महत्त्व आहे. बौद्ध, ताओवादी आणि तांग राजवंशाच्या (६१८-९०७) कालखंडापर्यंत या लोकपरंपरांची पाळेमुळे खोलवर जातात.

उत्सवादरम्यान, शहरातील वातावरण उत्साही तर असते शिवाय वेगवेगळे विधी आणि सामुदायिक कार्यक्रमांचे आयोजन या दरम्यान केले जाते. सार्वजनिक उद्यान आणि मंदिरात कागदाचे पुतळे आणि धूप अर्पण केला जातो. हा सण अनेक अंधश्रद्धा आणि धार्मिक विधींनी भरलेला आहे. पूर्वजांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी आणि भटक्या आत्म्यांचा क्रोध टाळण्यासाठी या कालखंडात विधी केले जातात. या सणाशी निगडित कृती आणि श्रद्धा या एकूणच लोकांच्या मनात असलेली भीती आणि आदर एकाच वेळेस प्रकट करतात.

उत्सवादरम्यान, संपूर्ण कुटुंबाकडून एकत्रितरित्या जेवण तयार करून ते पूर्वजांना अर्पण केले जाते. घरातील मंडळी जेवणाच्या जागेवर पूर्वजांसाठी आसनं रिकामी ठेवतात. ताओवादी आणि बौद्ध श्रद्धेनुसार अतृप्त आत्म्यांना तृप्त करण्यासाठी आणि त्यांचा त्रास होऊ नये म्हणून ही परंपरा पाळली जाते. या कालखंडात उदबत्ती आणि जॉस पेपर जाळणे ही प्रथाही घराघरात पाळली जाते. उदबत्तीचा सुगंधित धूर आत्म्यांना मार्ग दाखवतो असे मानले जाते, तर भेटवस्तू आणि पैशाचे प्रतिनिधित्व करणारा जॉस पेपर, आत्म्यांना मृत्यूनंतरच्या जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्या माध्यमातून प्रदान करतो त्यामुळे त्यांचा मृत्यूनंतरचा प्रवास सुकर होतो, असे मानले जाते.

अधिक वाचा: R. D. Banerjee-Mohenjo-Daro Man: मोहेंजोदारो मॅनचं पुढं झालं काय? १०० वर्षांनंतरही गूढ कायम

ताओवादी आणि बौद्ध संस्कृतीत, धर्मग्रंथांचे पठण करणे आणि धार्मिक विधी करणे या प्रथा आत्म्यांना शांती मिळण्यासाठी आणि सजीवांचे रक्षण करण्यासाठी पाळल्या जातात.

हंग्री घोस्ट फेस्टिव्हल या कालखंडात चीनमध्ये अनेक प्रथा पाळल्या जातात. त्या मूलतः अंधश्रद्धा असल्याचे चिनी संस्कृतीचे अभ्यासक मानतात.

१. अंधारात बाहेर पडणे टाळले जाते.

अनेक अंधश्रद्धांपैकी एक म्हणजे रात्री उशिरा बाहेर राहणे टाळणे. असे मानतात की, अंधार पडल्यानंतर आत्मा सर्वात जास्त सक्रिय असतो आणि उशिरा बाहेर पडल्याने एखाद्या व्यक्तीला त्याच्यापासून धोका निर्माण होतो. पुष्कळ लोक अशा प्रकारचा त्रास होऊ नये त्यामुळे या कालखंडात रात्री बाहेर पडणे टाळतात.

२. नवीन गोष्टींची सुरुवात करत नाहीत

या महिन्यात नवीन घरात जाणे, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा लग्न करणे यासारख्या जीवनातील महत्त्वाच्या घटना टाळल्या जातात. असे मानले जाते की, भटक्या आत्म्यांची उपस्थिती ही महत्त्वाच्या टप्प्यांवर दुर्दैव किंवा नकारात्मक ऊर्जा आणू शकते.

३. काळ्या किंवा लाल रंगाच्या कपड्याचा वापर करणे निषिद्ध मानले जाते

सणाच्या वेळी काळे आणि लाल रंगाचे कपडे परिधान करणे चुकीचे आहे, असे मानले जाते. हे रंग आत्म्यांना आकर्षित करतात किंवा वाईट नशीब आणतात, त्यामुळे हे रंग या कालखंडात वापरू नयेत, असे मानले जाते.

४. चार क्रमांकाचा वापर टाळला जातो

चिनी भाषेत, क्रमांक चारचा उच्चार “मृत्यू” या शब्दासारखाच आहे, त्यामुळे सर्वसाधारणपणे तो अशुभ क्रमांक मानला जातो. हंग्री घोस्ट फेस्टिव्हल दरम्यान ही संख्या आणखीनच त्रासदायक असल्याचे मानले जाते आणि लोक तो क्रमांक टाळण्यासाठी खूप प्रयत्न करतात.

६. कपडे आणि भिंत

रात्री आपले कपडे बाहेर लटकवणे निषिद्ध मानले जाते. भिंतीच्या अगदी जवळ उभे राहणे देखील टाळले जाते.