अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने अधिकृतरित्या घेऊन तो दुपारी जाहीर केला त्यावेळेस भाजपाच्या वतीने या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या मुरजी पटेल यांची बहुधा ‘हुश्श SSS सुटलो एकदाचा!’ अशीच प्रतिक्रिया झाली असावी… याला कारण म्हणजे त्यांची देहबोली!

आणखी वाचा : Andheri Election: भाजपाने माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “हे असे निर्णय…”

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक चुरशीची होणार याची चुणूक ती जाहीर झाल्यापासूनच मिळाली होती. सुरुवातीस ऋतुजा रमेश लटके यांना शिंदे गटाकडे खेचण्याचे जोरदार प्रयत्न झाल्याची चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडूनच त्या अर्ज भरणार असे निश्चित झाल्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात पालिकेतर्फे चालढकल करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. अखेरीस राजीनाम्याच्या मंजुरीसाठी लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयीन आदेशानंतर अर्ज भरण्याच्या दिवशी शुक्रवारी सकाळी महापालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केला. दुपारच्या सुमारास त्यांनी अंधेरी येथे येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. या संपूर्ण घटनाक्रमात ऋतुजा लटके यांना पुरता संघर्ष करावा लागणार, असेच दिसत होते.

आणखी वाचा : Andheri Election: भाजपाची माघार अन् राज ठाकरेंची कौतुकाची थाप; फडणवीसांना पुन्हा पत्र लिहित म्हणाले “आज तुम्ही…”

पलीकडच्या बाजूस सर्वच भाजपा नेते या निवडणुकीच्या संदर्भात अतिशय आक्रमक झाले होते. कार्यकर्तेही तेवढेच आक्रमक होते. निवडणूक कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या नेत्यांचे आगमन झाले की, भाजपा कार्यकर्त्यांचा हुरूप वाढायचा आणि ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ हा जयघोष घुमायचा. महत्त्वाचे म्हणजे यात महिला कार्यकर्त्या आघाडीवर होत्या. गजानन कीर्तीकर असोत अथवा अनिल देसाई शिवसेनेचे कार्यकर्ते आले की, घोषणाबाजीला उधाण यायचे. मात्र ज्यांच्यासाठी हे सारे सुरू होते ते भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांची देहबोली मात्र काही वेगळेच सांगणारी होती. मनात नसतानाही निवडणूक लढणे भाग पडलं असणार, असे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत होते. गळ्यात भरपूर हार घातलेले होते मात्र चेहऱ्यावर उत्साहाचा मागमूसही नव्हता. त्यांच्या चेहरा पूर्ण दमछाक झाल्यासारखा भासत होता. देहबोलीमध्येही निरुत्साहच अधिक डोकावत होता…

आणखी वाचा : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “इतका आडमुठेपणा…”

खरे तर त्यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नेत्यांची मांदियाळी अंधेरीत लोटली होती. नेते आक्रमक होते. नितेश राणे यांनी तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मशाल या चिन्हावरून ‘ही मशाल नव्हे तर आग विझलेला आइस्क्रीम कोन’ अशी निर्भत्सना केली. त्याला शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिले खरे. पण भाजपा नेते प्रचंड आक्रमक होते. मात्र उमेदवाराच्या चेहऱ्यावर विरोधाभासाचे निरुत्साहाचे भाव होते. भाजपा नेते आशीष शेलार यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून केलेल्या ट्वीटमध्येही त्यांचा चेहरा पडलेलाच होता. त्यामुळेच पराभवाची छाया चेहऱ्यावर आताच आली की, काय अशी चर्चा बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांमध्ये सुरू होती.

आणखी वाचा : Andheri by-election : भाजपाने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

या निवडणूक कार्यालयापासून काही अंतरावर सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना रोखून धरण्यात आले होते. तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही त्यांच्या सोबत होते. तिथला माहोल मात्र पूर्णपणे वेगळा शिवसेनामय असाच होता. विधवेच्याविरोधात निवडणूक लढवण्यात आणि तिची कोंडी करण्यात कसली आली मर्दुमकी अशी चर्चा आणि घोषणाबाजी बाहेरच्या बाजूस सुरू होती. शिवसेनेची अवस्था मात्र ताकही फुंकून प्यावी, तशीच होती. नेते आक्रमक नव्हते. मात्र टीकेला उत्तर शंभर टक्के दिले जाईल, याची खातरजमा करत होते. प्रत्येक बाबतीत चाचपणी करत होते. आमदार अनिल परब तर लटके यांच्यासोबत पूर्णवेळ संध्याकाळपर्यंत निवडणूक कार्यालयात ठाण मांडून होते. प्रत्येक बारीक सारीक बाबींची खातरजमा दोन- तीन वेळा करून घेत होते. चूक कुठेही राहणार नाही, यासाठी सेनेने त्या दिवशी पराकोटीची काळजी घेतली. जोपर्यंत अनिल परब ऋतुजा लटके यांच्यासह संध्याकाळ उशिरापर्यंत निघाले नाहीत, तोवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह बाहेर ठाण मांडून बसले होते. सर्वांचीच देहबोली त्या दिवशी खूप काही सांगून गेली.

आणखी वाचा : Andheri Election: भाजपा तुमचं ऐकत असेल तर एवढी दोन पत्रं लिहाच! सुषमा अंधारेंची राज ठाकरेंना विनंती; म्हणाल्या, “राज भाऊ तुम्ही…”

आज अखेरीस भारतीय जनता पार्टीने या पोटनिवडणुकीत माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा मुरजी पटेल यांचा शुक्रवारचा चेहरा समोर आला आणि चर्चा सुरू झाली. आता त्यांनी म्हटले असेल, हुश्श SSS सुटलो एकदाचा!

Story img Loader