सॅबी परेरा
जीवनात प्रेम असावं, सुख-शांती असावी असं सगळ्यांनाच वाटतं पण आजूबाजूला पाहिलं तर जगात सर्वत्र प्रेम, सुख-शांती पेक्षा द्वेष व्यापून राहिलेला दिसतो. जाती-धर्मावरून, गावावरून, शहरावरून, राज्यावरून, देशावरून लोक एकमेकांचा द्वेष करीत असतात. बऱ्याचदा या द्वेषाचं कारणही द्वेष करणाऱ्यांना ठाऊक नसतं. प्रत्येक ठिकाणी आपला आणि परका ही विभागणी झालेली आहे. आपल्यांकडे आणि परक्यांकडेही एकमेकांचा द्वेष करण्यासाठी खरीखोटी का होईना आपापली कारणे आहेत. मग राजकारणी, समाजकंटक आणि संधीसाधू लोकांनी आपल्या फायद्यासाठी या द्वेषाचा फायदा न उठवला तरच नवल! एखाद्याच्या अंगात द्वेषाचं भूत संचारलं की ते त्याच्यापुरतं सीमित न राहता ते आडवं उभं सगळीकडे पसरतं आणि मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे द्वेषाचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे चालविला जातो. अनिश पल्याळ लिखित आणि मनू वारियर दिग्दर्शित कुरुथी (देवाला बळी देण्याची परंपरा) हा मल्याळी सिनेमा विविध स्तरावरील द्वेषाचे पापुद्रे उलगडून त्याचं आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली दर्शन घडवितो.

इब्राहिमची बायको आणि लाडकी मुलगी एका नैसर्गिक आपत्तीमुळे मरण पावली आहेत. त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या सुमा नामक तरुणीनेही त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपले कुटुंब गमावले आहे. इब्राहिम, त्याचे म्हातारे वडील आणि धाकटा भाऊ यांच्यासाठी स्वयंपाक बनवून आणि त्यांची घरगुती कामे करून सुमा शेजारधर्म निभावते आहे.

Bhandara, Selfie , tiger , Suhani tiger ,
VIDEO : झुडपात बसलेल्या वाघासोबत चक्क ‘सेल्फी’, सुहानीच्या बछाड्याला पुन्हा लोकांनी…..
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Savitribai Phule Pune University rule challenged in High Court
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमाला उच्च न्यायालयात आव्हान
Attempt to spread poison in the name of caste PM Modi criticizes opponents
जातीच्या नावावर विष पसरवण्याचा प्रयत्न; पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका
Mumbai Suburb, Mumbai Suburb Nature, Congestion ,
शांत काळोखाचे तुकडे
bahubaliche beed loksatta article
बाहुबलीचे बीड : ‘विहिरी’तील कोट्यवधींच्या घबाडावर बाहुबली गब्बर, राखेतील परळीत ‘शांतता राखा’!
nexus
धोक्याच्या टप्प्यावरचा इतिहास…
Transgender actress Shubhi Sharma
तृतीयपंथी अभिनेत्रीचा झाला अपघात; दुचाकी चालकाने दिली धडक, पोलिसांनी केली मदत

दरम्यान गावात कुठेतरी एका हिंदू तरुणाने मुस्लिम दुकानदाराचा खून केलेला आहे. त्याला बेड्या ठोकून पोलीस स्टेशनला घेऊन जात असलेल्या पोलिसांच्या व्हॅनवर मुस्लिम अतिरेक्यांनी हल्ला केलेला आहे. त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यातून वाचवून, सिनियर इन्स्पेक्टर थॉमस त्या गुन्हेगारासहित बळजबरीने इब्राहिमच्या घरात आश्रयासाठी घुसलेला आहे. इब्राहिमचं कुटुंब एकप्रकारे थॉमसच्या नजरकैदेत आहे. इब्राहिमच्या कुटुंबासाठी जेवण घेऊन आलेली सुमाही तिथे अडकून पडली आहे. अशावेळी त्या गुन्हेगाराला शोधून ठार करण्याच्या उद्देशाने लायक नावाचा मुस्लिम अतिरेकी आणि त्याचे साथीदार इब्राहिमच्या घरी येतात आणि पुढे काय नाट्य घडते त्याचा सुंदर अनुभव म्हणजे कुरुथी हा सिनेमा.

भूतकाळात आपल्या आपल्या धर्मावर, आपल्या लोकांवर अन्याय झालाय अशी मुस्लिम रसूल आणि हिंदू विष्णू दोघांचीही भावना आहे. त्याचा आता बदला घेऊन त्यांना दहशतीने शांती प्रस्थापित करायचीय. इब्राहिमला देवाधर्माचे आचरण करून भविष्यात स्वर्गात शांती मिळवायचीय तर म्हाताऱ्या मुसाला इतिहासाची तमा नाही आणि भविष्याची पर्वा नाही. त्याला आताच्या घडीला आपल्या भौतिक गरजा भागवून शांती उपभोगायचीय.

लेखक दिग्दर्शकाला जे काही सांगायचं आहे त्यासाठी मुसा या पात्राची योजना केली आहे. इब्राहिमचा बाप असलेला मुसा, हा आयुष्य कोळून प्यायलेला इसम आहे. एकमेकांचा द्वेष करणे हे आताचं नाही तर मानवजातीच्या उगमापासून आलेलं आहे. धर्म, श्रद्धा, जात, रंग, भौगोलिक ठिकाणं ही सर्व माणसाने द्वेषासाठी शोधून काढलेली निमित्त मात्र आहेत. हे पटवून देण्यासाठी तो बायबल / कुराण मधील काईन आणि आबेल यांचं उदाहरण देतो. मुसाच्या म्हणण्याप्रमाणे त्या काईनचंच द्वेषाने भरलेलं रक्त आपल्याही धमन्यांमधून वाहत आहे. इतिहासात कोणत्या राजाने कुठे राज्य केलं आणि कुणी काय भलं केलं, कुणी काय अत्याचार केले याच्याशी मुसाला काही देणंघेणं नाही. तो भविष्याची पर्वा न करता वर्तमानात जगणारा इसम आहे म्हणूनच इन्स्पेक्टर समोर आपल्या पूर्वायुष्याची कबुली देताना तो बिनधास्तपणे म्हणतो, की मला अटक करायची तर खुशाल कर. जेलमधे निदान वेळेवर जेवण तरी मिळेल. इब्राहीमने सुमाशी लग्न करावं या म्हणण्यामागेही त्याचा हाच उद्देश आहे, की वेळेवर जेवण द्यायला आणि घरकाम करायला हक्काचा माणूस मिळेल.

श्रीन्धा अरहानने साकारलेली अपघाताने हादरलेली तरीही बाकी लोकांपेक्षा आधी सावरलेली, बिनदिक्कत आपलं प्रेम व्यक्त करणारी, कसोटीच्या क्षणी हाती हत्यार घ्यायला न कचरणारी सुमा हे पात्र लिहिण्यापासून अभिनयापर्यंत सुंदर झालंय. सुमा, इब्राहिम या विधुराच्या प्रेमात पडलेली आहे. त्याच्याशी विवाह करण्यासाठी ती आपला धर्मही बदलायला तयार आहे पण लग्नानंतर आपल्या हिंदू दैवतांना बंद खोलीत पुजायची परवानगी आणि तशी हमी तिला इब्राहिमकडून हवी आहे. इब्राहिमलाही सुमा आवडते. पण एका काफिर स्त्रीशी विवाह केल्यास मृत्यूनंतर आपल्याला स्वर्गात जाऊन आपल्या मुलीला भेटता येणार नाही म्हणून आपलं प्रेम व्यक्त करण्यास तो कचरतोय.

वादविवादात आपलं काय बरोबर आहे हे सांगण्यापेक्षा तुमचं काय चूक आहे हेच ठरविण्यात रस असणारा इब्राहिमचा भाऊ रसूल आणि गुन्हेगार म्हणून पकडला गेलेला विष्णू ही दोन पात्रे म्हणजे तरुणाईची सळसळती ऊर्जा चुकीच्या माणसांहाती पडली तर त्यांचं ब्रेनवॉशिंग करून ती ऊर्जा कशी विध्वंसक कामासाठी वापरली जाते याचं काहीसं ठोकळेबाज उदाहरण आहे.

पृथ्वीराजने साकारलेला रागीट तितकाच थंड डोक्याचा, धारधार नजरेचा, एकेक शब्दांवर जोर देऊन बोलणारा, आपल्याला जो कळलाय तोच कुराणाचा खरा अर्थ आहे यावर ठाम असणारा, अल्लाहबद्दल शंका मनात येणे पाप समजणारा आणि आपण जे काही करतोय ते धर्मकार्य असल्याची धारणा असणारा ‘लायक’ नावाचा खलनायक अप्रतिम झालाय.

आपल्या बायको आणि मुलीच्या अपघाती मृत्यूने हादरलेला, पण तरीही देवाधर्मावर विश्वास असलेला, मृत्यूनंतर आपली आपल्या मुलीशी भेट होईल या आशेनं आपल्या श्रद्धेची कसोटी पाहणाऱ्या क्षणीही देवशब्दांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणाऱ्या इब्राहिमच्या भूमिकेत रोशन मॅथ्यू याने संयत अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. मुसा झालेल्या ममुकोयाने घरातील वृद्ध व्यक्तीचं कॅरेक्टर अचूक पकडलेलं आहे आणि इन्स्पेक्टर झालेल्या मुरली गोपीचा बोलका चेहरा खासच.

या सिनेमात सहकलाकार असे नाहीतच कुणी. . . आहेत ते सगळेच मुख्य कलाकार. प्रत्येक पात्राचं असण्याचं तिथे असण्याचं एक सबळ कारण आहे. या सिनेमातील कुठलंच पात्र, वस्तू, प्रसंग विनाकारण येत नाही. इथल्या प्रत्येक पात्राला, वस्तूला, सीनला एक स्वतःचा असा चेहरा, उद्दिष्ट आहे, कार्यकारणभाव आहे.

सिनेमातील एकमेव गाणं, पाश्वसंगीत आणि सिनेमॅटोग्राफी हल्लीच्या मल्याळी सिनेमाला साजेशी आणि सिनेमाचा मूड अचूक पकडणारी आहे. सिनेमातले फाईट सिन खरे वाटावे इतके छान झालेत.

द्वेष वणव्यासारखा चहुबाजूनी पसरतो. द्वेषाची परिणीती शारीरिक, आर्थिक, मानसिक नुकसानीतच होते. द्वेषाचे परिणाम व्यक्तीला, कुटुंबाला, समाजाला, देशाला आणि बऱ्याचदा भावी पिढयांनादेखील भोगावे लागतात. हे कमीत कमी शब्दात, कुठलाही प्रचारकी आव न आणता, कोणाचीही बाजू न घेता केवळ द्वेष या एका भावनेला सूक्ष्म दर्शकाखाली ठेऊन त्याचं अंतरंग आपल्याला दाखविण्याचं काम कुरुथी या सिनेमाने केलेलं आहे.

Story img Loader