ज्योती नावाची एक मध्यमवर्गीय, परिस्थितीने गांजलेली, कौटुंबिक जबाबदाऱ्या शिरावर असलेली तरुणी, आपल्या पोटापाण्यासाठी आणि विशेषतः आपल्या कुटुंबाला कर्जाच्या ओझ्याखालून सोडवून आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी इराकच्या एका गारमेंट फॅक्टरीत नोकरी मिळविते. पण तिथे पोहोचताच तिच्यासमोर स्फोटकांनी बांधलेली एक निष्पाप मुलगी दहशतवादाला बळी पडते. या धक्क्यातून सावरून ज्योती आपल्या कामाला लागते. काही दिवसांतच ती स्वतःच आयसिस या अतिरेकी संघटनेच्या ताब्यात सापडते आणि त्यानंतर तिचा संघर्ष सुरू होतो. शासन-प्रशासन सगळंच अतिरेक्यांच्या हाती गेलेल्या इराकसारख्या परक्या भूमीवर एका भारतीय तरुणीने स्वतःच्या आणि सोबत इतर अन्यायग्रस्तांच्या सुटकेसाठी दाखविलेल्या जिद्दीची, चिकाटीची आणि झुंजीची “अकेली” नावाची गोष्ट दिग्दर्शक प्रणय मेश्राम यांनी तितक्याच परिणामकारकपणे रुपेरी पडद्यावर दाखवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा