मयुरेश गद्रे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कवितेवर आणि शब्दांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं आवर्जून घ्यावा असा एक नितांतसुंदर अनुभव “भाई , एक कविता हवी आहे” च्या निमित्तानं आज घेता आला . या कलाकृतीला नाटक म्हणावं तर त्यातल्या कवितांवर अन्याय आणि अख्या सादरीकरणालाच एक कविता म्हणावं तर त्यातल्या नाट्यमयतेला उणेपणा येईल . गद्याच्या ओघात सहजपणे शिरकाव करणारं पद्य आणि त्याला “मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा ” अशी प्रसन्नपरिमळ साथ देणारं संगीत …. केवळ समसमा संयोग….. कुण्या एका काव्यवेड्या डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये वॉल मॅगझीनच्या स्वरूपात चालवलं जाणारं पाक्षिक …स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं काहीतरी वेगळं करून पाहावं या ओढीनं गुरुदेव टागोरांच्या “भयशून्य चित्त जेथ….” या गाजलेल्या कवितेची केलेली निवड…या कवितेच्या विविध भारतीय भाषांमधल्या अनुवादाचे कोलाज ….आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी टागोरांच्या हस्ताक्षरातल्या कवितेची प्रत असावी यासाठी त्या शब्दवेड्या डॉक्टरची तळमळ ….कविता शोधायला थेट पुलं आणि सुनिताबाईंना असोशीने घातलेली साद …. आणि त्या काव्यव्याकूळ , लोकोत्तर जोडप्यानं त्या हाकेला प्रतिसाद देत कविता मिळवण्यासाठी केलेला आटापिटा ….अर्थात त्याला आटापिटा तरी कसं म्हणणार ??? खरंतर त्या दिवसांत ( म्हणजे १९९८ च्या सुमारास ) आयुष्याच्या संधिकालात जगणारं हे जोडपं …पण त्यांच्या आयुष्यावर कवितेचे इतके अनंत उपकार आहेत की कवितेला ” जाऊ दे ” असं म्हणणं सुध्दा त्यांना पाप वाटतं . त्यांच्या दृष्टीने कवितेच्या बाबतीत plan B असूच शकत नाही ! आणि मग एका अर्थी अनंताची पाऊलवाट चालायला निघालेली ही दोन माणसं पुढचे आठ-दहा दिवस कवितेच्या शोधात “पुस्तकांच्या शेतात” भटकत राहतात .
या वाटेवर मग कुठे पद्मा गोळे , कुणी एक महानोर , आर्ततेचा सोहळा मांडणारा आरतीप्रभू आणि अगदी इंदिरा संत सुध्दा पुन्हा पुन्हा भेटतात . त्यांच्या ओळींचे अर्थ आपोआपच नव्याने शोधले जातात . बाकीबाभ बोरकरांचे शब्द तर सदैव वाटाड्यासारखे साथ देत राहतात . शोध सुरू राहतो आणि अखेरीस एखाद्या स्वप्नवत सुखांतिकेत घडावं तसं घडतं …..कविता सापडते पण म्हणजे नुसती कविता नव्हे तर शब्दांच्या पलीकडचं काहीतरी गवसतं ..
डॉ. समीर कुलकर्णी यांचा हा मूळ अनुभव . त्याचं त्यांनी केलेलं अप्रतिम रूपांतरण . पावणेदोन तास चालणारं सादरीकरण .. ते करताना एक-दोन-एक-दोन अशी साधी रचना …म्हणजे डावीकडे एक ( संवाद आणि संवादिनी साधणारा) मग दोन ( मुख्य सूत्र संचालक) परत एक ( सुनीताबाई) आणि परत दोन ( गायक-गायिका) या समीकरणात बसलेली सहा पात्रं . प्रत्येकजण आपापली भूमिका चोख बजावतात.( सुनीताबाईंच्या भूमिकेत असलेल्या ) मुक्ता बर्वेचं स्टारडम जाणवतं पण ते कुठेही हावी होत नाही. संगीताचा वापर तर इतका अप्रतिम की पुनः पुन्हा ऐकत राहावं …डॉ धनश्री ( मानसी वझे) जेंव्हा पुलं आणि सुनीताबाईंच्या घरातलं वर्णन करतात आणि त्यांच्या तोंडून पं मल्लिकार्जुन मन्सूर यांचा उल्लेख होतो तेंव्हा पार्थ उमराणी जो स्वर लावतात तो केवळ लाजवाब … ! अगदी सुरुवातीला टागोरांच्या कवितेचं इंग्लिश भाषांतर इंग्लिश धून असलेल्या गीताच्या स्वरूपात ऐकू येतं तोही अनुभव विलक्षणच ! कौसल्येच्या रामाचं कौतुक तर किती करावं ! पहिल्या संवादापासून शेवटपर्यंत हे गाणं साथ देतं ! खरंतर रंगमंचावर डिजिटल पडदा आता नवीन राहिलेला नाही ..पण इथे त्या पडद्यावर चक्क जलरंगाचे आधुनिक काळातील जादूगार मिलिंद मुळीक यांची जिवंत चित्रं !! ही सगळी निसर्गचित्रं , रेखाचित्रं त्या रंगमंचीय सादरीकरणाला अधिक आशयघन करून जातात . मुळात जलरंग फार तरल आणि प्रवाही . शिवाय पारदर्शक ..त्यातून हॅण्डमेड कागदाचा पोतही नजरेत भरणारा ..त्या रंगांना सजीवपणा देणारा…. आणि हे चित्र काढणारे चित्रकार आमचे लाडके मिलिंद मुळीक ( मुळीकांचं आजोळ डोंबिवलीचं…..त्यामुळं आम्हा डोंबिवलीकर चित्ररसिकांचे ते जास्त लाडके)…नाट्यातील आशय वाढवण्यासाठी चित्रांचा इतका सहजसुंदर वापर रंगमंचावर क्वचितच कधी झाला असेल . पार्थ उमराणी – अंजली मराठे यांचं सह-गायन आणि निनाद सोलापूरकरांनी त्याला दिलेली साथसंगत हे तर या नाटकाला लागलेले चार चांद आहेत . आपल्या मनात रुंजी घालणारी मराठी गाणी यात छोट्या छोट्या तुकड्यांतून येतातच . पण भावव्याकूळ करणारं रवींद्र संगीतही तितक्याच ताकदीनं या तिघांनी मांडलं आहे . या विलक्षण सांगीतिक अनुभवासाठी हे नाटक पुनः पुन्हा पहावं इतकं हे गायन देखणं झालं आहे .
खरोखरच ..या संहितेचा ज्यांनी खोलवर विचार केला त्या दिग्दर्शक-सूत्रधार वझे साहेबांना दाद द्यावी तितकी कमीच ! प्रत्यक्षात हा प्रसंग घडलाय तो पुलं, सुनीताबाई आणि डॉ कुलकर्णी यांच्या बाबतीत . पण म्हणून ती केवळ पुलंची गोष्ट नाही . पुलं-सुनीताबाई असोत , डॉ कुलकर्णी असोत की मुक्ता बर्वे असो ….. “कविता” हेच या नाटकातलं मध्यवर्ती आणि सशक्त पात्र आहे . कारण असं की भाषा कुठलीही असो कवितेतला आशय वैश्विक असतोच की.. काही वर्षांपूर्वी माझे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिधये समरस्कूल साठी केम्ब्रिजला गेले होते . त्यावेळी तिथल्या सहाध्यायी मित्र-मैत्रिणींसोबत ते कॅम नदीवर फेरफटका मारायला गेले . नदीतून विहरणाऱ्या पांढऱ्या शुभ्र बदकांच्या थव्यात एक काळसर बदक होतं . ते पाहिल्यावर शिधयांना ” एका तळ्यात होती…” आठवलं आणि त्याचवेळी त्यांच्या ब्रिटिश मित्रानं ugly duckling म्हणायला सुरुवात केली . यापेक्षा अधिक काय सांगावं ?? थोडक्यात काय तर पुलं आणि सुनीताबाई यांच्या पलीकडे जाऊन या संहितेत कविता सतत दिसत राहाते…. संवादात सहज मिसळून येणाऱ्या कवितांना दाद दिली जाते , दर आठ-दहा वाक्यांपाठी टाळ्या वाजत राहतात आणि आपल्याच नकळत आपले अश्रू आपल्याला फितूर होऊन गालांवरून ओघळत राहतात . आपल्याला समृद्ध करणारा एक विलक्षण अशारीर अनुभव देत , इंद्रायणी काठी या अजरामर गीतातले शब्द ओठांवर रेंगाळत राहतात
उजेडी राहीले उजेड होऊन ..
(लेखक डोंबिवलीतील व्यावसायिक आहेत)