पारशी गारा ही पारंपारिक भरतकामाची शैली आहे.पारशी समुदायाच्या स्थलांतराबरोबर ती भारतात आली असे सांगितले जाते.भारताला भरतकामासारख्या कलेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. ही हस्तकला देशाची सांस्कृतिक विविधता आणि वारशाचा जिवंत पुरावा आहे. यापैकी काही परंपरांची भरभराट होताना आपण पाहू शकतॊ तर काही कला या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशीच एक कला म्हणजे ‘पारशी गारा भरतकाम’, या कलेला भारतातील पारशी समाजाच्या सांस्कृतिक वारशात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पारशी गारा

या भरतकामाला पारशी गारा किंवा पारशी गारा वर्क असेही म्हणतात, ही पारशी समुदायाकडून भारताला लाभलेली पारंपारिक भरतकाम शैली आहे. हे भरतकाम तंत्र गुंतागुंतीच्या आणि अत्यंत तपशीलवार फुलांच्या तसेच निसर्ग-प्रेरित नक्षीकामासाठी ओळखले जाते. सामान्यत: पारशी गारा भरतकाम रंगीबेरंगी रेशमी धाग्यांचा वापर करून रेशीम किंवा जॉर्जेट कापडांवर केले जाते,” असे कलाकार मनीषा गावडे (संचालक, एहसास, नवी दिल्ली) यांनी सांगितले.
पारशी गारा भरतकामाच्या नक्षीकामामध्ये फुले,पक्षी, फुलपाखरे आणि निसर्गातील इतर घटकांचा समावेश असतो. हे नक्षीकाम साड्या, ब्लाउज आणि कपड्यांवर काळजीपूर्वक केलेले असते. गावडे यांनी सांगितले की, “ही भरतकामाची शैली तिच्या उत्तम कारागिरीसाठी ओळखली जाते तसेच ही कला पारशी सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानली जाते.”

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे

आणखी वाचा: शाही भारतीय नौदलाचे बंड १९४६: डाव्यांमुळे खरंच भारताला स्वातंत्र्य मिळणार होते का, जे काँग्रेस आणि मुस्लिम लीगला नको होते?

भारतातील या समृद्ध कलाकुसरीचे मूळ १९ व्या शतकात जाते, जेव्हा पारशी व्यापारी आणि कारागीर पर्शिया (आधुनिक इराण) मधून भारतात स्थलांतरित झाले. “जेव्हा पारशी पहिल्यांदा गुजरातमध्ये स्थायिक झाले, तेव्हा त्यांनी चीनशी व्यापार सुरू केला. सुरुवातीला ते चीनमधून चहा विकत घेऊन भारतात विकायला आणत असत. या कालखंडात, त्यांना ‘गज’ किंवा ‘पाज’ नावाचे एक सुंदर रेशीम कापड सापडले. त्या कापडाचे सौंदर्य इतके उत्कृष्ट होते की त्यांनी त्यांच्या पत्नींसाठी ‘गज’ विकत घेतले,” असे गावडे सांगतात. त्यानंतर मुंबई आणि सुरतच्या कापड केंद्रांमध्ये या भरतकामाची शैली वाढीस लागली.गावडे सांगतात,’पारशी गारा भरतकाम हे पारशी विवाहसोहळ्यांशी संबंधित आहे, विवाहाच्या वेळी नववधू या उत्कृष्ट भरतकामांनी सुशोभित केलेल्या साड्या नेसतात. ‘गारा’ हे नाव ‘साडी’ किंवा ‘रॅपर’ या गुजराती शब्दावरून आले आहे, जे साडी सुशोभित करण्यासाठी त्याचा प्राथमिक वापर दर्शवते.

पारशी गारा एक विस्तृत प्रक्रिया

पारशी गारा विणकरांनी सांगितले की, भरतकामाच्या नक्षीकामाचे डिझाइन प्रथम कागदावर काढले जाते, त्यानंतर नमुना रंग तयार केला जातो. कारागीर डिझाइन्सचा अभ्यास करतात आणि साडीवर ते नक्षीकाम ट्रेस करतात. गारा साडी बनवणे ही एक विस्तृत प्रक्रिया आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी दोन ते आठ महिने लागतात. “आम्हा चौघांना एकच दुपट्टा पूर्ण करायला एक ते दोन महिने लागतील. हे गुंतागुंतीचे आकृतिबंध/नक्षीकाम तयार करण्यासाठी अतिशय बारीक सुई वापरली जाते”, मेहबूब, एक पारशी गारा विणकर गेली १५ वर्षे हेच काम करत होते.गावडे यांनी सांगितले की, या गारा रचनेचा एक मनोरंजक पैलू म्हणजे प्रत्येक कारागीर विशिष्ट आकृतिबंधात/नक्षीकामात पारंगत असतो. या प्रकारात पूर्णपणे भरतकाम केलेले असू शकते किंवा आंशिक भरतकाम असलेली बॉर्डर असू शकते. भरतकाम केलेल्या “साड्या, दुपट्टे १२,००० रुपयांपासून सुरू होतात आणि १,२०,००० रुपयांपर्यंत त्यांची किमंत असू शकते. या गारा पद्धतीत डिझाईन/नक्षीकाम जितके मोठे असेल तितके ते करायला जास्त वेळ लागतो.

कलेचा ऱ्हास

पारशी गारा भरतकाम त्याच्या सौंदर्य आणि कारागिरीच्या माध्यमातून पारशी समाजाच्या सांस्कृतिक वारश्याची आठवण करून देते. इतकेच नाही तर या कलेने भारतीय परंपरेत स्वतःची ओळख अबाधित ठेवली आहे. असे असले तरी, गावडे यांनी म्हटल्याप्रमाणे सध्या या कामासाठी उत्तम कारागीर उपलब्ध नाहीत. ही कला श्रम-केंद्रित असल्याने केवळ ५५ टक्के प्रशिक्षित कारागीर (विणकर) शिल्लक आहेत आणि त्यांना दररोज सुमारे ४०० रुपये वेतन दिले जाते. त्यांच्यापैकी काही बंगालच्या दुर्गम भागात राहतात आणि त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी हे पैसे पुरेसे नाहीत. कलाकुसरीच्या घटत्या मागणीमुळे, या विणकरांच्या मुलांना पारशी गारा भरतकामाची परंपरा पुढे नेण्यात रस नाही किंवा प्रोत्साहन दिले जात नाही. शिवाय, पारशी समाजाच्या कमी जन्मदरामुळे या कामाची मागणी कमी झाली आहे.

आणखी वाचा: विश्लेषण: चीनमध्ये इस्लामची तुलना संसर्गजन्य रोगाशी ; इस्लामी देश गप्प का?

“मी गेल्या २० वर्षांपासून ही कलाकृती करत आहे. मात्र, या पैशात टिकून राहणे फार कठीण असल्याने मी आता नोकरी सोडण्याचा विचार करत आहे. जर पैसे नाहीत आणि लोकांना यापुढे रस नसेल तर एक दिवस ही कला संपुष्टात येईल,” असे शेख खादिम अली (पारशी गारा विणकर) म्हणाले. दुर्दैवाने, अली हा एकमेव पारशी गारा विणकर नाही ज्याने पैशांच्या कमतरतेमुळे कलाकुसर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शेख राजू, सोहन बिमल आणि इतर कारागीर देखील व्यवसाय बदलण्याचा विचार करत आहेत.
या मरणासन्न कलेला पुनरुज्जीवित करण्यासाठी, मागणी आणि जागरुकता वाढवणे हे महत्त्वाचे आहे. “मागणी जितकी जास्त तितका पुरवठा जास्त आणि तरच आम्ही ती नामशेष होण्यापासून वाचवू शकू. आंतरराष्ट्रीय स्तरावर पारशी गाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार मदत करू शकते,” असे गावडे यांनी सांगितले.
पारशी गारा भरतकामाच्या पुनरुज्जीवनाच्या आशेने, गावडे यांनी अलीकडेच या पारशी हस्तकलेवर विशेष लक्ष केंद्रित करून ‘एहसास – थ्रेड्स ऑफ इंडिया २०२३’ प्रदर्शनाची ७ वी ऑनलाइन आवृत्ती प्रदर्शित केली आहे.

[हा मूळ लेख इंडियन एक्स्प्रेस मध्ये प्रकाशित झालेला आहे. (माहितीचा स्रोत: मनीषा गावडे)]