– चंदन हायगुंडे

प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपाखाली पुणे शहर पोलिसांनी एल्गार परिषद – कोरेगाव भीमा हिंसाचार संबंधित दाखल गुन्ह्यात देशभरातून शहरी भागात कार्यरत असणाऱ्या काही संशयित कार्यकर्त्यांना अटक केली. या निमित्ताने “Urban Maoist / Urban Naxal” किंवा “शहरी नक्षलवाद / शहरी माओवाद” याबाबत समाजात, प्रसारमाध्यमात व सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली. काही लोक अशी मांडणी करत आहेत कि जणू “Urban Naxal” किंवा “शहरी नक्षलवाद/ शहरी माओवाद” असे काही अस्तित्वातच नसून हे शब्द किंवा संकल्पना नव्याने हेतुपूर्वक समाजात रुजविले जात आहेत. पणे हे खरे नाही.

digital arrest
‘डिजिटल अरेस्ट’चा मुद्दा पंतप्रधानांकडून अधोरेखित
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
nirmalatai vitekar
पाथरी मतदारसंघात ‘विटेकर विरुद्ध वरपूडकर’ जुनाच सत्तासंघर्ष नव्या रूपात
naxal attack gadchiroli
नक्षलवाद्यांच्या गड अबुझमाडमध्ये गडचिरोली पोलिसांची पहिल्यांदाच मोठी कारवाई, मृत नक्षल्यांची ओळख पटली
Action will be taken against drunken drivers by nakabandi in Pune city
शहरात आता रोज रात्री नाकाबंदी; मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
gadchiroli five naxals killed
गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळला, चकमकीत पाच नक्षल्यांना कंठस्नान
How Pune’s Nagarkar Wada withstood a century yet faces neglect today
Nagarkar Wada : पुण्यातल्या नगरकर वाड्याची शंभरी, कधीकाळी दिमाख पाहिलेल्या वास्तूची अवकळा, ‘पुढे धोका आहे!’ चा फलक वेधतोय लक्ष
Cybercriminal gangs are active nationwide mainly in Chhattisgarh Rajasthan and Bihar
आर्थिक फसवणुकीत ‘जामतारा’ देशात अव्वल; सर्वाधिक सायबर गुन्हेगार झारखंड-राजस्थानात

एल्गार परिषद कारवाईच्या काही वर्षांपूर्वीपासून विविध स्तरावर शहरी माओवादाबाबत चर्चा, विचारमंथन सुरु आहे. प्रतिबंधित माओवादी संघटनेचे शहरी भागातील काम करणारे कार्यकर्ते म्हणजे ‘शहरी माओवादी’ किंवा ‘Urban Naxal’ असे म्हणता येईल. ज्या ज्या वेळी विविध पोलीस कारवाईत प्रतिबंधित माओवादी संघटनेच शहरी भागात सक्रिय असणारे पदाधिकारी, सदस्य अटक झाले, त्या त्या वेळी “Urban Maoist / Urban Naxal” किंवा “शहरी नक्षलवाद/ शहरी माओवाद” हे शब्द वापरले गेले आहे व त्याबाबत प्रसारमाध्यमे, पोलीस, अभ्यासक व समाजातील इतर गटात चर्चा ही झाली.

वृत्तपत्रातील काही उदाहरणे पाहू. फेब्रुवारी २००८ मध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी शहरी भागात माओवादी समस्येचा विस्तार. २०११ मध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने कबीर कला मंचच्या काही कलाकारांसह अन्य काही संशयित कार्यकर्त्यांना प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपाखाली अटक केली. यावेळी राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस चे सरकार होते व श्री. आर आर पाटील गृहमंत्री होते. इंडियन एक्स्प्रेसमध्ये या गुन्ह्यातील तपासाबाबत प्रसिद्ध झालेल्या एका वृत्ताचे शीर्षकच “The Naxal Urban Culture” असे आहे. या गुन्ह्यात पोलीस तपासानुसार कबीर कला मंचच्या संपर्कात असणारा पुण्यातील कासेवाडी झोपडपट्टीत राहणारा संतोष शेलार व ताडीवाला रोड झोपडपट्टीतील रहिवासी प्रशांत कांबळे हे दोन तरुण हाती बंदुका घेऊन गढचिरोलीच्या जंगलात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भा. क. पा – माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य झाले आहेत. ती बातमी इंडियन एक्स्प्रेसमध्ये “मी नक्षलींना मिळालो आहे, आता मागे फिरणे नाही” प्रसिद्ध झाली. याच गुह्या संदर्भात मे २०११ मध्ये महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झालेला लेखाचे शीर्षक आहे “नक्षलवादाचा शहरी चेहरा”.

माओवाद्यांच्या शहरी नेटवर्क ला धक्का देणारी देशातील मोठी कारवाई म्हणजे दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी एन साईबाबा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी हेम मिश्रा यांच्यासह इतरांना गढचिरोली पोलिसांकडून २०१३ मध्ये झालेली अटक व पुढे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दिलेली जन्मठेपेची शिक्षा. या प्रकरणाची देशभरात चर्चा झाली. प्रसारमाध्यमांनीही हा विषय लावून धरला. याहीवेळी शहरी माओवादाचा उल्लेख करण्यात आला. यासंबंधित इंडियन एक्सप्रेसमध्ये १६ सप्टेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेली ही बातमी वाचावी. या बातमीचे शीर्षकच “The ‘Urban Maoist’ Front” असे आहे. जी एन साईबाबा व कबीर कला मंच प्रकरणाच्या अनुषंगाने वार्तांकन करताना जेष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी लोकसत्तामध्ये शहरी माओवादाबद्दल विस्तृत लिखाण केले आहे.

२०१५ मध्ये शहरी भागात सक्रिय असणारा भा. क. पा – माओवादी संघटनेचा नेता श्रीधर श्रीनिवासन मरण पावला. त्यावेळी इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी “Top ‘urban’ Maoist in Maharashtra dies of heart attack” या बातमीच्या शीर्षकातही “‘urban’ Maoist” उल्लेख सापडतो. मृत्यू पूर्वी श्रीनिवासनला न्यायालयाने दोषी ठरवून ६ वर्ष शिक्षा ठोठावली होती. २०१६ मध्ये श्रीनिवासनच्या मृत्याला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून त्याचे स्मरण करण्यासाठी मुंबईमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एका माओवादी नेत्याच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमात पुढाकार घेऊन काम करणारे, गीत गाणारे काही कार्यकर्ते आज एल्गार परिषद गुन्ह्यात आरोपी असून पोलीस तपासाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. श्रीनिवासन प्रमाणे माओवादी चळवळीचे अनेक नेते शहरी भागातून आले आहेत.

मुळात प्रतिबंधित भा. क. पा – माओवादी संघटनेनेच आपल्या शहरी भागातील कामाची सविस्तरपणे मांडणी केली असून त्यांच्या २००७ साली प्रसिद्ध केलेल्या “Strategy of Tactics of Indian Revolution” या दस्तावेजात वाचायला मिळते. सदर दस्तावेज एल्गार परिषद गुन्ह्यासह अन्य माओवाद विरोधी पोलीस कारवाईत अटक आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहे. तसेच याच दस्तऐवजातील chapter 13 ला अनुसरून भा. क. पा. माओवादी ने “Urban Perspective” नावाचे स्वतंत्र दस्तावेज तयार केले, ज्यामध्ये आपल्या शहरी भागातील कामाची अधिक स्पष्ट मांडणी केली आहे. तेंव्हा “Urban Maoist / Urban Naxal” किंवा “शहरी नक्षलवाद / शहरी माओवाद” हे काही नव्याने रुजविलेले नाही हे समजून घ्यायला हवे.

मात्र, हे ही खरे कि उठ सुठ कोणालाही शहरी माओवादाशी जोडू नये. मार्च महिन्यात नाशिकहून मुंबईपर्यंत चालत आलेल्या किसान लाँग मार्चबाबत बोलताना भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी त्यात शहरी माओवाद्यांचा संबंध असल्याचे वक्तव्य केले होते. असे करणे बरोबर नाही. प्रतिबंधित माओवादी संघटनेचे षडयंत्र व त्यानुसार शहरी भागात त्यांचे सुरु असलेले काम अत्यंत गंभीर व संवेदनशील विषय असून त्याबाबत जबाबदारीने बोलणे गरजेचे आहे. शहरी माओवाद किंवा Urban Naxal नवे नाही पण त्यांचा कुणाशीही संबंध जोडताना जबाबदारीनं बोलायला हवं.

 

चंदन हायगुंडे
chandan.haygunde@gmail.com